Marathi News Live: उद्धव ठाकरे यांचा 15 सप्टेंबर रोजी शिर्डी आणि संभाजीनगर दौरा

Maharashtra Breaking News Live today : आज सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV
Published On

उद्धव ठाकरे यांचा 15 सप्टेंबर रोजी शिर्डी आणि संभाजीनगर दौरा

शिर्डीत पेन्शन योजना आंदोलनात सहभाग घेणार आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी शिर्डी येथे पेन्शन राज्य महा – अधिवेशन आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने 15 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे पेन्शन राज्य महा-अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.

सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; खटकाळ नदीला पूर

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला, निमखेडी, नांदगाव आणि कडी वडगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. यामुळे घोसला येथील खटकाळ नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने सोयगाव चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळ बंद झाली. सुमारे पाऊण तास हा ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू होता यामुळे छोटे-मोठे ओढे खळखळून वाहायला लागले.

केडीएमसी अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल; आमदार भोईर यांची संतप्त प्रतिक्रिया

विकासकामांची गुणवत्ता तपासणारा अधिकारी जर पैसे घेत असेल तर तो काय गुणवत्ता देत असेल ..शहराला गुणवत्तापूर्वक काम पाहिजे. त्यामध्ये लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला शिवसेना स्टाईलने फटकवणार असा सज्जड इशारा शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिलाय .केडीएमसी च्या दक्षता गुणवत्ता नियंत्रण विभागातील अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडियो व्हायरल झाला होता याप्रकरणी आमदार भोईर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन

जळगाव महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज संध्याकाळी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. तसेच खासदार आमदार व अधिकारी यांनीही स्वागत केले. विमानतळावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.

Akola NCP: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अजित पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन

अकोल्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी केलीय. दरम्यान सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आलाये.. शेतकऱ्यांच्या शेतातल्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाही, पेरणीचा खर्च निघत नाहीये. हीच परिस्थिती अनेक भागात आहे. त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी केलीय.

MSRTC:  गणपतीसाठी तब्बल अडीच लाख चाकरमानी एसटी बसने कोकणात दाखल

गणपती उत्सवासाठी मुंबई,ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे अडीच लाख पेक्षा जास्त चाकरमानी एसटीने आप-आपल्या गावी म्हणजे कोकणात गेल्या ५ दिवसात रवाना झाले आहेत. तब्बल ५००० पेक्षा जास्त बसेस द्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ३ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे अडीच लाख पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे.

Assembly Election:  नाशिक मध्य विधानसभेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा?

पक्षाने संधी दिल्यास नाशिक मध्य विधानसभेतून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणालेत. आपण मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याच म्हटलंय. लोकसभा निवडणुकीवेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेनंतर अजय बोरस्ते यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.

CM Eknath Shinde : १५ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी कुटुंबीयांची भेट घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra Politics : विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाराज

विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाराज

या जिल्हाध्यक्षाची नागपुरात बैठक

जिल्हाध्यक्षांना सत्तेत असतांना शासकीय समित्यावर स्थान नाही, जिल्हाध्यक्षाचा पत्रांना मंत्र्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्यान काम होत नाही, असा त्यांचा आरोप

लोकसभेत विदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाला काही मिळालं नाही. आता येणाऱ्या विधानसभेत तरी जागा मिळाव्यात यासाठीची मागणी आहे.

Maharashtra assembly Election : असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून विधानसभेसाठी ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

संभाजीनगर - इम्तियाज जलील

सोलापूर- फारुख शब्दी

मालेगाव - मुफ्ती इस्माईल

धुळे - फारुख शहा

मुंबई - फैयाज अहमद खान

nashik News : नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्याकडून २८ कोटींचा जीएसटी घोटाळा

-नाशिकमध्ये भंगार व्यापाऱ्याकडून २८ कोटींचा जीएसटी घोटाळा झाल्याचे उघड झालं आहे.

- बनावट कंपन्या स्थापन करून कोट्यावधींचा जीएसटी घोटाळा

- पत्नी, भाऊ आणि भाच्यांच्या नावावर दाखवल्या बनावट कंपन्या

- बनावट कंपन्यांच्या नावावर तब्बल १५० कोटींचे खरेदी विक्री व्यवहार दाखवत जीएसटीचे २८ कोटी रुपये पदरात पाडून घेतल्याचं उघड

- केंद्रीय जीएसटी पथकाकडून भंगार व्यापाऱ्याला अटक

mahanirmiti Worker News : महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समितीच्या आंदोलनाला यश

महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना कृती समिती आंदोलनाला यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिगृह येथे झालेल्या बैठकीत कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. या बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित होते.

Pune News : पुण्यात कोयता हल्यात तरुणाचा मृत्यू

पुण्यात कोयता हल्यात तरुणाचा मृत्यू

उत्तमनगरमध्ये मित्रानेच मित्रावर कोयत्याने केले होते वार,काल दुपारची घटना उत्तमनगरमधील घटना

जयदीप भोडेकर वय २२ अस मयत तरुणाचे नाव तर आरोपी अमित गुजरला उत्तमनगर पोलिसांनी केली अटक

उत्तमनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

उत्तमनगर मासेअळी मधील घटना

Devendra fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ, आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन

मार्च 2024 पासून ही वाढ लागू होणार

पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच झाली होती.

आरोग्यासाठी महात्मा फुले जनारोग्य योजनेत 'टॉप अप' करून वेगळी योजना तयार करा

बैठकीला सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख उपस्थित. धनंजय मुंडे ऑनलाईन उपस्थित

छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी बसचा अपघात; दोन तरुणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरातील मधुर डेअरी समोर एसटी बस आणि मोपेड बाईक भीषण अपघात झाला आहे या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. आदिनाथ राहीज आणि ओम तायडे अशी या तरुणांची नावे असून ते कन्नड शहरातून अंधानेर फट्याकडे चहा पिण्यासाठी जात होते त्याचवेळी वडनेरकडून कन्नड कडे येणाऱ्या एसटी बस सोबत हा अपघात झालाय. दरम्यान मयत झालेले दोन्ही तरुण हे पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं आहेत.

खासदार गोवाल पाडवी यांनी केली नंदुरबार रेल्वे स्थानकाची केली पाहणी

Summary

नंदुरबार रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समाविष्ट झाल्याने रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला प्रवाशांसाठी तिकीट घर त्याचप्रमाणे स्थानक परिसरात कार्यालयांसाठी सुसज्ज इमारत तसेच विकलांग आणि वयोवृद्ध प्रवाशांसाठी लिफ्ट तसेच इतर सुविधा करण्यात येणार आहेत रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्थानक परिसराची पाहणी केली यावेळी माजी मंत्री आमदार के सी पाडवी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 Mumbai News : शिवसेनेचे नेते महेश गायकवाड वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

शिवसेनेचे नेते महेश गायकवाड वर्षा बंगल्यावर बाप्पांच्या दर्शनासाठी दाखल झालेत. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसहीत बाप्पाचं दर्शन घेतलं. महेश गायकवाड यांच्यावर कल्याण भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता.

Amravati News: अमरावतीत भरदिवसा बांगरे ज्वेलर्समध्ये झाली चोरी 

अमरावतीच्या महादेव खोरी मार्गावरील उत्तम नगरातील बांगरे ज्वेलर्समध्ये भरदिवसा चोरी झालीय. दीड किलो चांदी, 20 ग्राम सोने यासह नगदी 30 हजार रुपये असा एकूण 2 लाख 50 हजाराचा मुद्देमाल लंपास झालाय. घटनास्थळी अमरावती शहर पोलीस दाखल झाले होते. फ़्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Manoj Jarange : राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठका होणार ; मनोज जरांगे

बीडमध्ये मनोज जरांगे यांची आज घोंगडी बैठक होत आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात घोंगडी बैठका होणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिलीय.

Pune News : पुण्यात कोयता हल्यात तरुणाचा मृत्यू

पुण्यात कोयता हल्यात तरुणाचा मृत्यू झालाय. उत्तमनगरमध्ये मित्रानेच मित्रावर कोयत्याने वार केले होते. काल दुपारची घटना उत्तमनगरमधील घटना आहे. जयदीप भोडेकर, असं मयत तरुणाचे नाव तर आरोपी अमित गुजरला उत्तमनगर पोलिसांनी अटक केलीय. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

Hingoli News : हिंगोली शहरातील सव्वा लाख नागरिकांचा ७ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद 

हिंगोलीत आलेल्या महापुरामुळे हिंगोली शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेलीय. त्यामुळे हिंगोली शहरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर झालाय. हिंगोली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. पुढील काही दिवस हे काम सुरू राहणार असल्याने हिंगोली शहरातील एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांना शुद्ध पाणी पैसे देऊन खरेदी करावे लागत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांनी विहिरी व बोरवेलचे पाणी उकळून प्यावे, असे आवाहन हिंगोली पालिकेसह आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mahayuti Seat Sharing :  महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला ; अमित शाह

महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शाह यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना दिलीय. ज्या जागा निवडून येतील त्यांचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या शाह यांनी सूचना दिल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांची पुन्हा दिल्लीत बैठक पार पडणार आहे. जागा वाटपांबाबत दिल्लीत अंतीम चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांची एकुण 45 मिनिटं अमित शाह यांच्यासमवेत चर्चा झालीय.

Pune News : पुण्यात अवतरले हुभेहूब वृंदावन 

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा आकर्षक देखावे सादर केले आहेत. याच निमित्ताने शनिपार मंडळाने तर चक्क देखावा म्हणून वृंदावन उभारलं आहे. ब्रजभूमीचा प्रत्येक काना-कोपरा भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलेचा साक्षीदार आहे. या देखाव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्यांच्या किशोरावस्‍थेपर्यंतच्या घटनांच्या खुणा आहेत. जे भाविक उत्तर प्रदेश राज्याच्या मथुरा जिल्ह्यातील या पुण्यक्षेत्रात अद्याप गेले नसतील त्यांच्यासाठी हा देखावा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

Amit Shah: मुंबई दौऱ्यानंतर अमित शहांनी मुंबई विमानतळावर घेतली महत्वाची बैठक

अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यानंतर मुंबई विमानतळावर पार पडली महत्त्वाची बैठक. दोन दिवसांत अमित शहा यांच्या दौऱ्यात न दिसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.

Nagpur News: धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार गटाच्या वाटेवर

धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच शरद पवार गटात करणार प्रवेश. शिव स्वराज यात्रेच्या माध्यमातून 12 तारखेला गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत पक्ष प्रवेश करणार आहेत.

Pandharpur News: धनगर आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी उपोषणकर्त्यांमध्ये राडा

धनगर आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी उपोषणकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे. धनगर समाज आंदोलनात किती जणांनी उपोषणाला बसायचं यावरून सभा सुरू आहे. उपोषण स्थळीच कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली.

Sharad Pawar: लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा, भाजप नेत्यांची शरद पवारांवर टीका

शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा असल्याची टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली. एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे. ज्ञानेश्वर महाराज यांनी पवारांच्या उपस्थितीत हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचाही त्यांनी समाचार घेतला.

Jayakwadi Dam: संभाजीनगरमधील जायकवाडी धरण ९७ टक्के भरले

संभाजीनगरमधील जायकवाडी धरण ९७.३० टक्के क्षमतेने भरले. धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी ०.५ फुटाने उघडण्यात आले. धरणातून ३१४४ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

Eknath Shinde : वर्षा' निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन

Summary

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना 'शासन आपल्या दारी' पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले.

शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा

शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा होय. एकीकडे ज्ञानेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं, हे ढोंग आहे.
भाजपचे नेते प्रवीण दरेकर

Rain update : पर्लकोटा नदीला पूर, भामरागड मधील दुकानं, घरे पाण्याखाली

अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाले ओसांडून वाहत आहेत तर भामरागडच्या पार्लकोटा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले. त्यामुळे अनेक दुकाने घरे पाण्याखाली आहेत. हवामान खात्याने नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Ajit Pawar News: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला अजित पवारांची दांडी

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आजच्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला दांडी मारली आहे. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर केवळ एकदाच बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिलेत. अजित पवार मागील बैठकीला उपस्थित न राहिल्याने शरद पवार गटाने अजित पवारांवर निशाणा साधला होता. आज पुन्हा अजित पवार बैठकीसाठी अनुपस्थित आहेत. अजित पवार यांच्याऐवजी अदिती तटकरे बैठकीसाठी दिल्लीला गेल्याची सूत्रांची माहिती

Manoj Jarange Patil: अब्दुल सत्तार यांच्याशी शेतकरी प्रश्न, आरक्षणाबाबत चर्चा: मनोज जरांगे

सत्तार साहेब त्या दिवशी आले होते त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती दिली. सागे सोयरे मागणी, हैदराबाद गॅझेट मागणी आणि शिंदे समिती काम करत नाहीत त्यांनी रेकॉर्ड शोधला पाहिजे नोंदणी शोधल्या पाहिजे. ते सीएम साहेबाला डीसीएम साहेबाला बोलले ही माहिती त्यांनी सांगितली, आणखीन सुद्धा बोलणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

Ulhasnagar Fire News:  उल्हासनगरमध्ये बिस्कीट कंपनीला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

 उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारमध्ये एका बिस्कीट कंपनीला आगलागल्याची घटना घडली आहे. दलसान फूड कंपनीत ही आग लागली असून आगीत कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत. 

Nashik News: धावत्या रेल्वेमध्ये झाली प्रसुती, गोंडस बाळाला दिला जन्म

धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती; गोंडस मुलाला दिला रेल्वेतच जन्म

- मुंबईहून गोरखपूरला निघालेल्या कृषीनगर एक्सप्रेस मध्ये सर्वसाधारण डब्यात महिलेची प्रसूती झाली. इगतपुरी सोडल्यानंतर रिफा यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या मात्र गाडी थेट नाशिकरोड येथे थांबणार असल्याने तो पर्यंत प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना कळवत पुढे स्थानिक डॉक्टर आणि आरोग्याची यंत्रणा तयार ठेवली होती. देव.ळाली कॅम्प हे स्थानक सोडताच महिलेने मुलाला जन्म दिला. नाशिकरोड स्थानकात गाडी पोहोचतात महिलेसह मुलाला महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले.

Nashik News : राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नाशिक दौऱ्यावर

राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्यपाल पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सी पी राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावर आहेत. ते शासकीय योजनांसंदर्भात नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. प्रशासकीय कामकाजाचा आढावा देखील घेणार आहेत. दिवसभरात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञांशी देखील राज्यपाल संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Beed News : बीड जिल्ह्यात 143 पैकी 80 प्रकल्प 100 टक्के भरले

बीडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बीड जिल्ह्यातील 143 पैकी 80 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. 1 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती पूर्णतः बदलून गेली आहे. जिल्ह्यातील 143 लहान-मोठ्या धरणात एकूण 58 टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. गणपती आगमनाच्या दिवशी बीड शहरासह अनेक ठिकाणी पाऊस झाला, त्यामुळे वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. लहान-मोठ्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू असल्याची सुखद वार्ता आहे. अद्यापही अनेक धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू आहे. हळूहळू सर्व प्रकल्प भरतील, अशी शक्यता आहे.

Pune  News : पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी चालक आशिष पवार याला अटक

पुण्यातील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी चालक आशिष पवार याला अटक करण्यात आली आहे. पुणे शहरातील कर्वे रस्त्यावर काल रात्री ९.१५ वाजता एका पिक अप ट्रक ने ४ ते ५ वाहनांना धडक दिली. यानंतर तिथे असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती श्रीकांत अमराळे आणि इतर जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

Mumbai Police : माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक दिगंबर पगार यांचं निलंबन

माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक दिगंबर पगार यांचं निलंबन

गुजरात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली कारवाई

सायबर गुन्ह्याशी निगडित संशयित आला अटक न करण्याच्या नावाखाली दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचा आहे आरोप

पगार यांच्यासह मध्यस्थी असलेल्या जेमिन सवालिया विरोधात राजकोट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे गुन्हा दाखल

तर सवालिय याला १० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हाथ अटक

Eknath Shinde : अयोध्या पोळ यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप 

अयोध्या पोळ यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याचा जाहीर करूनही मदत पोहोचली नाही.

शेतकऱ्यांना घेऊन अयोध्यापोळ वर्षा बंगल्याजवळ दाखल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारल्याचा पोळ आरोप.

सर्वसामान्यांसाठी वर्षाची दारू खुली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलं होतं आवाहन... प्रवेश देत नसल्याचा अयोध्या पोळ आरोप...

VVIP अमित शहा यांच्या दौरा याची माहिती नव्हती... तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना कितपत बाहेर थांबवणार याची वाट बघणार आहे, अयोध्या पोळ यांची माहिती..

छत्रपती संभाजीनगर : राजश्री उंबरे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 8 वा दिवस

Summary

मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसापासून छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात राजश्री उंबरे या आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत आज त्यांच्या उपोषणाचा 8 दिवस असून त्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. काल सायंकाळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती मात्र त्यांचेही प्रयत्न यशस्वी ठरले. 17 सप्टेंबर पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा आपण याच ठिकाणी देहत्याग करणार असल्याचही यापूर्वी त्यांनी बोलताना सांगितलेल आहे.

Pune: पुण्यातील गणेशोत्सवात "कोयतामुक्त पुणे" देखावा

पुण्यातील गणेशोत्सवात विविध विषयांवरचे देखावे पाहायला मिळतात. अशातच पुण्यातील आनंद तरुण मंडळाकडून सध्या चर्चेतील कोयता गँग या विषयी देखावा सादर करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे पोलिसांची जबाबदारी नागरिकांच्या संरक्षणाची आहे तशीच जबाबदारी पुणेकरांची सुद्धा आहे असा समाज प्रबोधन करणारा देखावा मंडळाने सादर केला आहे. मंडळाकडून त्या ठिकाणी सामान्य पुणेकरांच्या तक्रारी तसचं पोलिसांकडून होणारी कोयता गँग वरची कारवाई असे मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

Amit Shah : अमित शाह फडणवीसांच्या घरी जाणार

केद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपमुख्यमंत्री देवेद्रफडणवीस याच्या घरी गणपती दर्शनासाठी थोड्या वेळात दखल होत आहेत.

मंत्री छगन भुजबळ राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला राहणार अनुपस्थित

- मंत्री छगन भुजबळ राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला राहणार अनुपस्थित

- येवल्यातील आधीच्या नियोजित कार्यक्रमांमुळे छगन भुजबळ राज्यपालांच्या बैठकीला राहणार अनुपस्थित

- राज्यपालांबद्दल आदर मात्र विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मतदारसंघातील अनेक उद्घाटन कार्यक्रम बाकी असल्यानं राज्यपालांच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही

- मंत्री छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण

- आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नाशिक जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह लोकप्रतिनिधींची बोलावलीय बैठक

- शासकीय योजना संदर्भात लोकप्रतिनिधींशी साधणार आहेत संवाद

विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांची टोलेबाजी

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. ब्रह्मपुरी शहरात कुणबी समाजाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच भाजप आमदार परीणय फुके यांची देखील मंचावर उपस्थिती होती. राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार याच ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल बार्शीचे आ.राजेंद्र राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत धाराशिव च्या कळंब शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने आ.राऊत यांच्या फोटोला जोडे मारो करत निषेध व्यक्त केला दरम्यान यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या तर राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या व मराठा आरक्षण विरोधी भुमीका घेवु नये अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिकेचा मृत्यू

नंदुरबार:- तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार झाली.

बालिकेच्या मृत्यूमुळे परिसरात भीतीचे वातावरण झालेय.

मराठा आरक्षणासाठी तपासणार देवी साथीच्या लसीकरणाचे रेकॉर्ड

Summary

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी प्रशासन स्तरावर पुन्हा हालचाल सुरू झाली आहे. कुणबी नोंदीसाठी सर्व रेकॉर्डची तपासणी करण्यात आली तर आता शासनाच्या आदेशानुसार देवी साथीत लसीकरणाच्या आढळलेल्या अभिलेखांच्या धर्तीवर सर्व तालुक्यात लसीकरण अभिलेखांची तपासणी करण्यात येणार आहे.

तर पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकू, या धमकीवजा शब्दात नागपूर जिल्हा पेटवण्याची भाषा काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील सातगाव मध्ये पुरुष सरपंच आणि महिला उपसरपंचात वाद झाला होता. त्यात सरपंच योगेश सातपुते यांनी महिला उपसरपंचाला जातीवाचक शिव्या देत धमकी दिली होती. त्याप्रकरणी महिला उपसरपंचाच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये सातगावचे सरपंच योगेश सातपुते विरोधात एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच सातगाव परिसरात सुनील केदार यांची सभा झाली असता, केदार यांनी सरपंच योगेश सातपुते यांचा नाव घेत तुमच्या केसाला सुद्धा धक्का बसला तर पूर्ण नागपूर जिल्हा पेटवून टाकू असे धमकीवजा शब्द वापरले. आता नागपूर जिल्ह्यात सुनील केदार यांच्या धमकीवजा शब्दांचा तोच व्हिडिओ चांगलाच viral होत आहे.

Pune News : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद

पुण्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद

पुणे महापालिकेकडून संगम मातीच्या मूर्ती विक्रीचा मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम राबवण्यात आला

दोन दिवसात पुणेकरांनी 210 शाडूच्या मूर्ती तर 200 संगम मातीच्या मूर्ती केल्या खरेदी

या मूर्ती अवघ्या दोन तासात पाण्यात विरघळतात तसेच विसर्जन केल्यानंतरचे पाणी घरगुती कुंडी मध्ये वापरता येते

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात 25 हजार घरकुलांना मंजुरी

सर्वांना घरे प्रदान करणे या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी lनगर जिल्ह्यात सन 2024 25 या वर्षासाठी 25 हजार 30 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 291 घरकुल ही गंगापूर तालुक्यात मंजूर करण्यात आली असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता 15 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने जमा होणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सर्व पंचायत समिती कार्यालयात दाखल करावी असे आवाहन प्रशासनाने केले.

Pune Crime : पुणे अपघात २ जणांचा मृत्यू

दारुच्या नशेत टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेय.

रात्री अकराच्या सुमारास पौड फाटा इथं हा अपघात झालाय

आशिष पवार हा टेम्पो चालक दारू पिऊन टेम्पो चालवत होता

बुलढाणा : गोमाल गावात अतीसाराच्या साथीने तिघांचा मृत्यू.

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर दुर्गम भागात असलेल्या गोमाल गावात गेल्या आठवडाभरात अतिसाराच्या साथीने तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर जवळपास ३०० रुग्ण आजही अतिसाराच्या साथीने त्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र गोमाल या गावाला रस्ता नसल्याने या रुग्णांना वेळच उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याची कबुली केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

Pune News : पूजा खेडकरनंतर पुण्यातील पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर

पूजा खेडकरनंतर पुण्यातील पुणे महापालिकेचे अधिकारी रडारावर

दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीच पत्र पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे पाठवला आहे.

बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारीनंतर 7 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता

पुणे महानगरपालिकेमधील सात अभियंत्यांनी सेवेत भरती होताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी आल्या आहेत

बोगस प्रमाणपत्र सादर करणारे अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात

ज्या सात अभियंत्यांची दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार आली आहे त्यात अस्थिव्यंग प्रमाणपत्राच्या 3 अल्पदुष्टी प्रमाणपत्राच्या 3 आणि कर्णबधिर प्रमाणपत्राबाबत 1 तक्रार दाखल झाले आहे

ज्या अभियंत्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्या असल्याची तक्रारी आहेत त्या संदर्भात अभियंत्यांच्या चौकशीच्या कार्यवाही बाबत आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला आहे

Marathi news : ऐन गणेशोत्सवात पालेभाज्यांचे दर भिडले गगनाला

ऐन गणेशोत्सव पालेभाज्यांचे दर भिडले गगनाला

बाजारात कोथिंबीर 80 रुपये तर मेथी चाळीस रुपयांना जुडी

संसदीचे दिवस असल्याने अतिरिक्त खर्च होत असतानाच पालेभाज्यांचे दर आवाक्याबाहेर

गेल्या महिन्यात पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक झाली कमी

फुलांना आणि फळांना गणेशोत्सवामुळे वाढली मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com