Today's Marathi News Live: श्रीवर्धनजवळ ST बसला अपघात, १५ प्रवासी किरकोळ जखमी

Maharashtra Live News and Update in Marathi (8 april 2024): पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर , नागपूर अपघात, सूर्यग्रहण २०२४ , लोकसभा निवडणूक घडमोडी दिवसभारातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट इथे वाचा
Aajchya Marathi Batmya Live - 8 April 2024 | Latest and Breaking Updates on IPL, Lok Sabha Election, Surya Grahan 2024, Mumbai, Pune and overall Maharashtra
Aajchya Marathi Batmya Live - 8 April 2024 | Latest and Breaking Updates on IPL, Lok Sabha Election, Surya Grahan 2024, Mumbai, Pune and overall MaharashtraSaam TV

श्रीवर्धनजवळ ST बसला अपघात, १५ प्रवासी किरकोळ जखमी

श्रीवर्धन तालुक्यातील वडवली फाटा येथे एसटी बस रस्त्याच्या बाजुला पलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. मिरजहून श्रीवर्धनकडे निघालेल्या या बसमध्ये ३४ प्रवासी होते. यांत्रिक बिघाडामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्याकडेला शेतात उलटली.

परभणी लोकसभा मतदारसंघात ३४ उमेदवार रिंगणात, ७ जणांची माघारी

परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी ४१ उमेदवारांनी ६५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आजच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सात अर्ज मागे घेतले. आता ३४ उमेदवार परभणी लोकसभेच्या रिंगणात आहेत, महायुतीकडून महादेव जानकर यांना शिट्टी तर महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना मशाल तर वंचितचे पंजाब डख यांना रोडरोलर हे चिन्ह देण्यात आले आहे. प्रमुख लढत महाविकास आघाडीचे संजय जाधव व महायुतीचे महादेव जानकर यांच्यात असणार आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची मुंडे बहीण भावावर टीकास्त्र

महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेकरिता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी परळी विधानसभा मतदारसंघाची पहिली बैठक घेतली. या बैठकीतून सोनवणे यांनी मुंडे बहीण भावांवर कडाडून टीका केलीय. परळीतील वैजनाथ सहकारी साखर कारखाना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभा केला, परंतु त्यांच्यानंतर त्यांना आयतं मिळालं. त्यांना त्याचं काय कळणार आहे, त्याची काय किंमत आहे. यांना सर्व फुकट आणि आयतं मिळालं अशी टीका केलीय.

नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात फक्त २३ उमेदवार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ४३ उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता एकूण २३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या २३ उमेदवारांसाठी 2 ईव्हीएम मशीनवर मतदान प्रक्रिया घ्यावी लागणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी २ ईव्हीएम मशीन लावण्या इतकी उपलब्धता निवडणूक आयोगाने आधीच करून दिली आहे. ४३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक यंत्रेनेवरचा ताण कमी झाला आहे. येत्या २६ एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी मतदान होणार आहे.

रिपाइ गवई गटाचे राजेंद्र गवई यांचा उमेदवारी अर्ज मागे

देशभरात रिपाई गवई गटाचे 13 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात. रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.राजेंद्र गवई यांनी अमरावती लोकसभे करीता दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मागे घेतला. व त्यांच्याच पक्षातील जिल्हाध्यक्ष हिंमत ढोले यांना उमेदवारी घोषित केली. मी एक नवीन पायंडा ठेवला आहे,कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे ह्या हेतूने मी माझा अर्ज मागे घेतला तर देशात रिपाई गवई गटाचे 13 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा देखील राजेंद्र गवई यांनी केली.

सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पार्थ पवार सक्रिय

पार्थ पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील कोंढवे-धावडे, कोपरे,उत्तमनगर येथे गावभेट दौरा केला.

शाहू महाराजांविरोधात आरपीआयने दिला उमेदवार

रामदास आठवले आरपीआय गटात फूट पडलीय. आरपीआयकडून रूपा वायदंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. कोल्हापुरातील अनेक कार्यकर्त्यांनी आठवले यांची साथ सोडलीय. आठवले यांची साथ सोडताच थेट शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलाय. लिका सय्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यांनी ही भाजपवर आरोप करत तक्रार दाखल केलीय. भाजपने हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

वर्ध्यात एसटी बस उलटल्याने भीषण अपघात, अपघातात ४० प्रवासी जखमी

वर्ध्यातील आष्टीच्या तेलाई घाटात एसटी बस उलटून अपघात झालाय. या अपघातात ४० प्रवाशी जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ४० जखमीपैकी ५ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. ही बस अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथून तळेगावला येत होती. दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय.

अरविंद सावंत यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार दाखल

भाजप भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांनी तक्रार दाखल केलीय. महानगर टेलिफोन निगम या सरकारी इमारतीमध्ये बैठक घेतल्याची तक्रार करण्यात आलीय. महानगर टेलिफोन निगमच्या इमारतीत सावंत यांच्या संघटनेचे कार्यालय आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोला भीषण आग

पुण्यातून आगीची एक मोठी बातामी समोर आली आहे. पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार

आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल झालीय. वैभव बिराजदार या व्यक्तीने आचारसंहिता कक्ष प्रमुखांकडे तक्रार केलीय. रिक्षावर प्रणिती शिंदे यांचे बॅनर लावून प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या प्रचार केला, असा आरोप करण्यात आलाय.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ८.१० किलो सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई कस्टम विभागाने ८ प्रकरणात केलेल्या कारवाईत तब्बल ८.१० किलो सोनं जप्त केलं. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ४.८१ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. गुदद्वार तसेच परिधान केलेल्या कपड्यातून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाने दिलीय.

वांद्रे वरळी सी-लिंकवर कारला अपघात

मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवर कारला अपघात

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

उत्तर वाहिनीवर झाला अपघात

अपघातात कार चालक जखमी

अपघातामुळे वरळी सी लिंकवरील वाहतुकीवर परिणाम

वरळी पोलीस घटनास्थळी

प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी दाद मागितली आहे.

- प्रदीप शर्मा यांच्या जामीन आणि स्थगिती मागणीवर होणार चार आठवड्यांनी सुनावणी

-प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठी, वाढवली अजून चार आठवडे मुदत

- सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे दिले आदेश

- राज्य सरकारला दिला एक महिना कालावधी न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्यपिठाचा निर्णय

मिरारोडमध्ये पाच सिलिंडर फुटले, घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही

मिरारोडमध्ये पाच सिलिंडर फुटले

मिरारोडच्या एल.आर.तिवारी महाविद्यालया मागे...

इमारत बांधकाम मजुरांच्या झोपड्यांना आग

या आगीत पाच सिलिंडर फुटले

आगीतून सहा सिलिंडर बाहेर काढण्यात आले.

या घटनेत कोणीही जखमी नाही

मिरा भाईंदर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

आप नेते दुर्गेश पाठक यांना ईडीकडून समन्स

आप नेते दुर्गेश पाठक यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी समन्स बजावण्यात आलं आहे.

आज दुपारी २ वाजता ईडी चौकशीला बोलावलं आहे.

आम्हाला लवकरच अटक होईल असं काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारमधील मंत्री अतिशी यांनी केला होता आरोप

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज पाटील यांचं मराठा समाजाला मोठं आवाहन

'आमच्यावरच का अन्याय होतोय, किती दिवस सहन करायचं. त्यामुळे देणारे बना... ज्यांनी सगेसोयऱ्यांबाबत वेगळी भूमिका घेत ओबीसींना पाठिंबा दिला, त्यांना पाडण्यात सुद्धा विजय आहे , मत वाया घालवू नका, असं म्हणत जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना इशारा दिला आहे.

सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा

सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा

पाठिंबा देतानाच प्रणिती शिंदे आमदार असलेल्या मतदारसंघावरील जागेवर नरसय्या अडम यांचा दावा

शहर मध्यची जागा माकपला देण्याबाबत सुशीलकुमार शिंदे यांचा आक्षेप नसल्याचाही आडम यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात होणार सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात सभा घेणार

बारामती, शिरूर, मावळ पुणे लोकसभेसाठी एकत्र सभा घेणार

मोदींची सभा पुणे शहरात होण्याची शक्यता

संघर्ष करायची आमची तयारी : शरद पवार

बारामतीत शरद पवार काय म्हणाले?

मोदी सरकारने कांदा निर्यातीला बंदी घातली त्यामुळे कांद्याचे दर घसरले

काही भागात सोयाबीनचे पीक घेतले जाते, मात्र सोयाबीनच्या किंमती खाली आल्या.

संघर्ष आमच्या नशीबात असेल, तर तो संघर्ष करायची आमची तयारी आहे.

श्रद्धा आणि सबुरी यावर आमचं काम चालू आहे.

चंद्रपूरच्या सभेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मराठीत ट्विट

विदर्भातील सर्व उमेदवार विजयी होतील; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा दावा,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'विदर्भातील जागा महायुतीत लढत आहे. मला विश्वास आहे विदर्भातील महायुतीचे वातावरण मोदीमय झाले.. आज चंद्रपूरला मोदीजींची सभा आहे. विदर्भातील सर्व उमेदवार विजयी होतील'.

खासदार अमोल कोल्हे वढूमध्ये दाखल

खासदार अमोल कोल्हे वढूमध्ये दाखल झाले.

त्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच घेणार दर्शन

अमोल कोल्हे यांच्या लोकसभा मतदासंघात वढू बुद्रुक येतं.

त्या अगोदर ते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

MNS Gudi Padwa Teaser: मनसेचा गुढी पाडव्याचा नवा टिझर रिलीज; व्हिडिओतून दिले लोकसभा निवडणुकीचे संकेत

मनसेकडून नवीन टिझर रिलीज झाला आहे. मनसेचा उद्या गुढी पाडवा मेळावा आहे. त्यापूर्वी मनसेकडून टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये योग्य वेळी मुसंडी मारायची असते म्हणत मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकी बाबत टिझरमधून संकेत देण्यात आले आहे.

UP CM News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भंडाऱ्यात प्रचारसभा

आज भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार आहेत. भंडारा शहारातील दशरा मैदान येथे सभेसाठी भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी 10 हजार नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज दूपारी 4 वाजता या सभेची सुरूवात होणार आहे.

मोठी बातमी! BRS नेत्या के कविता यांना दिलासा नाहीच, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

BRS नेत्या के कविता यांना दिलासा नाहीच

के कविता यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

कविता यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता येणार नाही.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर BRS ला मोठा झटका

Nashik News: नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यावर आणखी एक गुन्हा

- नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

- निवृत्त कर्नलची ३० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

- ३० लाख घेऊन त्याचा परतावाही मिळाला नाही आणि फ्लॅटही मिळाला नाही म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल

- उपनगर पोलिसांत निवृत्त कर्नल राकेश कालिया यांनी दिली होती फिर्याद

- यापूर्वी कारडांवर तीन गुन्हे दाखल, शंभरहुन अधिक पोलिसांत तक्रारी

- जवळपास सहा कोटी रुपयांची कारडा यांनी आत्तापर्यंत फसवणूक केल्याची पोलिसांच्या दप्तरी नोंद

- नरेश कारडा नाशिकमधील बांधकाम व्यावसायातील मोठं नाव

केंद्र सरकार आज नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करणार

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) वर आज सुप्रीम कोर्टात केंद्र सरकार प्रतिज्ञापत्र दाखल करणार

19 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने केंद्र सरकारला 3 आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते

केंद्र सरकारने 8 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे अस म्हणत या प्रकरणी ९ एप्रिलला सुनावणी होईल, असं कोर्टाने सांगितल होतं.

CAA च्या विरोधात जवळपास २३७ याचिका दाखल झाल्या असून अनेक याचिकेतून या कायद्याला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलीय.

११ मार्च रोजी अचानक केंद्र सरकारने नोटिफिकेषण जारी करत देशभरात CAA लागू करत असल्याची घोषणा केली होती.

केंद्र सरकार प्रतिज्ञापत्रात काय उत्तर सादर करतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

राहुल गांधींनी मागील १० वर्षात स्वतः काही केलं नाही, पक्षात दुसऱ्यालाही करू दिलं नाही; प्रशांत किशोर यांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अपयश लक्षात घेऊन पक्षातून बाजूला व्हायला हवं, असं राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले.

निर्णय घेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्य द्यायला हवं - प्रशांत किशोर

गेल्या दहा वर्षात राहुल गांधी यांनी स्वतःही काही केलं नाही आणि पक्षात दुसऱ्या कुणालाही काही करायला दिलं नाही - प्रशांत किशोर

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची राहुल गांधी यांच्यावर टीका

एका डिजिटल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांची टीका

BRS नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावर आज निकाल

BRS नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावर राउज एवेन्यू कोर्ट आज देणार निकाल

कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी के कविता अटकेत आहेत

कविता यांच्या जमीन अर्जाला ED ने विरोध केला आहे

४ एप्रिलला कोर्टाने या प्रकरणाचा निकाल सुनावणी नंतर ठेवला होता राखून

कोर्ट काय निकाल देत याकडे लक्ष

महादेव जानकर यांची शिंदे गटाच्या इफ्तार पार्टीला दांडी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. रमजान निमित्त शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाथरी येथे काल इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत शिंदे गटाचे जिल्हाभरातील आजी-माजी नगरसेवक, जिल्हापरिषद,सदस्य पदाधिकारी आणि हजारो मुस्लिम बांधवांना बोलावण्यात आले होते. या इफ्तार पार्टीला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते. मात्र, पार्टीला महादेव जानकर हे पाथरी येथील अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दूराणी यांच्या इफ्तार पार्टीला येथेच उपस्थित असताना फिरकले सुद्धा नाहीत, त्यामुळे शिंदे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.