ऐकलंत... महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होताच मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्ट संदेश दिला होता... त्यातच आता महायुतीच्या मंत्र्यांची वादाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही... त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस वादग्रस्त मंत्र्यांबाबत धक्कातंत्र वापरणार असल्याची माहिती समोर आलीय....तर या धक्कातंत्रामुळे बड्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे... तर नव्या आमदारांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय....मात्र सध्या कोणते मंत्री वादात सापडले आहेत?
माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्य
संजय शिरसाट
विट्झ हॉटेल खरेदी ते एमआयडीसीतील ट्रक टर्मिनसचा भूखंड लाटल्याचा आरोप
जयकुमार गोरे
महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप
सतत मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि गैरव्यवहारांचे आरोपांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला फटका बसण्याची शक्यता आहे..त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची चर्चा आहे... मात्र त्यासाठी कोणत्या निकषावर मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे? पाहूयात...
पहिल्या मंत्रिमंडळात डावललेल्या ज्येष्ठ आमदारांना संधी मिळणार
आपापल्या भागात मजबूत पकड असलेल्या आमदारांना संधी मिळण्याची शक्यता
पक्षसंघटनेत आणि आमदार म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्यांना संधी
स्वच्छ चारित्र्याच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार
भाजपकडून अनेकदा धक्कातंत्र वापरलं जातं.... त्याचा पक्षातील बड्या नेत्यांना फटका बसतो... मात्र आता भाजपच्या या धक्कातंत्राचा फटका शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.... त्यामुळे मंत्रिमंडळाचा फेरबदल झाल्यास कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होणार आणि कोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.