Marathi News Live Updates: कोलकत्ता आणि बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरात डॉक्टरांचा भव्य मोर्चा

Maharashtra Breaking News Live Updates : आज बुधवारी दिनांक २१ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील पावसाचे अपडेट्स, बदलापूर अत्याचार प्रकरण, भारत बंद, शिवसेना प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Chandrapur:  कोलकत्ता आणि बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरात डॉक्टरांचा भव्य मोर्चा

पश्चिम बंगाल येथे डॉक्टर तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करत हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आयएमएच्या वतीने भव्य मोर्चा चंद्रपुरात काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता. गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला यावेळी डॉक्टरांनी आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी केली आहे.

संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या बहिणींची लूट

संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पांरूडी गावातील प्रकार

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे काढण्यासाठी ग्राहक केंद्र चालकांकडून ३० रुपये शुल्क आकारला जात आहे.

समता परिषदेच्या मंजिरी घाडगे यांचा एनसीपी शरद पवार पक्षात प्रवेश

गेल्या २२ वर्षापासून त्या समता परिषदेच्या अध्यक्षा होत्या. पक्षात प्रवेश करताच मंजिरी घाडगे यांना प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये पोलीस पुत्राची निर्घृण हत्या

आज सकाळी नाशिक शहरातील पंचवटी परिसरात एका 25 वर्षी तरुणाची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाच नाव गगन कोकाटे असून तो राहणार मसरूळ परिसरातील होता.

Badalapur Protest :  आंदोलकानवरील गुन्हे मागे घ्या - नाना पटोले

सरकारच्या आदेश, स्थानिक आमदार शिंदे गटाचे काही लोकांच्या दबावाने लाटीचार्ज करण्यात आला. हे सरकार सत्तेचा दुरपयोग करत आहेत. आंदोलकानवरील गुन्हे मागे घ्या, असे नाना पटोले म्हणाले.

Crime News : पोलिसाच्याच घरी चोरी, आरोपीला फेकल्या बेड्या

पोलिसांच्याच घरांमध्ये चोरी करणारा सराईत चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. कमृद्दीन शेख,४४ नावाच्या सराईत चोराला माहीम पोलिसांनी जेरबंद केलं.

माहीम पोलीस वसाहतीतील १३ पोलिसांच्या घरी घरफोडी केली होती. पोलीस वसाहतीत एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्याने उडाली खळबळ होती. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केलं होतं. कमृद्दीन शेख वर घरफोडी आणि चोरीचे आठ गुन्हे नोंद आहेत. आज कोर्टात हजर केलं असता आरोपीची २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

आजपासून शरद पवारांना CRPF अंतर्गत केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा

आज पासून शरद पवारांना CRPF अंतर्गत केंद्र सरकारची झेड प्लस सुरक्षा देण्यात आलीय. एकूण अतिरिक्त केंद्र सरकारचे आजपासून शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी १० कमांडोसोबत असणार आहेत. काही वेळापूर्वी शरद पवार यांच्याशी केंद्र सरकारच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे यावेळी शरद पवार यांनी CRPF ची सुरक्षा स्वीकारली आहे.

Congress Meeting: नंदुरबार येथे काँग्रेस कमिटीची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होणार

काँग्रेस कमिटीची उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक उद्या नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, यांच्या सह अनेक नेते नंदुरबार जिल्ह्यात दाखल होणार असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आढावा बैठक होत असल्याने या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

बदलापूर घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

बदलापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अतिशय निंदनीय असून त्या घटनेबाबत नाशिक जिल्ह्यातील शाळेतील सुरक्षेचा आढावा पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षेखाली घेतला. आजच्या बैठकीत उपस्थितांनी या घटनेचा निषेध केला. यावेळी जिल्हाभरातील शिक्षण संस्थेचे संस्थाचालक प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री दादा भुसे यांनी कालच्या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील संस्थाचालक तसेच प्रतिनिधी समवेत बैठक आयोजित करून जिल्हाभरात काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासंदर्भात आढावा घेतला.

बदलापुरातील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ नागपुरात महिला काँग्रेसकडून आंदोलन

बदलापूर अत्याचार घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. नागपुरातही या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले. ग्रामीण महिला काँग्रेसने संविधान चौकात निदर्शने केले. अश्या घटना काळिमा फासणाऱ्या असून सरकारने घटनेला दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.

कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीसोबत कारमध्ये होते तीन मित्र

अल्पवयीन आरोपीसोबत गाडीत दोन नाही तर तीन मित्र होते. १९ मे रोजी घडलेल्या अपघातग्रस्त पोर्शे कारमध्ये मागे ३ जण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोर्शे कारमध्ये पुढे अल्पवयीन तरुणाच्या शेजारी ड्रायव्हर आणि मागे ३ मित्र असल्याचे तपासातून समोर आले आहे. अपघात घडला तेव्हा तिसऱ्या तरुणाने पळ काढला होता. अल्पवयीन तरुणाच्या २ मित्रांचे रक्ताचे नमुने देखील ससून रुग्णालयात बदलले गेलेत.

Beed : परळीत दिग्गज नेत्यांच्या रॅलीला सुरुवात; शिवराज सिंह चव्हाण पंकजा मुंडे यांची ओपन जिप्सीमधून रॅली

परळी शहरात जंगी स्वागत करत आता रॅलीला सुरुवात झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवराज सिंह चव्हाण, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची ओपन जिप्सीमधून रॅली काढण्यात आलीय. तर काही क्षणात होणार राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Hingoli :  हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही जागा शिवसेना लढविणार: भास्कर जाधव

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्या विधानाने महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेत मिठाचा खडा पडला आहे, कारण पक्ष संघटनेच्या आढावा बैठकीसाठी मराठवाड्याच्या हिंगोलीत दाखल झालेल्या भास्कर जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत शिवसेना ठाकरे गट हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर दावा करणार असल्याची माहिती दिली.

Kolhapur : सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोल्हापूर बंदची हाक

सकल हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदची हाक दिलीय. बांगलादेश येथे घडलेला हिंदू समाज्यावरील अत्याचार आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी एकवटणार आहे.

Amravati : शेतीचं काम करताना विजेचा धक्का लागून बैलजोडीचा मृत्यू

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वरखेड गावातील ही घटना घडलीय. शेतात डवरणीचं काम करत असताना विजेच्या धक्क्याने बैलजोडीचा मृत्यू झालाय. शेतातील वाकलेले वीज पोल आणि खाली लोबंलेल्या वीज तारेचा बैलजोडीला स्पर्श झाल्याने दोन बैलांचा मृत्यू झालाय.

Krushi Melava: परळीतील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांची हजेरी

परळीत आजपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला सुरूवात होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे परळीत दाखल झालेत. एकाच हेलिकॉप्टरमधून तिघे नेते आलेत. तर काही वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होणार दाखल.

Worli Hit And Run Case: वरळी हिट अँड रन प्रकरण; आठ दिवसात उत्तर देण्याचे पोलिसांना निर्देश

मुख्य आरोपी मिहिर शहा आणि त्याच्या ड्रायव्हरच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात पोलिसांना 29 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडीठासमोर सुनावणी झाली. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मिहिर शहाची उच्च न्यायालयात हेबीएस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली होती.

आदिवासी बांधवांचा नाशिकमधील कळवणमध्ये चक्का जाम एल्गार

13 जिल्ह्यातील 17 संवर्ग पेसा नोकर भरती स्थगिती उठवून तात्काळ नोकर भरती करावी यासाठी नाशिक शहरात मागील 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र यावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज चक्का जाम आंदोलनाचा हत्यार आदिवासी बांधवांनी हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरू आहे.

Raj Thackeray News: मनसेमुळे जनआक्रोशाला तोंड फुटलं, बदलापूर प्रकरणावरुन राज ठाकरेंची खरमरीत पोस्ट 

बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.

मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?

जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.

Badlapur Case: बदलापूर प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक, मंत्रालयासमोर आंदोलन

बदलापूर येथील घटनेच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईत ठिकठिकाणी या घटनेचा आणि सरकारचा निषेध होत आहे. काँग्रेसनेही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मंत्रालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

Pune News: पूजा खेडकर प्रकरण: पुण्यात दिल्ली क्राईम बँचचा तपास

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचचा सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात पूजा खेडकर प्रकरणी तपास सुरू आहे. ⁠पूजा खेडकर प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांमध्ये जाऊन क्राईम ब्रँच अधिकारी करत तपास आहेत. ⁠काल म्हणजे मंगळवारी दिल्ली क्राईम ब्रांचने अहिल्यानगर येथे जाऊन याप्रकरणी तपास केला होता.

MPSC Exam News: MPSC परीक्षेची तारीख बदलणार, देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. आज दुपारी तीन वाजता एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.

Pune News: पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, सुप्रिया सुळेंनी भेट दिली

 पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले तसेच याबाबत सरकराशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

Maharashtra Band: ब्रेकिंग! २४ तारखेला 'मविआ'कडून महाराष्ट्र बंदची हाक

बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधकही आक्रमक झाले आहेत. अशातच या घटनेनंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Maharashtra Politics: नितीन पाटील यांच्याकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके आदी उपस्थित होते.

Dhule News: बदलापूर प्रकरणाचे पडसाद, धुळ्यात विराट मोर्चा

बदलापूर अत्याचाराचे पडसाद धुळ्यात देखील उमटताना बघावयास मिळाले आहे, ऊबाठा शिवसेनेच्या वतीने बदलापूर घटनेचा निषेध म्हणून आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, या निषेध मोर्चाच्या माध्यमातून बदलापूर येथील घटनेचा निषेध ऊबाठा शिवसेनेच्या वतीने नोंदविण्यात आला आहे, यावेळी या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आरोपी नाराधामास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील संतप्त आंदोलकांनी केली आहे,

Badlapur School Case: बदलापूर आंदोलन प्रकरण! ६८ जणांना अटक

बदलापूर रेल्वे आंदोलन प्रकरण!

बदलापूर रेल्वे रोको आंदोलन आणि तोडफोड प्रकरणात ६८ जणांना अटक करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी २८ आणि बदलापूर पोलिसांनी ४० जणांना अटक केली आहे.आंदोलनसाठी वापरण्यात आलेले व्हॉईस रेकॉर्डिंग आणि फोन पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. १०० पेक्षा जास्त लोक फरारी दाखवण्यात आले आहेत. रेल्वे ॲक्ट, सरकारी मालमत्ता नुकसान, कामात अडथळा आणणे, पूर्वनियोजित गुन्हेगारी कट, सरकारी कर्मचाऱ्यांना जखमी असे गुन्हे दाखल केले आहे. आंदोलन पूर्व नियोजित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Badlapur News: बदलापूर प्रकरणावरुन ठाकरे गट रस्त्यावर, घाटकोपरमध्ये आंदोलन

बदलापूर येथील घटनेच्या विरोधात शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज रस्त्यावर उतरला आहे. मुंबईत ठिकठिकाणी या घटनेचा आणि सरकारचा निषेध होत आहे.घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शिवसेना ईशान्य मुंबई च्या वतीने आंदोलन करण्यात आले.या वेळी हाती फाशीचा दोर घेऊन महिलांनी आरोपीला फाशी देण्याच्या मागणी केली.जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन करण्यात आले. ही शाळा भाजप ची असल्याने या विरोधात कारवाई ला दिरंगाई होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीची जागा वाटपावरील सुनियोजित बैठक रद्द

महाविकास आघाडीची जागा वाटपावरील सुनियोजित बैठक बदलापूर येथील घटनेमुळे रद्द झाली आहे. आज जागा वाटपावर कोणतीही चर्चा होणार नाही, केवळ बदलापूरच्या घटनेवर तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार आहेत.

Sangli News: सांगलीत एकावर कुऱ्हाडीने हल्ला; तरुणाचा मृत्यू

मिरज तालुक्यातील दुधगावमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये हात तुटून तरुणाचा मृत्यू झाला. शुभम मुळे (वय 24) असे मयत तरुणांचे नाव तर अनिल केपाडे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.

Nanded News: नांदेडमध्ये बसवर दगडफेक

नांदेडमध्ये उमरखेड आगाराच्या बसवर दगडफेक झालीय.नांदेड ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव महादेव फाट्यावर घटना घडली.एसटी बसच्या समोरील काचा अज्ञातांनी फोडल्या. बस वाहकाकडून अर्धापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट असून 25 ते 30 लोकांनी बस वर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

Ahmednagar News: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नगरमध्ये विद्यार्थ्यांची निषेध रॅली..

बदलापूर घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यभर उमटतांना दिसत आहे...या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगरच्या हिंद सेवा ट्रस्ट संचलित मेहेर इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थिनींनी रॅली काढली...शाळेपासून या रॅली सुरूवात झाली तर रलीची सांगता अहमदनगरच्या दिल्ली गेट परिसरात झाली...या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी रलितील सहभागी महिलांनी केली...या रॅलीतील एका चिमुकलीने हातात दोरी घेऊन आणि संबंधित आरोपीचा फोटो घेऊन फाशीची मागणी केली.

Nandurbar News: कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा

पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करीत तिची हत्या करण्यात आली, या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात पसरत असून याच्या निषेधार्थ नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नंदुरबार शहरात मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर वर होणाऱ्या घटनेत वाढ झाली असून शासनाने डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कड़क कायदा काढला पाहिजे त्यासोबत ज्या आरोपींनी अत्याचार केलेला आहे त्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर नर्सेस आणि इतर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्या असून नंदुरबार शहरातील नेहरू चौक या परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली असून नेहरू चौक गांधी चौक दगडी चाळ नगरपालिका या मार्गस्थ करत या घटनेच्या निषेध केला...

Nashik News: पालघर जिल्ह्यात बंद, नागरिकांचा रास्ता रोको

नाशिक येथे सुरू असलेल्या पेसा भरती संदर्भातील आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यात बंद पाळण्यात येत असून ठीक ठिकाणी रास्ता रोको ला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार ,मोखाडा , वाडा तालुक्यात चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलन कर्त्यांनी जव्हार व मोखाडा तालुक्यातील डाहाणू - जव्हार - मोखाडा - नाशिक महामार्गावर चक्का जाम आंदोलनला सुरवात केली आहे. मोखाडा तालुक्यातील बिरसा मुंडा चौक तर जव्हार बस स्थानकातील बस देखील अडवण्यात आल्या आहेत.

Kolhapur News: सकल हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदची हाक!

बांगलादेश इथे घडलेला हिंदू समाज्यावरील अत्याचार आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी एकवटणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांच्या व्हाट्सअप स्टेटसवर कोल्हापूर बंदचे संदेश ठेवण्यात आले आहेत.

Gondia News: राज ठाकरेंचे गोंदियात आगमन, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा असुन आज ते गोंदिया येथिल रेल्वे स्टेशन वर पोहचले आहेत. रेल्वे स्टेशन वर पोहचताच कार्यकत्यांनी ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केला आहे. इथून हॉटेल ग्रँड सीता येथे जाणार असुन दुपारी दिड वाजेला कार्यकर्त्यांशी संवाद साधनार आहेत.

Pooja Khedkar News: पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; २९ ऑगस्टपर्यंत अटक नाही

पूजा खेडकर अटकपूर्व जामीन प्रकरणावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने पूजाला 21 ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण विचाराधीन असताना पूजाला तत्काळ अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाने म्हटलं होते. आजही सुप्रीम कोर्टाने पूजा खेडकरला दिलासा दिला असून 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

Mumbai News: प्रत्येक शाळेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा', पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश

प्रत्येक शैक्षणिक संस्थेत एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश. बदलापूर घटनेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना मंत्री लोढांचे आदेश. शैक्षणिक संस्थेत आत्मरक्षणासाठी अभियान सुरु करा. शैक्षणिक संस्थांमधील चालक, वाहक, कँटीन कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची पोलीस पडताळणी बंधनकारक करा. महिला पालकांची समिती नेमून प्रत्येक महिन्याला सुरक्षा आढावा घ्या.

Mumbai News: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण योजना आणा,  ठाकरे गट आक्रमक

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून तक्रार नोंदवून घेण्यास उशीर झाल्यामुळे काल बदलापूर रेल्वे स्थानकात जन आक्रोश पाहायला मिळाला आता याच प्रकरणावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून संपूर्ण मुंबईत शिवसेना महिला आघाडी कडून निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रवक्ता संजना गाडी यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं असून या मोर्चाला मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिकांनी गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे. यावेळी आंदोलक महिलांनी आरोपी अक्षय शिंदे याला फाशी झालीच पाहिजे या सोबतच लाडकी बहीण योजना नको तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना आणा अशी मागणी यावेळी आंदोलक महिलांकडून करण्यात आली. आंदोलक महिलांनी सरकार विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.

Kolhapur News: स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणुकीत पोलिसांचा अतिरेक

ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळे याची कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक निघाली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार पाहायला मिळाला. स्वप्निल कुसाळे यांच्या मिरवणुकीत कोल्हापूरकरांना पोलिसांनी रोखलं.माध्यम प्रतिनिधींना वार्तांकन करत असताना पोलिसांकडूनच झाली धक्काबुक्की. शालेय विद्यार्थी मिरवणुकीत आणून मिरवणूक पार पाडण्याचा जिल्हा प्रशासनाचा घाट.अनेक ठिकाणी पोलिस आणि नागरिकांची वादावादी

 Pune News: भोर तालुक्यात भात लावण्या उरकल्या

पुणे जिल्ह्यातील भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोर तालुक्यात भात लावण्या उरकल्या. जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकांसाठी पोषक पाऊस आणि वातावरण मिळाल्यान भात पिकाच्या लावण्या पूर्ण. तालुक्यातील सरासरी ७ हजार ६१० हेक्टरवर भाताची लागवड. दरवर्षीप्रमाणे यंदाही इंद्रायणी, आंबेमोहोर, कोलम यांसारख्या पारंपरिक भात बियाण्यांची शेतकऱ्यांकडून लागवडी. पिकाला दमदार पाऊस आणि पोषक वातावरण मिळाल्याने, यंदा उत्पादन जास्त मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

Badlapur News : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी कल्याण कोर्टात हजर

बदलापूर लैंगिक अत्याचाराला आरोपीला कल्याण कोर्टात हजर केलं आहे. आरोपी अक्षय शिंदेवर चिमुरडीवर लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

Pune News : पुण्याच्या बालगंधर्व चौकात बदलापुरातील अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू

पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन सुरू आहे. कोलकत्ता आणि बदलापूर येथील दोन निष्पाप मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे. सरकार विरोधी घोषणा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.

Bhor News : पुण्यातील भोर तालुक्यात भात लावण्या उरकल्या

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भात लावण्या उरकल्या आहेत.

जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पिकांसाठी पोषक पाऊस आणि वातावरण मिळाल्यान भात पिकाच्या लावण्या पूर्ण झाल्या आहेत.

भोर तालुक्यातील सरासरी ७ हजार ६१० हेक्टरवर भाताची लागवड झाली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही इंद्रायणी, आंबेमोहोर, कोलम यांसारख्या पारंपरिक भात बियाण्यांची शेतकऱ्यांकडून लागवडी

पिकाला दमदार पाऊस आणि पोषक वातावरण मिळाल्याने, यंदा उत्पादन जास्त मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

Narendra Modi Ukraine tour :  पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड-युक्रेन दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पोलंड आणि युक्रेन दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाले.

गेल्या ४५ वर्षातील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच पोलंड दौरा

त्यानंतर पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार

रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर मोदींचा पहिलाच युक्रेन दौरा

मागच्या काही महिन्यांपूर्वीच मोदींनी रशियाला देखील भेट दिली होती.

Nashik News : नाशिकमध्ये सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची हत्या

नाशिकच्या शहरातील पंचवटीत मेरी परिसरात असलेल्या सीआयडीऑफिसजवळ सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. आज पहाटेच्या दरम्यान हत्या झाल्याचा अंदाज आहे.

Chhatrapati Sambhajinagar Flood : छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड येथील गल्हाटी नदीला महापूर

तब्बल तीन महीन्यानंतर छत्रपती संभाजीनगर पाचोड येथील गल्हाटी नदीला महापूर...

छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड परिसरामध्ये रात्री अचानक जोरदार पावसामुळे येथील गल्हाटी नदीला महापूर

या पुरामुळे पाचोड खुर्द आणि पाचोडचा तब्बल सहा तास संपर्क तुटला होता.

pimpri Chinchwad fire : पिपंरीत गॅस सिलिंडर ब्लास्ट

पिपंरीच्या बौद्धनगर येथे गॅस सिलिंडर ब्लास्ट

गॅस सिलिंडर ब्लास्टमध्ये पाच जण जखमी

अग्निशमनदल घटनास्थळाकडे रवाना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व दूर पावसाची हजेरी; अनेक पिके गेली पाण्याखाली

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अंतरवाली खांडी आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशीचे पीक हे पूर्णतः पाण्याखाली गेलं असून शेतांना तलावाच स्वरूप आल्याने मोठं नुकसान आता शेतकऱ्यांचं होणार आहे. गुडघ्या इतक्या पाण्यात ही कपाशी आणि अन्य इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चींतेच वातावरण निर्माण झाले.जवळपास 3 तास झालेल्या या मुसळधार पावसामुळे आजपासचे छोटे-मोठे तलाव देखील भरले आहे.

Badlapur News : बदलापूरच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग

बदलापूरच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे.

जिल्ह्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालयात समिती स्थापन करण्याच्या सूचना

किशोरवयीन मुला-मुलींना सखी सावित्रीचा आधार

शालेय विभागाने जारी केले आदेश

2022 साली काढला अध्यादेश होता

दोन वर्षात अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही.

Amravati News : अमरावतीत सोयाबीनचे भाव कोसळले

हंगामापूर्वीच अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे भाव कोसळले.

हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्याकडून सोयाबीनची खरेदी.

अमरावतीत शेतकरी पुन्हा चिंतेत

हमीभावा नुसार सोयाबीनला प्रतिक्विंटल 4 हजार 892 रुपये दर मात्र बाजारपेठेत मिळतोय 4 हजार ते 4200 इतकाच दर..

सोयाबीनच्या क्विंटल मागे शेतकऱ्यांचे 600 ते 800 रुपयाचे नुकसान.

mangaldas badal : मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक

मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडी कडून बांदल यांना रात्री उशिरा अटक

अटक करत मंगलदास बांदल यांना मुंबईला नेण्यात आलं

आज दुपारी बांदल यांना मुंबई कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती

रात्री साडेअकरा वाजता ईडी कडून बांदल यांना अटक

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी मंगलदास बांदल यांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com