तन्मय टिल्लू, साम प्रतिनिधी
मुंबई : धनंजय मुंडेंना सत्तेची मस्ती आल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. तसंच राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषीमंत्री बाहेर कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय. सत्ताधारी टक्केवारी घेण्यात व्यस्त आहेत आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सूरू आहे, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. दुष्काळावरुन कसं राजकारण रंगलंय पाहूया.
राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात 15 ते 20 दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही. राज्यातील 75 टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि विदर्भाला बसलाय. मात्र दुष्काळ आढावा बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडेच गैरहजर असल्याचं पाहायला मिळालं. यावरुनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी धनंजय मुंडेंवर सडकून टीका केलीये. राज्यात दुष्काळाचं संकट असताना कृषीमंत्री बाहेर कसे जाऊ शकतात? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय.
दरम्यान राज्यातील काँग्रेस नेते दुष्काळ पाहणी दौरा करणार आहे. 31 मे पासून या दौऱ्याला सुरुवात होतेय..दुष्काळासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. अकरा हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. सध्या 3 हजार 72 गावं आणि 7 हजार 931 वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. किती गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु पाहूया.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर्स ?
संभाजीनगर - 708
जालना- 519
बीड- 433
धाराशिव- 146
ठाणे -47
सिंधुदुर्ग - 50
नाशिक -390
अहमदनगर-336
जळगाव - 108
पुणे - 256
सातारा - 202
सोलापूर - 207
बुलढाणा- 67
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सरकारला दुष्काळ परिस्थितीवरुन घेरलंय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सरकार दुष्काळाबाबत गंभीर असून त्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं. राज्यातील लोकसभा निवडणुका पार पडल्यात. त्यामुळे राज्यातील जटील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुष्काळावरून राजकारण पेटलंय. त्यामुळे सरकारनं तातडीनं उपाययोजना करून दुष्काळग्रस्तांना तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.