नाशिक मुंबई महामार्गावर पिंपरी फाटा ते बोरटेंभापर्यंत वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या २ ते ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंड असल्याने नाशिकहून मुंबईकडे जाणारी वाहने, समृद्धी महामार्गाचे इंटरचेंज असलेला पिंपरी फाटा इथून मुंबईला परतीच्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
एक्सिट पोल वेळी लोकं बोलायचे काय बोलतोय, त्यावेळी मी बोलायचो भाजप 240 पुढे जात नाही. मला लोकांच्या मनात काय ते कळतं. मन की बात मध्ये तुम्ही जे बोलतायत ते जनतेच्या मनात नाही. तुम्ही जे बोलताय ते जातीमध्ये वाद निर्माण करण्याचे बोलत आहात. जिथे 80 मधून 72 सीट आल्या त्या अयोध्येत पण विजय सपा चा झाला. रामाचा जिथे आहे तिथे भाजपची एकही सीट आलेली नाही.
परळी शहरातील बँक कॉलनी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात, आरोपी बबन गित्ते यांना मदत करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परळी शहर पोलिसांनी केज परिसरात ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर या गोळीबार प्रकरणात आरोपीने वापरलेल्या 3 गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत.
मानवी तस्करी प्रकरणात नौदल अधिकाऱ्याला अटक करण्यात आलीय. लेफ्टनंट कमांडर विपिन डागर यांच्यानंतर आता जॉब रॅकेटचा मास्टरमाईंड sub-lieutenant ब्रहम ज्योतीला अटक करण्यात आलीय. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई केलीय.
उद्या विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या ३ जागांसाठी झालेल्या मतदानांचा निकाल लागणार आहे. यासाठीची मतमोजणी आगरी कोळी संस्कृती भवन, नेरुळ पश्चिम (सेक्टर २४), येथे सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होणार आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक संपलीय. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.
हिंगोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाने औंढा जिंतूर राज्य मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. पुंगळा गावानजीक हा पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून चांदणी नदीला पूर आला आहे. चांदणी नदीवरील पुलावरून लोक जीव धोक्यात घालून वाहने चालवत आहेत. पुलाची उंची कमी असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्याआधी मंत्री अनिल पाटील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. बैठकीत विधान परिषदेच्या उमेदवारांची नाव निश्चित होणार आहेत. राजेश विटेकर यांच नाव जवळजवळ निश्चित तर दुसरा उमेदवार कोण?, याची उत्सुकता आहे.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी पदभार स्वीकारला आहे. सुजाता सैनिक १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला स्वीकारला आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील राज्याचे मुख्य सचिव होते.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत पुणे पोलीस यांच्यावतीने करण्यात आलं. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. मोठं नियोजन पुणे पोलीस दरवर्षी करत असतात.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन झालं आहे. पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यातील एफ सी रोड वर भाविकांची गर्दी झाली आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा काहीच एफ सी रोड दाखल होणार आहेत.
राष्ट्रीय समाज पक्ष यांनी विधान परिषदेतील 11 जागांमधील एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे ती जागा मिळालीच पाहिजे. केंद्रात राज्यसभेची एक जागा मिळाली पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत 50 जागेची मागणी असून सध्या104 जागेवर तयारी आहे, मात्र 200 जागेवर तयारी करा महायुती आपली दखल घेईल, अशा सूचना महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकारिणी चिंतन बैठकीत केल्या आहेत.
भुशी धरणावर पर्यायासाठी आलेली एक महिला आणि ४ मुलं बुडाली होती. त्यातील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका महिलेचा आणि एका लहान मुलीचा मृतदेह सापडला आहे. वर्षा विहरासाठी पुण्यातून एक कुटुंब आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर आज सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांची नाव निश्चित होणार आहे. त्यामध्ये राजेश विटेकर यांच नाव जवळजवळ निश्चित झालं आहे तर दुसरा उमेदवार कोण याची उत्सुकता लागली आहे.
भुशी धरणावर पर्यायासाठी आलेली एक महिला आणि ४ मुलं बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील वाशिंद व आसनगाव या ठिकाणी उड्डाण पूलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने उड्डाण पूलाच्या कामाचा मनस्ताप मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना होत असून दररोज या ठिकाणी 5 किलोमीटर च्या लांबच लांब रांगा लागत असल्याने महामार्ग प्रवाशांसह स्थानिक जनतेला सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कोल्हापुरात पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मोरेवाडी आणि मोतीनगरात पोलिसांनी छापेमारी केली. अवैध गावठी दारू हातभट्ट्या राजारामपुरी पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. सहा जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे मनमाडसह परिसरात आगमन झाले आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात मध्येच काही काळ ऊन पडल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. मात्र काही वेळापासून सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून या पावसाचा फायदा मका, बाजरी, भुईमूग या पिकांना होणार आहे.
पावसाळ्यामध्ये लोणावळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाच बातमी आहे. लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. लोणावळा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी टीम इंडियाचे कौतुक केले. 'भारतीय संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. देशाला अभिमान वाटेल असा खेळ संपूर्ण संघाने काल केला आणि वर्ल्ड कप जिंकला.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
पनवेलकरांवरील पाणी संकट आता टळलेय. मागील दोन दिवसांपासून माथेरानच्या डोंगर रांगेत चांगला पाऊस झाल्याने पनवेल शहराला पाणी पुरवठा करणारे देहरंग धरण पूर्णपणे भरलेय. माथेरान डोंगर रांगाच्या पायथ्याशी 127 हेक्टर क्षेत्रावर पनवेल मनपाचे देहरंग धरण असून जोरदार पावसामुळे हे धरण भरलेय. धरण भरल्याने पनवेल शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा निर्णय पनवेल मनपातर्फे घेण्यात आलाय.
आज तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचे पुण्यनगरीत आगमन होणार आहे. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी हे धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणारं आहेत. वारीत सहभागी होण्याआधी भिडे गुरुजी यांनी दरवर्षी प्रमाणे जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले. भिडे गुरुजी यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र भरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल झाले आहेत.
मोरेवाडी आणि मोतीनगरात पोलिसांची छापेमारी केली असून अवैध गावठी दारू हातभट्ट्या राजारामपुरी पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आल्या आहेत. जेसीबी मशीनच्या सहाय्याने हातभट्ट्या उध्वस्त करत सहा जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक लाख पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत सहा जणांवर गुन्हे दाखल
परभणी जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. यंदा जिल्ह्यात पाच लाख 63 हजार हेक्टरवर खरीप क्षेत्र प्रस्तावित असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.यंदा गतवर्षाच्या तुलनेत कापसाचा पेरा वाढणार असून सोयाबीनचा पेरा तब्बल 21 हजार हेक्टरने कमी होणार असल्याचे कृषी विभागाच्या प्रस्तावित अहवालात आहे. पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने दिला होता त्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकरी व कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पूर्वतयारी केली,तसेच बळीराजाही पेरणीपूर्व मशागत करण्यात आली पण जून महिण्यात थोडा फार पाऊस पडला तर संपूर्ण जून महिना कोरडा गेला.
एकात्मिक बाल योजना अंतर्गत अंगणवाडी मधील मुलांना देणाऱ्या कडधान्यात आळया आणि उंदराच्या लेंड्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. राष्ट्रवादीच्या काँग्रेस रिक्षा संघटनाचे अध्यक्ष संदिप काळेंकडून ही बाब उघडकीस आणण्यात आली. या प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार तर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिल जाणार अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पडत राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
बारामती लोकसभा क्षेत्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दापोडी येथे पती सदानंद सुळे यांच्यासोबत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकार तर्फे वारकऱ्यांच्या दिंडीला दिल जाणार अनुदान म्हणजे हा एक जुमला आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारे अनेक जुमल्यांचा पाऊस पडत राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलेली होती आणि आज अचानक पावसाची दमदार बॅटिंग धुळ्यात बघावयास मिळाली आहे, पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, त्याचबरोबर या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना देखील होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण बघावयास मिळत आहे.
कोस्टल रोड भुयारी मार्गामध्ये गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली. भरधाव वेगाने जात असताना चालकाचं नियंत्रण सुटले आणि भुयारी मार्गातील भिंतीला जाऊन गाडी धडकली. सुदैवाने या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नाही मात्र कोस्टल रोडवर रविवारचा दिवस असल्यामुळे गाडी धावत नाही आणि याच गोष्टीचा फायदा घेत बीएमडब्ल्यू कार चालक भरधाव वेगाने गाडी चालवत होता
राज्यात महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला पत्र लिहित आभार मानले आहेत.
"राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचे भक्कम पाठबळ लाभले.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे, असे त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.
राज्य सरकारने मोराची पिसे अथवा साहित्य विक्रीला बंदी घातलेली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मोरांची शिकार करून मोरपिसांची विक्री करणे हा गुन्हा आहे. शिकार करून मोरपिसे विकणाऱ्याला तीन वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे कुठेही मोरपीस विक्री होत असेल तर वनविभागाला संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन सेवा प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. समाधान माळी असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत २६ जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २५) या विवाहितेची हत्या करण्यात आली होती. ज्यामध्ये तो आरोपी होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा १११ वा भाग आज प्रसारित होत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आईच्या आठवणींना उजाळा देत एक पेड माँ के नाम या अभियानाची घोषणा केली.
उत्तर नगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.. सुरुवातीला झालेल्या थोड्या पावसानंतर शेतक-यांनी काही प्रमाणात पेरण्या केल्या होत्या.. मात्र पाऊस नसल्याने बहुतांश ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत.. किमान जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी काही शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली आहे.
सायन रेल्वे स्थानकासमोर ११० वर्षे जुना पुल जड वाहतुकीसाठी काल रात्रीपासून बंद करण्यात आलाय.. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा महत्वाचा पुल आहे. पुल बंद केल्या मुळे सायन रुग्णालय येथील पुलावरून जड वाहतूक सुरू असणार आहे. पुढील दोन वर्षात रेल्वे हा पुल बांधून पूर्ण करणार आहे..
नाशिकरोड परिसरात मध्यरात्री दोन गटात राडा झाल्याचे समोर आल आहे. दोन गटाच्या राड्यात बंदुकीतून गोळीबार आणि कोयत्यांचा वापर करण्यात आला असून गोळीबारात एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.
अजित पवारांना मोठा धक्का! पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह १६ नगरसेवकांनी मोदीबागेत शरद पवाराची भेट घेतल्याचे समोर आले आहे. आज पुन्हा विलास लांडेंच्या उपस्थितीत शरद पवार यांची भेट होणार असून पाच जुलैला प्रवेश होण्याची शक्यता आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी जो उमेदवार देईन तो इंडिया आघाडीचा आहे. काँग्रेसचे नाव दिल्लीवरून येईल. विधानपरिषदेसाठी माझं नाव डिक्लेअर झालेलं आहे, असे ते म्हणाले.
नांदेडच्या कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रम नगरपरिषदे हटविले. पोलीस बंदोबस्तामध्ये या रस्त्यावर नगरपरिषदेने ही अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. अतिक्रमण केलेल्याना दोन दिवसापुर्वीच नगरपरिषदेकडून तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या.
दरम्यान यापुर्वी देखील नगरपिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहिम रबवण्यात आली होती. मात्र परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अनधिकृत दुकान, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते.
नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर नगरपरिषदेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्थानकापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये सर्व अतिक्रमणे हटवण्यात आले. अतिक्रमण हटवल्यामुळे कंधार शहराने मोकळा श्वास घेतला आहे
छत्रपती संभाजीनगर शहरातही भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. रात्री शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोष दिसून आला. गुलमंडी परिसरात नागरिकांनी आणि क्रिकेट प्रेमी तरुणांनी एकच जल्लोष केला.
हातात तिरंगा झेंडा घेऊन भारत माता की जय अशा घोषणा देऊन विजय जल्लोष साजरा केला. यात वृध्द ते लहान मुलांपर्यंत सर्वच सहभागी झाले. महिलांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला, फटाके फोडून गाण्यांच्या तालावर ठेका धरत युवकांनी जल्लोष साजरा केला.
तर दुचाकी आणि चार चाकी वाहनांमधून देखील हातात तिरंगा घेऊन तरुणाईने विजयाचा जल्लोष साजरा केला.
बनावट पासपोर्ट रॅकेट प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई
लोअर परेल आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
१४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह एकूण 35 जणांवर तब्बल 12 गुन्ह्यांची नोंद
मुंबई आणि नाशिकमध्ये ३५ ठिकाणी सीबीआयच्या धाडी
पासपोर्ट कार्यालयातील दलाल आणि पासपोर्ट कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांमधील साटलोट उघड
धाडींमध्ये गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र आणि तांत्रिक पुरावे मिळाल्याचा सीबीआयचा दावा
पैशांच्या मोबदल्यात बनावट कागदपत्रांच्या आधारावर पासपोर्ट मंजूर करत असल्याचा आहे आरोप
पासपोर्ट सेवा केंद्रातील अनधिकृत व्यावहावर सीबीआयचा कारवाईचा बडगा
बुलढाणा जिल्ह्याच्या घाटनांद्रा येथील एका आश्रमावर दारू सोडवण्यासाठी आलेल्या जालना जिल्ह्यातील माळेगाव येथील राजेश राठोड या व्यक्तीला आश्रमातील शिवाजी पुंडलिक बर्डे उर्फ शिवा महाराज याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता, या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दाखल घेत, सदर व्यक्तीचा शोध घेऊन, राजेश राठोड यांनी रायपूर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार महाराजांवर भांदवी कलम 324, 323, 294 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तळोदा तालुक्यातील धनपूर नियत क्षेत्रात असलेल्या एका शेतात मृतअवस्थेत बिबट्या आढळून आला असून बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याची प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. तीन वर्षे वय असलेल्या बिबट मध्ये असून अमृत बिबट्याचे दात आणि मिशा सर्व सुरक्षित आढळून आले आहेत. चारही पायांचे नख पंजे आणि कातडी सुरक्षित असल्याची माहिती असून विजेच्या धक्क्याने बिबट्याचा पाय भाजलेला अवस्थेत असून वीज प्रवाहाचा तारेला स्पर्श झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनविभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
मराठवाड्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरीही 1479 गावांना 1027 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. हीच टँकरची संख्या आठ दिवसापूर्वी 1700 च्या वर होती. मात्र काही ठिकाणी पाऊस पडल्याने यामध्ये घसरण होऊन टँकरची संख्या घटली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 363 गावांना सद्यस्थितीला 560 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून मराठवाड्यात सर्वाधिक टँकरची संख्या या जिल्ह्यात आहे. दरम्यान यंदा मे महिन्यात ओढावणारी स्थिती एप्रिल महिन्यातच निर्माण झाल्याने नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावं लागलं होतं.
जून महिन्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा असताना नाशिकमध्ये मात्र डेंग्यूचा कहर पाहायला मिळतोय. एकटा जून महिन्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे 161 बाधित रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढलीय. जानेवारी ते मे या पाच महिन्यात शहरात डेंग्यूचे अवघे 110 रुग्ण असतानाच जून महिन्यात मात्र अचानक डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय.
तर एका संशयित रुग्णाचा देखील मृत्यू झालाय. विशेष म्हणजे 161 बाधित रुग्ण हा केवळ सरकारी आकडा असून प्रत्यक्षात खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जातंय.
त्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली असून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पालिकेने नोटिसा आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलाय.
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला - नांदेड महामार्गावर मेडशी गावाजवळ असलेल्या वळण रस्त्याला वाहतूक सुरू केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात तडे गेल्याची बाब समोर आलीये. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकाम दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
कोट्यावधी रुपये खर्च करून हा महामार्ग तयार केला जातोय. मात्र वाहतूक सुरू झाल्यानंतर उद्घाटना आधीच डागडुजी करण्याची वेळ कंत्राटदारावर आलीये. त्यामुळे या महामार्गाच्या गुणवत्तेची तपासणी करूनच वाहतूक सुरू करावी अशी मागणी प्रवाशांनी केली.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासकांनी होर्डिंग एजन्सी धारकांना आता पुन्हा एकदा इशारा दिलाय. गेल्या 5 वर्षापासून होर्डिंग एजन्सी धारकांकडे महापालिकेचे तब्बल 6 कोटी 90 लाख रुपये रक्कम थकलेली असून व्याजासहित ही रक्कम आता दहा कोटीच्याही वर गेली आहे.
मात्र,वारंवार सूचना आणि नोटीसा देऊन देखील होर्डिंग वाल्यांनी ल्यांनी ही रक्कम भरली नसल्याने थकीत रक्कम भरली नाही तर एकही होर्डिंग लागू देणार नाही, असा कडक इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिलाय. दरम्यान शहरात असणाऱ्या धोकादायक होर्डिंग आणि टॉवर पाडण्यासाठी एक तज्ञ समिती नेमली जाईल असेही प्रशासकांनी सांगितलय.
सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम झाली आहे. भल्यापहाटे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहनांच्या लांबच रांगला लागल्या आहेत. घाटातील दत्त मंदिर कॉर्नर जवळ एक गाडी बंद पडल्यामुळे पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.