UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

Buldhana Acid Attack : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्यावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. ही धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली आहे.
Buldhana Acid Attack
Buldhana Acid Attacksaam tv
Published On
Summary
  • बुलढाण्यात यूपीएससीच्या विद्यार्थ्यावर अ‍ॅसिड हल्ला

  • आरोपींनी बेशुद्ध अवस्थेत तरुणाला जंगलात फेकून दिले

  • हल्ला रुम पार्टनरनेच केल्याचा भावाचा दावा; पोलिस तपास सुरू.

Buldhana : यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणावर दोघांनी क्रूर हल्ला केला. तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. तरुण बेशुद्ध पडल्यानंतर त्याला आरोपींनी रस्त्याजवळ असलेल्या जंगल परिसरात टाकून दिले. तरुणावर सध्या अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही भयावह घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला रस्त्यावर ही घटना घडली आहे. ज्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला झाला, त्याचे नाव अमोल हनुमंत इसाळ असे आहे. मूळचा यवतमाळचा असलेला अमोल अमरावतीत यूपीएसीची तयारी करत होता. अमोल खामगावहून अकोल्याकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला अडवले. त्यानंतर लाठ्याकाठ्यांनी अमोलला मारहाण करण्यात आली.

Buldhana Acid Attack
Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

मारहाण केल्यानंतर अज्ञातांनी अमोलच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अ‍ॅसिड ओतले. अमोल बेशुद्ध पडल्यानंतर रस्त्याच्या लगत असलेल्या जंगल परिसरात त्याला टाकून आरोपी फरार झाले. रात्रभर अमोल बेशुद्ध अवस्थेत जंगलात पडून होता. सकाळी त्याला जाग आली. तेव्हा तो निर्वस्त्र आणि जखमी अवस्थेत रस्त्यावर आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांंना दिली.

Buldhana Acid Attack
Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

अमोलला पुढील उपचारांसाठी अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अ‍ॅसिड हल्ल्यामुळे अमोलला मोठी दुखापत झाली आहे, तो गंभीररित्या भाजला गेल्याची माहिती समोर आळी आहे. या प्रकरणी खामगावर पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा हल्ला अमोलच्या रुम पार्टनरनेच केल्याचा दावा अमोलच्या भावाने केला आहे.

Buldhana Acid Attack
Pune Duand : आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवलं; दौंडमध्ये भयकंर घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com