Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय, कॅन्सरच्या उपचारासाठी उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर...

Maharashtra Cabinet Meeting: महाराष्ट्र सरकारने आज ५ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला वाचा सविस्तर...
Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय, कॅन्सरच्या उपचाराबाबत उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर...
maharashtra cabinet meetingSaam Tv News
Published On

Summary -

  • मंत्रिमंडळ बैठकीत आज ५ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • कॅन्सर उपचारासाठी महाकेअर फाऊंडेशन स्थापन केले जाणार आहे.

  • उद्योग क्षेत्रासाठी GCC धोरण २०२५ मंजूर करण्यात आले.

  • ऊर्जा विभागाने वीज कर आकारणीस मंजुरी दिली आहे.

  • साताऱ्यात फलटण येथे नवीन दिवाणी न्यायालय स्थापन होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचे ५ निर्णय घेण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, उद्योग विभाग, ऊर्जा विभाग, नियोजन विभाग आणि विधि व न्याय विभाग याअंतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत. कर्करोगाच्या उपचारासाठी सरकार महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन करणार आहे. सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेण्यात आले आणि त्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला हे घ्या जाणून....

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग -

कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित. नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार. त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित. राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार. यात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन होणार. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय, कॅन्सरच्या उपचाराबाबत उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर...
Cabinet Reshuffle : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल, राज्याला नवे कृषिमंत्री अन् क्रीडा मंत्री मिळाले, वाचा सविस्तर

उद्योग विभाग -

महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर - GCC) धोरण २०२५ मंजुर. विकसित भारत २०४७ च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टीना प्रोत्साहन मिळणार आहे.

ऊर्जा विभाग -

औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब व अन्य योजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार आहे.

Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय, कॅन्सरच्या उपचाराबाबत उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर...
Cabinet Meeting: फडणवीस सरकारने घेतले ९ मोठे निर्णय, पुणे- नागपूर आणि बीडला होणार फायदा; मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं?

नियोजन विभाग -

महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी. भू-स्थानिक तंत्रज्ञानचा (Geospatial Technology) वापर करून प्रशासनात गतिमानता आणणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

विधि व न्याय विभाग -

सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार आहे. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मंजूरी देण्यात आली.

Maharashtra Cabinet: फडणवीस सरकारचे ५ मोठे निर्णय, कॅन्सरच्या उपचाराबाबत उचललं मोठं पाऊल; वाचा सविस्तर...
Fadnavis Cabinet : फडणवीस सरकारने घेतले ८ मोठे निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय काय ठरलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com