राज्यात जेएन.1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. यातच अकोल्यातही 'कोरोना'चा सब व्हेरियंट जेएन.1 चा पहिला रुग्ण आढळला असून हा रुग्ण शहरातील असून सद्या त्यांची प्रकृती ठीक असल्याच आरोग्य अधिकारी यांनी सांगितलं आहे.
त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आलं होतं त्यासोबत त्याच्या परिवाराची सुद्धा कोरोना टेस्ट केली असून त्यामध्ये सर्वजण निगेटिव्ह आले आहेत आता हा रुग्ण बरा आहे. तर रुग्ण हा शहरातीलचं असून 5 डिसेंबरला रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर रुग्णाचे नमुने पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तपासणीत रुग्णात 'जेएन.1 व्हेरियंट विषाणू आढळला असल्याचा अहव्हाल प्राप्त झाला होता. मात्र रुग्ण हा क्वारंटिन राहल्याने आणि सद्या त्यांची प्रकृती ठीक असून त्यांची फॅमिली मध्ये कोणीही पॉझिटिव्ह नसल्याने सद्या जिल्हात किंवा शहरात एकही जेएन.1 व्हेरियंटचा रुग्ण नसल्याचं महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनुप चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या जेएन.1 सब व्हेरियंटचे 41 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि यासह या प्रकारच्या संसर्गाची प्रकरणे 110 वर पोहोचली आहेत. 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये प्रथम आढळलेल्या नवीन कोरोना जेएन.1 ची प्रकरणे आता नऊ राज्यांमध्ये पसरली आहेत.
बुधवारी या नवीन प्रकाराचा पहिला खटलाही दिल्लीत नोंदवण्यात आला. तर गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34, गोव्यात 14, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी चार आणि तेलंगणामध्ये दोन प्रकरणे नोंदवली गेली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.