सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, असा सूर सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी आळवला आहे. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल, त्याच सोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ही थांबावा अशा प्रकारची काही ओबीसी नेत्यांची भूमिका आङे. यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी ऐकून घेण्याची भूमिका घेतली.
भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये खबरदारी घेण्यात आली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.
11 जुलैला काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्नीथला मुंबईत येत असून काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. बैठकीत विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात सूचना करणार आहेत. 11 जागांसाठी 12 अर्ज आल्याने विधानपरिषद निवडणुकीत अटीतटीची लढत होणार आहेत. मात्र हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यासंदर्भात अजून काँग्रेसकडून निर्णय आलेला नाही.
नाशिकमध्ये आणखी पुन्हा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. गंगापूर रोड परिसरातील साधना मिसळ भागात अपघात घडला आहे. अपघातात 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून अपघात करून वाहन चालक फरार झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भालेराव लवकरच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भालेरावांच्या रूपाने राष्ट्रवादीला उदगीरमध्ये मोठा चेहरा मिळाला आहे. भालेराव हे येत्या निवडणुकीत विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार असण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घराची जम्बो लॉटरी सिडको काढणार आहे. वाशी, जुईनगर, मानसरोवर, खानदेश्वर ,तळोजा या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधी 15 ऑगस्ट रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.
सोलापूरच्या तामलवाडी गावात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केलं. शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किमी प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात आज संत गजानन महाराजांच्या पालखीचा असणार आहे. तर उद्या सकाळी सोलापूर शहरात पालखीचे आगमन होणार आहे.
वरळी डोममध्ये १८ ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा होणार आहे. दहिहंडीला १६ संघ जाहीर करण्यात आले आहे. गोविंदाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलीय. त्याचबरोबर प्रो गोविंदा खेळासाठी टायगर श्रॉफ ब्रॅंड ॲंबेसेडर असणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिलीय.
पुणे शहरातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. संध्याकाळी पावसाने उघडीप घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. शहरातील मध्यवर्ती भागात पावसाचा जोर कायम आहे.
- नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस होत असून पावसामुळे गडावर जाणारे रस्ते जलमय झालेत. घाटमाथ्याहून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळणारे धबधब्यामुळे रस्त्यांवर पाणी झालंय. वाहनधारकांना वाहनं चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय.
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे. वसंत गीते यांच्या कार्यालयावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मुंबई नाका परिसरात असलेल्या शिवसेनेच्या शाखेवर मनपाकडून पुन्हा हातोडा मारण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे. या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी सलग दमदार पावसाची गरज आहे. हवामान खात्याने वाशिम जिल्ह्यात चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्या अंदाजावरुन आज पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी सेलू शहरात अॅड. विष्णू ढोले यांनी गेल्या सहा दिवसापासून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला सहावा दिवस असताना प्रशासनाने दखल घेतली नसल्याने उद्या सेलू बंदची हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोणारी महासंघाच्या वतीने आझाद मैदानावर ७-८ हजार लोकं आली होती . आम्ही त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. लोणारी आर्थिक महामंडळ स्थापन करावं अशी त्यांची मागणी होती आणि ती मागणी मान्य करण्यात आलीय. विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिलीय.
वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात फरार असलेला आरोपी मिहीर शहा याला अटक करण्यात आली आहे. शहापूर येथून त्याला अटक करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. गौरखेडा ते परलाम जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी ओसळून वाहत असल्यामुळे रस्ता बंद आहे. भातकुली तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकेच गेले वाहून गेलेत.
माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांची भाजपाला राम राम केला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता नांदेडमध्ये भाजपाला दुसरा धक्का बसला आहे. डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर भाजपला राम राम केला आहे.
मनोज जरांगे यांचे लातूरमध्ये आगमन झालंय. त्यांनी लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय. रॅलीत महिलांसह मराठा समाजाची प्रचंड मोठी गर्दी आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी यवतमाळच्या कळंब येथील प्रसिद्ध चिंतामणी मंदिरात येऊन श्रीचे दर्शन घेत अभिषेक केलं. चिंतामणी इंथे भाविकांची मनोकामना पूर्ण होते, म्हणुन मी या ठिकाणी दर्शनाला आलोय. दरम्यान दर्शना आधी यवतमाळ लगत असलेल्या दीनदयाल प्रबोधनीची पाहणी केली. तसेच अध्यात्माविना जीवनात प्रगती करणे अशक्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
भाईंदरच्या स्थानकात रेल्वेच्या खाली येऊन दोन जणांचा मृत्यू झालाय. पिता पुत्रानी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती..ट्रेन समोर येऊन दोघंनी जीवन संपवल सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारासची भाईंदर प्लेटफॉर्म क्रमांक ६ वर घटना घडली.
पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश झालाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशसोहळा पार पडला. यावेळी ठाकरे गटात वसंत फुलला असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.
पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन वसंत मोरे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन दाखल झाले होते.
पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे हे शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन वसंत मोरे हे मातोश्रीवर आले असून थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील '14 गावांचा' नवीमुंबई पालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. गाव विकास समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असू नवी मुंबई पालिकेच्या 4 अभियंत्यांना मुळ विभागाचे काम सांभाळून अतिरिक्त कामकाज (14 गावांचे )पहावयाचे आहे. नवीमुंबई पालिकेच्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
प्रेम प्रकरणातून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घडली. प्रियकराचे नाव टाकून सुसाईड नोट लिहीत महिलेने सातपूर पोलीस स्टेशन समोरच हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सदर महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार सुधाकर भालेराव ११ जुलै रोजी मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर येथे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात 11 जुलै रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे, दरम्यान त्यांच्या या प्रवेशाने भाजपला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहामध्ये प्रश्नाच्या संबंधित खात्याचे मंत्रीच उपस्थित नसल्याने हा गोंधळ झाला. जोपर्यंत मंत्री येत नाही तोपर्यंत सभागृह तहकूब करावे, अशी मागणी करत जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.
वरळीच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जुहूच्या ग्लोबल तापस बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या तपासानंतर या बारला सील ठोकण्यात आले आहे. आरोपी मिहीर शहा आणि त्याच्या चार मित्रांनी याच बारमध्ये अपघाताच्या रात्री तब्बल 18 हजाराची दारू प्यायली होती. रात्री उशिरापर्यंत मिहीर शहा आपल्या मित्रांसोबत जुहूच्या तापस बारमध्ये दारू पीत होता. दोन दिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बार मधील स्टॉक मोजण्याचे काम सुरू होते. अनियमित्ता आढळल्यामुळे आज राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तापस बारवर कारवाई करण्यात आली आहे
पुणे शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानं आंदोलन केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. हिट अँड रन, अमली पदार्थ, कोयता गँग, गोळीबार अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
यावर कळस म्हणून गेल्या २ दिवसात पोलिस अधिकाऱ्यांना जिवंत पेटवण्याचा प्रयत्न, पोलिस कर्मचाऱ्यांना चिरडून फरार अशा घटना घडल्या आहेत. स्वतः पोलिसही सुरक्षित नसल्याने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निष्क्रीय कारभार पुन्हा उघड झाला आहे. या निष्क्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. नाशिक शहरातील खंडित, अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शहरातील महावितरण कंपनीच्या सर्व कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्वाच्या फोंडा घाटाला बसला आहे. या घाट मार्गावर भला मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर अवजड वाहनांना या घाटातून वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. वैभववाडी तालुक्यातील करूळ घाट नूतनीकरणाच्या कामासाठी मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणारी सर्व वाहने याच फोंडाघाटातून जात आहेत. मात्र आता वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आहे
विधानसभा निवडणुकीचा नंतर महाविकास आघाडीचे सरकार निवडून आले तर तुमचे आंदोलन थांबणार का या प्रश्नावर बोलताना आता महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे सरकार येणार नाही तर आता मराठ्यांचे आरक्षण सरकार निवडून येईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आमचे सरकार हे आरक्षण सरकार असेल अन ज्यांना ज्यांना आरक्षण मिळणे बाकी आहे त्यांना आरक्षण देण्याचे काम आमचे सरकार करेल असेल जरांगे पाटील म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत आज पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे शिवबंधन बांधणार आहे. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह वसंत मोरे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील टी पॉइंटवर काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी फुलंब्रीमध्ये काँग्रेस आक्रमक झालं असून छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्ग रोखून धरला. यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते यशवंतरावांच्या समाधी स्थळाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर राष्ट्रवादीचे नेते अभिवादनाला करणार असून असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन लवकरच कराडला जाणार असल्याची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसने शुभारंभ केला असून पुढील ३ महिने नेते-पदाधिकार्यांना झपाटून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रखडलेल्या पुणे विमानतळ प्रकल्पावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्घाटन होऊन सुद्धा विमानतळ कार्यान्वित न केल्यामुळे शरद पवार गटाने आंदोलन पुणे विमानतळाच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे.
नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. शहरातील सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावाने चोप दिला. तसेच वाहनाचीही तोडफोड केली. सात वाहनांना धडक देऊन चालक आदेश खानने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आज विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भ्रष्टाचार आणि क्लीनचिट देण्यावरुन विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी भाजपच्या वॉशिंग मशिनवरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड ११ जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. उपराष्ट्रपती धनखड विधीमंडळात सर्व आमदारांना मार्गदर्शन विधीमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार असून उपराष्ट्रपती धनखड विधीमंडळात सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. या सगळ्या संदर्भात मुख्य प्रतोद गटनेत्यांना माहिती दिली जात आहे.
वरळी हिट अँड रन अपघात की हत्या? असा पेच कायदे तज्ज्ञांसमोर पडला आहे. कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटर फरफटत नेल्यानंतर आरोपींनी त्यांनागाडीपासून बाजूला केले होते. त्यानंतर गाडी रिव्हर्स घेऊन गाडी रस्त्यावर पडलेल्या कावेरी नाखवा यांच्यावर चढवून आरोपी पसार झाले. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याची शंका पोलिसांनी आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सिद्धीविनायक बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर बोलताना अजित पवार यांनी चांगल्या कामाची सुरूवात देवदर्शनाने करतात असे म्हणत आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे सूचक संकेत दिले.
आगामी विधानसभा निवडणुकींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारीला लागला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
पंढरपूर शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत नामदेव पायरी व बस स्थानक परिसरातून भाविकांचे चोरीला गेलेले 24 लाख 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने शोधून काढून ते जप्त केले आहेत. या प्रकरणी 13 चोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
गेल्या काही महिन्यांत विठ्ठल मंदिर परिसरातून भाविकांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. वारीच्या तोंडावर पंढरपूर शहर पोलिसांनी मागिल काही महिन्यात झालेल्या चोऱ्यांचा तपास केला असता, यामध्ये 13 संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 34 तोळे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने हस्तगत केले आहेत.
दरम्यान यंदाची आषाढी वारीसाठी मोठी गर्दी होणार आहे. वारकर्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज झाल आहेत. यात्रा कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडू नयेत यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक टोल नाक्यावर वाहन चालकांची तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
=राज्यभरात आरटीओ विभाग व पोलीस प्रशासन वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जनजागृती करत आहे. मात्र, याचा फारसा परिणाम वाहन चालकांवर झालेला दिसत नाही. कारण, मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यात मागच्या 6 महिन्यात 182 अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये तब्बल 110 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरील अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे भाव आता वाढले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्यांना मोठा फटका सहन करावा लागतोय. टोमॅटो, मिरची, भेंडी, आणि फूलगोबी याचे दर हे 100 रुपय किलोपर्यंत गेले तर कांदे आणि बटाटे 60 ते 70 रुपये पर्यंत आहे. गेल्या काही दिवसापासून बाजारात पावसाचा फटका बसलेला शेतमाल बाजारात येत आहे तसेच आवक कमी झाल्याने काही दिवसापासून भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे.
बीड जिल्ह्यात खंड पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री केलीय. जिल्ह्यातील बीड, आष्टी, पाटोदा, वडवणी, गेवराई, परळी यासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्री कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळं सोयाबीन, कापूस, उडीद पिकांना संजीवनी मिळणार आहे. यामुळं शेतकरी आनंदित आहे.
जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे .त्यामुळे जालना जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्यात विजांचा कडकडाटसह , वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून ३० ते ४० किमी प्रति तास या वेगाने वादळी वारा वाहण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलाय.
दरम्यान जालना जिल्ह्यात अनेक भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे.
मुंबईतील धावत्या बेस्ट बसमध्ये कंडक्टरनेच प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आहे. इलेक्ट्रिक हाऊस ते गावदेवी दरम्यान प्रवास करत असताना महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय. महिला प्रवाशाचा हात पकडून साईड रिलेशन ठेवण्याची कंडक्टरने गळ घातल्याची माहिती आहे. इतकंच नाही, तर प्रवासादरम्यान त्याने महिलेचा मोबाईल हिसकावून गॅलरी देखील चेक केल्याचं समजतंय. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी बस रूट क्रमांक १३२ च्या कंडक्टर विरोधात गुन्हा दाखल केलाय.
सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहेत. मध्य रेल्वेवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण रेल्वे स्टेशनवर यासंदर्भातील उद्घोषणा होत आहे.
मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सखल भागात साचलेले पाणी ओसरू लागले आहेत. लोकल सेवा देखील पूर्वपदावर येत आहे. मात्र, हवामान खात्याने आजही मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईतील सगळ्या शाळा-महाविद्यालयांना देखील आज सुट्टी जाही करण्यात आली आहे. मुंबईतील सगळी यंत्रणेतील सज्ज राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.