आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ३ कोटी नवीन घर तयार करण्याचा निर्णय
यासाठी ३ लाख ६० हजार कोटी रुपयांना मंजूरी देण्यात आली आहे.
यामध्ये २ कोटी घर ग्रामीण भागात असतील तर १ कोटी घर शहरी भागासाठी असणार आहेत.
याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आजच्या कॅबिनेट बैठकीत ८ मोठे रेल्वे प्रकल्प मंजूर झालेत. एकूण २४६५७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलीय. महाराष्ट्रात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जळगाव ते जालना या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिलीय. ही नवी लाईन आहे. ७१०५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. १७४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. मराठवाड्यातील शेतकरी, उद्योग, सामान्य नागरिकसोबतच मोठ्या सिमेंट उद्योगाला याचा मोठा फायदा होणार आहे. जागतिक दर्जाच्या लेण्या असलेल्या अजेंठा आणि एलोराला जोडलं जाणार आहे. अजेंठा केव्ह रेल कनेक्टिव्हिटी जालना आणि जळगाव असं या प्रकल्पाचं नाव असेल.
म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. पहिल्या दिवशी 246 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेत. 246 पैकी 132 नागरिकांनी अनामत रक्कम देखील केली जमा केलीय.आज दुपारी 12 वाजता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालीय. मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत 246 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर आहे.
पन्नास वर्षीय इसमाची एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. नंदिग्राम एक्सप्रेसच्या शौचालयामध्ये गळ्यातील गमछाने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दादर लोहमार्ग पोलिसांकडून चौकशीला सुरुवात केलीय.
राज ठाकरे बीडमध्ये येतातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
हिंगोलीमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या बसने दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे. औंढा तालुक्यातील गांगलवाडी गावा जवळ हा अपघात घडला आहे, गोलू जुमडे व विशाल मोरे, असे मयत तरुणांची नावे असून दोघेही तरुण पंचवीस वर्ष वयोगटातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाहीर केलेले ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे. हे अनुदान मिळेल असे वाटले आणि शेतकऱ्यांनी उधार उसनवार करून ठिबक व तुषार संच खरेदी केले होते. परंतु आता दोन वर्षानंतरही हे पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत..त्यामुळं हे अनुदान तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूरला लवकरच 1000 खाटांचे एक अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार आहे. या घोषणेची माहिती आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली.पंढरपूरला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात तर वारकऱ्यांची संख्या आणखी वाढते. मात्र, सध्याचे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय या गर्दीला पुरेसे नव्हते. तीर्थक्षेत्र पंढरपूर हे धार्मिक स्थळ असून येथे नेहमीच भाविकांची मोठी संख्या असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. या भावनेतून आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नवीन 1000 खाटांचे रुग्णालय उभारण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 साठी 21 लोकसभा खासदारांची JPC समिती स्थापन
तसेच राज्यसभेला JPC वर नियुक्त करण्यासाठी 10 सदस्यांच्या नावांची शिफारस करण्यास सांगितले
संसदीय कार्य मंत्री किरण रीजुजी यांनी केली घोषणा
समितीत महाराष्ट्रातून अरविंद सावंत, नरेश म्हस्के आणि बळ्यामामा म्हात्रे यांची नियुक्ती
सोबतच हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओविसी यांचा देखील समितीत समेवेश
छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्यातील काही भागांत आज दुपारी जोरदार पाऊस झाला. यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून मोठा पाऊस नसल्यामुळे तळे, नद्या, प्रकल्प आणखी कोरडेठाक आहेत. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्ह्यातील जनतेला आहे. केवळ पिकाला पूरक असा पाऊस असल्यामुळे येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवेल अशी भीती आहे. त्यामुळं आज दुपारी काही भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.
मनोज जरांगे पाटील कोल्हापुरात दाखल झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली.
आज देशात आदिवासी दीन साजरा करण्यात येत आहे. तर गोंदिया जिल्हयात देखिल आदिवासी बांधवांच्या वतीने आदिवासी पोशाख परिधान करून गोंडी नृत्य करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी बांधव गोंदिया येथे आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले तर अनेकांनी गोंडी नृत्य देखिल केलं या रॅलीत हजारोच्या संख्येने जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
विरारच्या नवापुर येथील सेव्हेन सी रिसॉर्ट वर झालेल्या कारवाईनंतर वसईकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. रिसॉर्टवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज हजारो वसईकरांनी अर्नाळा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. मिलिंद मोरे यांचा झालेला मृत्यू हा आकस्मित होता सीसीटिव्ही कॅमेऱ्यात ते स्पष्ट दिसत आहे, मात्र पोलिसांनी व प्रशासनाने ती हत्या ठरवून ११ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. हे चुकीचे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला , त्यामुळे पोलिसांनी वाढविलेला हत्येचा कलम कमी करावे या मागणीसाठी हजारो वसईकर अर्नाळा पोलीस ठाण्यावर धडकले.
वाशिमच्या गोवर्धन इथ चंदनशेष महाराज मंदिरात आज नागपंचमी निमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. नागपंचमीला भरणाऱ्या यात्रेची 3 शतकांची परंपरा असून यासाठी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील हजारो भाविक दाखल होतात. दरम्यान चंदनशेष महाराज मंदिरात भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. चंदन शेष महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी मंदिर परिसर फुलून गेला होता.
मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घालणाऱ्या परिपत्रकावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे. मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे
याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून कॅालेज मध्ये प्रवेश नाकारता येतो का? सुप्रीम कोर्टाचा महविद्यालयाला सवाल
तत्कालीन मंत्री आणि विद्यमान संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांच्या मंत्री आणि आमदारकीच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याकडील असलेल्या रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याचा अतिरिक्त कारभार सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हा रोजगार हमी व फलोत्पादन खात्याचा अतिरिक्त कारभार मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपीविण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात 2022-23 कालावधीतील तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन चे अनुदान मिळाले नसल्याने लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मांडला आहे.. यावेळी संतप्त आंदोलकांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणी कृषिमंत्री यांना साडी चोळी बांगड्यांचा आहेर भेट देत घोषणा दिल्या आहेत.
यवतमाळ शहर पोलिसांनी बनावट प्रमाणात देणाऱ्या दोघांना बीडवरून अटक केली आहे. यवतमाळ येथे 2021 मध्ये पोलीस भरती दरम्यान तहसीलदार बीड यांच्या कार्यालयातून बनावट अंशकालीन प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बीड येथून यवतमाळ शहरमहादेव दत्तात्रय वानरे आणि श्रीराम भैरवनाथ शेजाळ या दोघांना अटक केली आहे.
Nashik News: बेहिशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्यावर ACB कडून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज एसीबीकडून महाजन यांची चौकशी होत आहे. कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42 टक्के जास्त बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच निष्पन्न झाल्यानंतर ACB कडून अनिल महाजन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शरद सोनवणेंनी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली अन त्यांच्या सोबत जेवणाचा आस्वाद ही घेतला. शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात झाली अन जुन्नरमधील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. तिथं सोनवणेंनी हजेरी लावली अन जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच खासदार अमोल कोल्हेसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
मिरारोडच्या पेणकर पाड्यातील गावदेवी निर्बादेवी चे मंदिर आहे. या मंदिरातील दानपेटीतील साडेचार हजार हुन अधिकची रक्कम चोरी करण्यात आली आहे .मंगळवारी दुपारची ही घटना घडली असून ती गुरुवारी सकाळी निदर्शनास आली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरे काही देऊ नये,यासाठी चोरट्या कडून कॅमेरे बंद करण्यात आले होते. या प्रकरणी मंदिराच्या कमिटीच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज धुळ्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्यूमाईन क्लब या ठिकाणी मोठ्या संख्येने मोर्चेकर्यांनी आंदोलन देखील केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेले ठिबक सिंचन योजनेचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी करण्यात यावी तसेच दोन वर्षांपासून न मिळाली पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांची तात्काळ देण्यात यावी, शासनातर्फे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान जाहीर केल्यानंतर ते अनुदान फक्त 50 टक्के शेतकऱ्यांना मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांना ते लवकरात लवकर देण्यात यावे, या आणि आणखी प्रलंबित मागण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे,
पुण्यामध्ये बार्टीच्या विद्यार्थ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. बार्टी 2022 च्या संशोधक विद्यार्थ्यांनी 50 टक्के अधिछात्रवृत्ति देणाऱ्या निर्णयाविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न केला. बार्टी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
नवी मुंबई एअरपोर्टला दि .बा.पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नागरी उड्डयन मंत्री यांच्याकडे केली. रत्नागिरी व चिपी विमानतळाचाही विकास करण्याची मागणी त्यांनी केली. पायाभूत सुवीधेसाठी ठेवण्यात आलेल्या निधी पैकी 1 लाख कोटी रुपयांचा निधी देण्याची त्यांनी मागाणी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ३ दिवसांचा महाराष्ट्राचा झंझावाती दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्व. १६, १७ आणि १८ ऑगस्ट रोजी अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ६ विभागाचा हा दौरा असणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांशी विभागवार चर्चा करणार आहेत.
केशवराव भोसले नाट्यगृहात लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे नाही. शॉर्ट सर्किटने आग लागली असती तर मीटर ट्रीप झाले असते. मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महवितरण अधिकाऱ्यांनी विद्युत वाहिन्यांची तपासणी केल्यानंतर माहिती दिली.
भारतीय जवान किसान पार्टीच्या ट्रॅक्टर मोर्चाला वाघोलीतून सुरुवात झाली. २८ ट्रॅक्टर आणि इतर चारचाकी वाहनांचा मोर्चात समावेश. विभागीय कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. मोर्चात पार्टीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील सहभागी होणार आहेत. मोर्चात ३०० शेतकरी सहभागी झाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात जन सन्मान यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी यात्रेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. हडपसर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून यात्रा काढली जाणार आहे. पुण्यातील सारसबाग या ठिकाणाहून होणार यात्रेला सुरुवात होणार आहे.
बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो
ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली.
बारवी धरणातून भागवली जाते संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान
भाजपच्या वर्सोवा मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वर्सोवा विधानसभेसाठी आपल्याला तिकीट देण्यात यावी अशी मागणी केली. लोकसभेत मुस्लिम मतांमुळे भाजपच्या स्थानिक आमदार भारती लव्हेकर या पिछाडीवर असल्याने इथे शिंदे गट खिंड लढवू शकते आणि ही जागा जिंकू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केली आहे.
मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
० महाड परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस
० सलग तासतासभर कोसळत आहेत जोरदार पावसाच्या सरी
० जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, परिस्थिती नियंत्रणत
० नदी, नाल्यांचा प्रवाह सर्वसामान्य
क्रांतीदिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे ऑगस्ट क्रांती मैदानाबाहेर आदित्य ठाकरे हजर झाले. यावेळी पोलिसांनी आदित्य ठाकरे यांना अडवलं. ऑगस्ट क्रांती मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. घटनास्थळी गोंधळ होऊ नये, यासाठी आदित्य ठाकरे यांची रॅली अडवली.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जेल की बेल याचा फैसला आज होणार आहे.
मनीष सिसोदिया यांच्या ED आणि CBI प्रकरणातील जामीन अर्जावर सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार आहे.
ते कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सिसोदिया अटकेत आहेत.
न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के व्ही. विश्वनाथन यांचं खंडपीठ सकाळी 10.30 वाजता देणार निकाल
जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी यांचे आज पुण्यात आंदोलन
ससून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन
ससून रूग्णालयातील परिचारिकांनीही देखील आज सकाळी निदर्शनं केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यातील वाहतूकोंडी आणि खड्डे यांचा दौरा करणार आहेत. त्यापूर्वी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंद नगर, टोल नाका या ठिकाणी वाहतूकोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. लांबच लांब रांगा लागल्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आणि शेतकऱ्यांवरील आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी पुण्यात भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघणार
ट्रॅक्टर मोर्चा हा विधानभवनावर धडकणार आहे. भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेचा संयुक्त मोर्चा
सकाळी ११ वाजता विधानभवनार २५ ते ३० ट्रॅक्टर घेऊन शेतकरी करणार मोर्चा
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमाबंदीचा आदेश
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल आग लागली.
या परिसरात बघायची गर्दी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाचे आदेश
पालघर - मनोर रोडवरील गणेश घाट येथे दुचाकीस्वारा भरधाव कारने चिरडले
अपघातात दुचाकीस्वार सागर पाटील (चांबले ता.वाडा ) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
सागर आपल्या कामावरून घरी परतत असताना घडला अपघात
कार चालकाला मनोर पोलिसांनी केली अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेचा आज दुसरा दिवस आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात
येवल्यात शेतकरी आणि पैठणी कामगारांसोबत चर्चा करणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजित पवार येवल्यात महिलांशी संवाद साधणार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.