

फडणवीस सरकारने ३ मोठे निर्णय घेतले
आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले
गजानन महाराज संस्थान शेगावला कायमस्वरूपी बांधकामाची मंजुरी
महाराष्ट्र सरकारच्या सरकारी भूखंड वितरण धोरणात सुधारणा
गिरडा यात्रास्थळ विकासासाठी गजानन महाराज संस्थानाला परवानगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ३ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाअंतर्गत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेगावच्या गजाजन महाराज संस्थानांना विकासकामासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचसोबत, फडणवीस सरकारने भूखंडांच्या वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी दिली.
१) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन. घटनात्मक पदावर राहून सलग २५ वर्षे यशस्वीरित्या जनसेवा केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ठराव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्रीगण यांच्याकडून टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत करण्यात आले.
२) शासकीय मालकीच्या छोट्या, स्वतंत्ररीत्या बांधकामास अयोग्य, चिंचोळ्या आकाराच्या, उपयुक्त आकार नसलेल्या, पोहोच मार्ग नसलेल्या भूखंडांच्या वितरणाच्या धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ च्या नियम ३७ व ३७ अ मधील तरतुदीत सुधारणा होणार आहे.
३) बुलडाण्यातील श्री. संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांना मौजे गिरडा येथील यात्रास्थळ विकासासाठी कायमस्वरूपी बांधकाम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संस्थानाला यापुर्वीच वृक्षलागवडीसाठी दिलेल्या १९ हेक्टर ६ आर जमिनीपैकी ३ हेक्टर ८१ आर जमिनीवर बांधकाम करता येणार आहे.यामुळे भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देता येणार आहेत.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्याबाबत महत्वाची चर्चा झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५००० रुपयांची मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला. अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येकी ५००० रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे. दिवाळीआधी पंचनामे झालेल्या सगळ्याच शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्य सरकारकडून १०० टक्के पंचनामे पूर्ण करत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाणार असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.