Marathi News Live Updates : वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 25 september : आज बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, आमदार अपात्रता सुनावणी, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News 27 June 2024
Today's Marathi News Live By Saam TV [29 June 2024]Saam TV

Mumbai News: वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर

वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर

मुंबईत ऐकणार विविध संस्था-समाजघटकांची मतमतांतरे

वक्फ विधेयकावर संसदेची संयुक्त समिती गेले अनेक दिवस अभ्यास, चर्चा करत आहे

देशभरातून १.२ कोटींहून जास्त मत-मतांतरे समितीला प्राप्त झाली आहेत

Dhangar Reservation: धनगर आरक्षण आंदोलकांनी‌ घेतले विठ्ठलाचे दर्शन

धनगर आरक्षण आंदोलकांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर आज विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर सहा ही उपोषणकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज नगरकडे रवाना झाले. छत्रपती संभाजी महाराज नगर येथील जातपडताळणी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिपक बोराडे,माऊली हळणवर, योगेश धरम आदी आंदोलनकर्ते रूग्णवाहिकेतूनच रवाना झाले.

Nashik News: अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये रस्त्यांवर तुंबले पाणी

अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये रस्त्यांवर तुंबले पाणी

- अवघ्या काही तासांच्या पावसाने शहरात वाहतूक देखील विस्कळीत..

- केंद्रीय गृहमंत्री शहरात येणार असताना देखील नियोजन ढासळले...

- द्वारका परिसरात पाणी साचले, तर मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी

- नियोजन शून्य कारभाराचा नाशिककरांना देखील फटका

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! राजेश टोपे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मंगळवारी जाऊन भेट घेतली. मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा वाहनांची तोडफोड

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात गावगुंडांनी पंधरा-वीस वाहनांची केली तोडफोड केली आहे. तर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत एका गावगुंडाने चार-पाच वाहनांची केली तोडफोड केल्याचा प्रकार घडला आहे.

Buldhana News : रोहना नदीला महापूर, बुलढाणा-नागपूर वाहतूक 2 तासांपासून खोळंबली

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बुलढाणा-नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला असून 2 तासापासून वाहतूक खोळंबली आहे. या पावसाने तालुक्यातील पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेकडो एकर पिकांची नासधूस

भंडारा जिल्ह्यात काही दिवसाआधी आलेल्या अतिवृष्टीमुळे नदी काठावरील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात करपा हा रोग लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धान पिकाला याचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात धान पीक देखील जमीन दोस्त झालेले आहेत. नदी काठावरील शेकडो एकर शेतशिवारात करपा लागल्याने अगदी कापणीवर आलेले धानपिक सुकत चाललेले आहे.

Raigad News : पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळली

रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर मंगळवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव गेत दरड हटवण्याचे काम केले. रात्री १ वाजेनंतर वाहतूक पूर्वरत झाली.

Jammu-Kashmir Election : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जम्मू काश्मीरमधील 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मोठ्या उत्साहात मतदान पार पडतंय. दुसऱ्या टप्प्यात 25.78 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील 26 जागांपैकी 15 जागा मध्य काश्मीरमधील आणि 11 जागा जम्मूमधील आहेत.

 Latur Terana River : तेरणा नदीने ओलांडली धोक्याचे पातळी

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. औसा तालुक्यातील उजनी परिसराला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उजनी गावातल्या बाजार चौकात पाणी साचले आहे. प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com