१५ मिनिट हृदय बंद, तरी कारचालक जिवंत, हार्ट अटॅकमुळे गाडीचा अपघात; नवी मुंबईत घडली चमत्कारिक घटना

Navi Mumbai : गाडी चालवताना हार्ट अटॅक आला आणि तब्बल १५ मिनिट हृदय बंद पडलं. त्यानंतरही चालक जिवंत आहे.. होय.... हे खरंय... नवी मुंबईत नेमकं काय घडलं? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
car accident due to heart attack
car accident due to heart attackSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टिव्ही

नवी मुंबई : गाडीचालकाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला. तब्बल १५ मिनिटं हृदय आणि बीपी पुर्णपणे बंद होतं. मात्र तरीदेखील या चालकाचा चमत्कारिक रित्या जीव वाचल्याची घटना नवी मुंबईतल्या तळोजात घडलीय. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हार्ट अटॅकमुळं नियंत्रण सुटलेल्या अनिकेत नलावडेच्या गाडीनं दुचाकीस्वराला उडवलं. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. मात्र, हार्ट अटॅक आलेला गाडीचालक अनिकेत नलावडेंला रुग्णालयात दाखल केलं आणि त्याचा जीव वाचलाय. जगभरात हार्ट अटॅकमुळे २० लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळेच वाहन चालवताना छातीत दुखायला लागल्यास काय काळजी घ्यावी?

हार्ट अटॅक आल्यास काय करावं?

गाडी चालवताना हार्ट अटॅकची लक्षणं दिसल्यास तात्काळ गाडी थांबवा

गाडीचे इंडिकेटर्स चालू करा

तातडीनं १०८ आपत्कालीन नंबरशी संपर्क करा

दीर्घ श्वासोच्छोवास घ्या

car accident due to heart attack
Mayuri Hagawane Jagtap : हगवणेंची छळछावणी, मयुरीची कहाणी; सासऱ्यानेच केला विनयभंग, हगवणेंची सुन मयुरीने केला खुलासा

हार्ट अटॅकची लक्षणं दिसल्यावर अनिकेत नलावडेंनी तातडीनं गाडी थांबवली असती तर दुचाकीस्वाराचा जीव वाचला असता, त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणं दिसताच स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहे.

car accident due to heart attack
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, केस स्ट्राँग करु, तडकाफडकी निकाल; अजित पवारांचा कस्पटेंना शब्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com