Corona Update : कोरोना आला, मास्क घाला, देशात पुन्हा कोरोनाचं थैमान; मास्क लावणं अनिवार्य होणार?

Corona Update : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे अनेकांची चिंता वाढलीय. त्यातच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा भुवय्या उंचावणारा आहे. त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट.
Maharashtra Corona Update 162 patients
Maharashtra Corona Update 162 patientsSaam Tv News
Published On

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

देशात पुन्हा कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केलीय. चार वर्षांपूर्वी याचं कोरोनानं अनेकांचा जीव घेतला होता.त्यानंतर कोरोनामुळे जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा कोरोना देशात हातपाय पसरतोय . त्यामुळे आता घराबाहेर पडताना मास्क घालणं अनिवार्य होणार आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३६३ वर पोहोचलीय. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे १६२ बाधित रुग्ण आढळलेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशात वाढणारी कोरोनो रुग्णांची संख्या चिंतेचा विषय ठरतेय. संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या किती आहे?

राज्य रुग्णसंख्या

केरळ ९५

तामिळनाडू ६६

महाराष्ट्र १६२

कर्नाटक १३

पुद्दूचेरी १०

गुजरात ७

दिल्ली ५

राजस्थान २

हरियाणा १

सिक्कीम १

पश्चिम बंगाल १

Maharashtra Corona Update 162 patients
१५ मिनिट हृदय बंद, तरी कारचालक जिवंत, हार्ट अटॅकमुळे गाडीचा अपघात; नवी मुंबईत घडली चमत्कारिक घटना

दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आंध्र प्रदेश सरकारानं मास्क घालणं नागरिकांसाठी अनिवार्य केलयं. तसंच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने बाधित भागातून येणाऱ्यांना चाचणी करून घेण्याचा आणि लक्षणे आढळल्यास किमान एक आठवडा इतरांपासून वेगळे राहावे, असेही सागंण्यात आलेय.

आंध्र सरकारचा मोठा निर्णय

मास्क घालणं नागरिकांसाठी अनिवार्य

आंध्र प्रदेशात सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी

महाराष्ट्रात अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीय. मात्र त्याआधीच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल. कोरोनाला पुन्हा हद्दपार करण्यासाठी आत्तापासूनच मास्कचा वापर सूरू करत नागरिकांनांच जागरूक रहावं लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नागरिकांनी सर्तक राहायला हवं.

Maharashtra Corona Update 162 patients
Mayuri Hagawane Jagtap : हगवणेंची छळछावणी, मयुरीची कहाणी; सासऱ्यानेच केला विनयभंग, हगवणेंची सुन मयुरीने केला खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com