कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहला भीषण आग लागलीय. भीषण आगीमुळे नाट्यगृह जळून खाक झाले आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबाग मैदानाच्या बाजूने ही आग लागलीय. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक मान आहे. अनेक अजरामर नाटकांचे सादरीकरण येथे झालं आहे.
कुस्तीपटू विनेश फोगटचा अर्ज CAS ने सुनावणीसाठी स्वीकारला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. विनेशने आपल्या अपात्रतेविरुद्ध CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) मध्ये अपील दाखल केल होत. विनेशने मागणी केली आहे की, तिला संयुक्त रौप्य पदक देण्यात यावं.क्रीडा न्यायालयाने विनेशला सुनावणीसाठी तिचा वकील नेमण्यास सांगितलं. ही सुनावणी भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी १२.३० वाजता होणार आहे.
मुंबईच्या बोरीवली पश्चिमेकडील शिंपोली परिसरात ड्रेनेजमध्ये सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. बोरिवली पश्चिमेकडील शिंपोली डीजे पालकर वर असलेल्या ड्रेनेज लाईन मध्ये सफाई करत असताना ही दुर्घटना घडली आहे या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना कळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दोघांनाही ड्रेनेज मधून बाहेर काढले मात्र यात एका कामगाराचा मृत्यू झाला तर दुसरा कामगार जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी एडीआर दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आणि नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक होत आहे. थोड्याच वेळात बैठकीला होणार सूरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीच आयोजन करण्यात आले आहे. आमदार समाधान अवताडे, राजेद्र राऊत, राम सातपुते, सुधीर गाडगीळ बैठकीला सागरवर दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील बैठक संपली.नवी मुंबईमध्ये अक्षता म्हात्रे तरुणीची निघृण हत्या करण्यात आली होती.अक्षता म्हात्रे खूनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे. बैठकीसाठी दोन्हीही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहे. आज रात्री ११ वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
श्री क्षेत्र भिमाशंकरला देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याने भिमाशंकर मंचर मार्गावर वाहतुककोंडी नित्याचीच झाली असुन भिमाशंकर मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असुन पाऊस धुक्यातुन मार्ग काढत भाविकांचा प्रवास सुरुय दरम्यान अल्प पोलीस कर्मचारी असल्याने वाहतुककोंडी सोडविण्यासाठी अडथळा येत असल्याने भिमाशंकर रस्त्यावर शिवसैनिक उतरुन भाविकांची वाहतुककोंडीतुन सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
रायगड जिल्ह्यातील मराठा समाज निवडणूक रिंगणात उतरणार असून विधानसभेच्या ७ ही जागा लढण्याची तयारी केली आहे. मराठा समन्वयक विनोद साबळे यांनी ही घोषणा केली आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना रायगड मधून जोरदार समर्थन मिळालं आहे. त्यामुळे रायगडमधील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला तर त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तातडीने काम सुरू करा, कारणं सांगून टोलवाटोलवी करू नका, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकाऱ्यांना तंबीही दिली आहे.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची शाखा नागपूर येथील संस्थेचा विस्तार आता भोसरी येथे होणार आहे. तसंच पुणे - पिपरी - चिंचवड मेट्रोचा विस्तार होणार असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. याबाबतचे विकास आराखडे सादर करण्याचे आदेश आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांची विकासकामासंदर्भात बैठक बोलवली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्याचा गेम चेंजर म्हणून ओळखला जाणार वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी ४ वा वाढवन बंदर प्रकल्पा संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं पालघर येथे होणाऱ्या वाढवण ऑल वेदर ग्रीनफील्ड बंदराच्या निर्मितीला मान्यता दिली आहे.
राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे,आमदार ज. गो.अभ्यंकर, उपनेत्या विशाखा राऊत आदी उपस्थित होते.
राज्यात मोबाईल चोरीचे प्रमाण हे वारंवार घडत असतात मात्र तक्रार देऊनही मोबाईल मिळणे हे कठीण होते. मात्र मुंबईमधील परिमंडळ ७ मधील मुलुंड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आज तब्बल 140 मोबाईल हे परत देण्यात आले CDR , SDR चे विश्लेषणाच्या आधारे तांत्रिक तपास करून तसेच केंद्र सरकारचे CEIR द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे मोबाईल मिसिंग व चोरी मधील एकूण 140 मोबाईल हस्तगत केले आणि सदर मोबाईल मूळ मालकाला परिमंडळ साथ पोलीस उपयुक्त पुरुषोत्तम कराड त्यांच्या हस्ते परत देण्यात आले.
नवी दिल्ली :
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी ५.३० वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार
ठाकरे कुटुंबीय आणि खासदार संजय राऊत यांच्यासह गांधी यांच्या निवासस्थानी होणार भेट
पनवेलमधील हरिग्राम गावात पोषण आहारात किडे आढळलेत. राज्य सरकारकडून 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे आढळले. पोषण आहार म्हणून कीड लागलेले चणे विद्यार्थ्यांना देण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल रात्री राज ठाकरे यांचे नांदेडमध्ये आगमन झाले. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला होता. राज ठाकरे यांना विरोध करणाऱ्या मराठा आंदोलकांवर नांदेडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या २४ तासांत चोरट्यांनी औंढा तालुक्यातील ३ गावात ४ घरे फोडून सोने-चांदी आणि रोख रक्कम पळवली. तर सेनगाव शहरात देखील चोरट्यांनी मध्यरात्री दोन मेडिकल, मिठाई दुकान आणि मोटार मशनरी दुकान फोडून रक्कम पळवली.
पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाकडून पुरग्रस्तांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात होणार आहे. तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन आणि त्यानंतर महापालिकेच्या दिशेने जाणार आहे. पुण्यातील काही भागाला नुकताच पुराचा मोठा फटका बसला. या पुरग्रस्ताच्या विविध मागण्यासंदर्भात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेस आक्रमक झाले आहेत. अनुराग ठाकूर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गाढवाला अनुराग ठाकूर यांची प्रतिमा लावून चपलाचा हार घालत केला निषेध व्यक्त करण्यात आला. अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बारामतीतील तीन हत्ती चौक सध्या चर्चेचा बनला आहे. हा मुख्य चौक असून त्याचे सुशोभिकरण केलं जातंय परंतु हा चौक पॅरिसच्या धर्तीवर केला जातोय. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने मनसेने आंदोलन केले आहे. या चौकाला भुलभुलया चौक नाव द्यावे तसेच हा पूलाचा आराखडा रद्द करावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. तीन हत्ती चौक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. तसेच पोलिसांचा देखील ताण वाढल्याचं मनसेचे म्हणणं आहे.
बांग्लादेशामध्ये अराजकता पसरली आहे. त्यांचा फटका महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सांगोला येथील डाळिंब उत्पादक शेतकरी शशिकांत येलपले यांचे 2 ऑगस्ट रोजी बांग्लादेशात निर्यात केलेले 50 टन डाळिंब कोलकतामध्ये अडकून पडले आहे. तर दोनशे टन निर्यातक्षम डाळिंब सांगोल्यामध्ये पडून आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
नागपूर शहरातील रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांच्या विरोधात युवक काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात चिंचभवन उड्डाण पुलावर नागपूरकडून वर्धाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे याना पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 42 हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर आपला हक्क सांगितला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक , माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक आदित्य फत्तेपूरकर यांनी काँग्रेस कमिटीकडे पंढरपूर मधून उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. माढानंतर आता काँग्रेसने पंढरपूरवर हक्क सांगितल्याने महाविकास आघाडीमध्ये गुंता वाढला आहे.
नेमबाज स्वप्नील कुसळे यांनी दगडूशेठची आरती केली. आरती झाल्यानंतर कुसळे बालेवाडी स्टेडियम कडे रवाना झाला आहे. बालेवाडी येथे त्याची मिरवणूक काढली जाणार असून तो मिरवणुकीनंतर माध्यमांशी संवाद साधणार आहे.
पंतप्रधान मोदी १० ऑगस्ट रोजी वायानाडला जाणार आहेत. तिथे जाऊन मोदी एरियल सर्वे करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरड कोसळल्यामुळे वायनाडची सध्याची स्थिती काय आहे, त्याची पाहणी करणार आहेत.
कांदाप्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलंय. गळ्यात कांद्याच्या माळा घालून खासदारांच्या संसदेच्या मकरद्वारावर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा त्यांनी दिल्या आहेत.
राज्यात एकीकडे पावसाने पूरस्थिती निर्माण केलीय, दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले, तरी बीड जिल्ह्यातील नद्या अद्यापही कोरड्या ठाक आहेत. यामुळे बीडकरांचे लक्ष मात्र ढगाळ असणाऱ्या आभाळाकडं लागलेलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. सिंहगड रोडवरील उभारण्यात आलेला पूल बांधून पूर्ण झालाय, पण वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे.
रस्तेवरील खड्डे आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलवली महत्त्वाची बैठक
नॅशनल हायवे मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे.
या बैठकीत राज्यातील नॅशनल हायवेंची स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
धरणालगतच्या गावांना आता मिळणार शुद्ध पाणी
पुणे महानगरपालिकेकडून उभारण्यात येणार नवा जलशुद्धीकरण प्रकल्प
खडकवासला धरणालागत असलेल्या गावांना होणार या नव्या प्रकल्पाचा फायदा
धरणालगतच्या या 7 ते 8 गावांना आतापर्यंत मिळत होत गढूळ पाणी ,याच गावांसाठी महापालिका उभारणार 170 MLD क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प
धरणलगत असणाऱ्या धायरी, नांदेड, नांदोशी, खडकवासला,नऱ्हे या गांवाना होणार फायदा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाण्याची शक्यता
मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची शक्यता
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांसोबत असलेली बैठक झाली होती रद्द
आज पुन्हा एकदा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत होण्याची शक्यता
ठाणे बेलापूर मार्गावर रात्री एसटी बसचा अपघात
ठाणे महाड एसटी बसचा झाला अपघात
ऐरोली स्टेशन जवळ एसटी बस चढली दुभाजकावर
बसमध्ये 40 ते 45 प्रवासी प्रवास करत होते.
काही प्रवासी किरकोळ जखमी.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी रात्री त्यांचे नांदेडमध्ये आगमन झाले. आगमन होताच मराठा आंदोलकांनी त्यांच्यासमोर घोषणाबाजी करत त्यांना विरोध केला होता. राज ठाकरे नांदेड शहरातील सिटी प्राईड हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले आहेत. मराठा आंदोलकांनी विरोध केल्याने सिटी प्राईड हॉटेलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नागपूर येथून निघत असलेली मंडल जनजागृती यात्रा ही गोंदिया शहरात पोहोचली. गोंदिया शहरातील फुलचुर नाका याठिकाणी भर पावसात गोंदिया येथील ओबीसी कार्यकर्त्यांकडून मंडळ यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गोंदिया शहरातील विविध चौकामधून मार्गस्थ होत यात्रा ग्रीन लॅन्ड लॉन येथे पोहोचली. या ठिकाणी या यात्रेचा समारोप कार्यक्रम करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका
अजित पवार यांना निवडणूक आयोगाने पक्ष चुकीच्या पद्धतीने दिल्याचा शरद पवार यांच्या पक्षाचा दावा
याच दिवशी नागालँड आमदार अपत्रता प्रकरणी सुनावणी होणार
खरीप हंगामात कुठल्याही शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, याकरिता कृषी विभागाच्या वतीने सतर्क राहत भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. पेरणीच्या काळात जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली होती. यावेळी काही संशयास्पद बियाणे, खत आणि कीटकनाशके आढळल्याने 843 नमुने घेण्यात आले होते. यापैकी 30 नमुने हे फेल नापास झाल्याचं प्रयोगशाळेतील तपासणीनंतर समोर आले आहे.
काँग्रेसच्या लोकसभा खासदारांची आज बैठक होणार आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलावली बैठक
सकाळी १० वाजता संसद भवनातील पक्ष कार्यालयात होणार बैठक
आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे. त्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.