कोल्हापुरात उद्या शक्तिपीठ महामार्ग विरोधी महामोर्चा
शक्तिपीठ महामार्ग विरोधातील मोर्चेकर्यांना पोलिसांच्या नोटिसा आल्या आहेत.
सर्वपक्षीय मोर्चातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना शाहुपुरी पोलिसांकडून नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत.
शाहूपुरी पोलिसांनी सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
मोर्चेकर्यांना नोटीसा पाठवून मोर्चा दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज बैठक घेतली. मैतेई आणि कुकी या दोन्ही समुदायाशी लवकरात लवकर बोलून सरकार मार्ग काढेल, असं आश्वासन गृहमंत्री अमित शाह यांनी दिलंय. यापुढे हिंसाचाराच्या घटना घडू नयेत याची काळजी घेण्याचे शहा यांनी निर्देश दिलेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक होत आहे. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. मविआच्या बैठकीनंतर आत्ता महायुतीत खलबत सुरू झालीय.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी वायनाडचा राजीनामा देणार
प्रियंका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढणार
प्रियंका गांधी अखेर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
राहुल गांधी रायबरेलीमधील खासदारकी कायम ठेवणार
दिल्लीच्या वजिराबाद जलशुद्धीकरण केंद्राजवळील यमुना नदीची पाणी पातळी सामान्यपेक्षा ६फूट खाली गेली आहे. यमुना नदीतील पाण्याची पातळी, जिथे साधारणपणे 674.5 फूट असायला हवी होती, ती सध्या 668.3 फूट झाली आहे.
यवतमाळमध्ये बकऱ्यांचा कळपावर वीज पडल्याची घटना घडलीय. यात २२ शेळ्याचा जागीच मृत्यू झालाय. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चुरमुरा शेत शिवारात ही घटना घडलीय. जिल्ह्यात सकाळपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह रिमझिम पावसाने हजेरी लावलीय.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे.. बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी कोणत्या मतदारसंघाचा राजीनामा देणार यावर चर्चा सुरू आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
ईव्हीएमचा मुद्दा देशभरात गाजत आहे. ईव्हीएम किती सुरक्षित आहे? त्यावर एलन मस्क यांनीही भाष्य केलं. त्यावर आम्ही जास्त बोलणार नाही. वायव्य मुंबईतील जागेची देशभरात चर्चा सुरू आहे. त्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
भाजपची उद्या दिल्लीमध्ये कोर कमिटीची होणार आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी महाराष्ट्रामधील महत्वाचे ते दिल्लीमध्ये जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.38 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. तर अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
पश्चिम बंगालमधील कंचनजंगा एक्स्प्रेसमधील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत या अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धरणखोरे परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
सलग २ तास कोसळल्याने आजूबाजूचे नदी नाले तुडुंब
दहा वर्षापूर्वी या परिसरात मुसळधार पाऊस पडला होता
पश्चिम बंगालमधील ट्रेन दुर्घटनेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मर्मु यांनी एक्स्स मीडियावर पोस्ट करत दुःख व्यक्त केलं.
मुंबईत दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.
या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर तृप्त झाले. या पावासाचा
द्रुतगती मार्ग आणि रेल्वेवर कुठलाही परिणाम नाही.
पश्चिम बंगालमध्ये कंचनगंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 25-30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संजय पांडे नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात ट्रेनचा अपघात झाल्याची घटना घडली. मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरून अपघात झाला. मालगाडीने धडक दिल्याने आग लागल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्यासाठी आपत्ती पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसभेचा स्ट्राइक रेट पाहता शरद पवार गट विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात जयंत पाटील राज्यातील विधानसभा निहाय मतदारसंघाची माहिती घेणार आहेत.
छगन भुजबळांनी समता परिषदेती बैठक बोलावली आहे. वांद्रे येथील एमआयटी येथे बैठक आयोजिक केली आहे. या बैठकीनंतर छगन भुजबळ काय भूमिका मांडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
काश्मीरच्या बंदीपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आला आहे. यानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. अनेक भागात तापमान 50 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात उष्माघातामुळे आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झालाय. बिहारमध्ये तब्बल 128 वर्षांतील रेकॉर्ड उष्णतेने मोडले. वाराणसी, प्रयागराज, कानपूरमध्ये तापमान 46 अंशावर आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा हवामान विभाग आणि डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आलाय.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काही ठिकाणी NEET परीक्षेत गडबड झाल्याची कबुली दिली आहे. यामध्ये कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये (NTA) सुधारणा करण्याची गरज असल्याचही प्रधान यांनी मान्य केलंय.
नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २७ दिवस पुरेल इतकचं पाणी शिल्लक आहे. आगामी ८ दिवसांत पाणीपातळी न वाढल्यास नाशिककरांवर जलसंकट ओढवण्याची शक्यता आहे. जून महिन्यातील पाहिले १५ दिवस पावसाअभावी कोरडे गेल्यानं चिंता वाढली. गंगापूर धरणात २७ दिवस म्हणजेच १२ जुलैपर्यंत शहराला पाणीपुरवठा होईल, इतकाच पाणीसाठा आहे.
धबधब्याखाली बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यात घडली आहे. वेरवली बेर्डेवाडी येथील धबधब्यामध्ये ही घटना घडली. प्रथमेश तळेकर असं या तरुणाचं नाव असून राजापूरमधल्या कळसवलीमधला तो रहिवासी आहे. रविवारी दुपारी प्रथमेश आपल्या मित्रांसोबत धबधब्यामध्ये गेला होता. मात्र पोहत असताना तो त्या ठिकाणी बुडाला. त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आणि उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.