Marathi News Live : जयदीप आपटे याच्या कुटुंबीयांची चौकशी पूर्ण

Maharashtra Breaking News Live today : आज शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV
Published On

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आक्रमक

रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

सिंदखेडराजात तहसील कार्यालयावर धडक देत शेतकऱ्यांनी विचारला प्रशासनाला जाब

तर मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे नागपूर - पुणे हायवे रोखला.. शेतकऱ्यांनी केला रास्तारोको

तोडगा न निघाल्यास तुपकरांचे आंदोलन पेटण्याची चिन्हे

jaideep apte News : जयदीप आपटे याच्या कुटुंबीयांची चौकशी पूर्ण

सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक जयदीप आपटे यांच्या कल्याण मधील घरी व जयदीप आपटे यांच्या कारखान्यावर दाखल झाले होते.

जयदीप आपटे याच्या कुटुंबीयांची चौकशी केली त्यानंतर आपटे याच्या घराजवळ असलेल्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात जाऊन तपास केला.

या तपासादरम्यान आपटे याच्या कारखान्यातून मूर्ती बनवण्याचं काही साहित्य तसेच काही पुरावे एका बॉक्समध्ये सिल करून सिंधुदुर्ग पोलीस सोबत घेऊन गेले आहेत.

तब्बल सहा तास चौकशी सुरू होती.

Dagdusheth ganpati : 'दगडूशेठ' च्या जटोली शिवमंदिर देखावा तयार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती

गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील दत्त सांप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार

Kalyan News : सिंधुदुर्ग पोलीस पुन्हा जयदीप आपटेच्या कल्याणच्या घरी दाखल

सिंधुदुर्ग पोलीस  पुन्हा जयदीप आपटेच्या कल्याणच्या घरी दाखल झाले आहेत. तीन तासांपासून शिल्पकार जयदीप आपटे याच्या कुटुंबियांसोबत चौकशी सुरू आहे. आपटेच्या घर आणि कारखान्यातून काही संबंधित तपास चौकशी व पुरावे गोळा करण्यासाठी आल्याची माहिती आहे. जयदीप आपटे च्या घरी चौकशी केल्यानंतर जयदीप आपटे च्या पत्नीला घेऊन सिंधुदुर्गातले पोलीसांचे पथक जयदीप आपटेच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात दाखल झाले आहेत.

Pune News : बाप्पाच्या आगमनापूर्वीच दगडूशेठ गणपती बाप्पाला एक कोटीचा हिरा अर्पण

बाप्पाच्या आगमनापूर्वीच दगडूशेठ गणपती बाप्पाला एक कोटीचा हिरा अर्पण करण्यात आला आहे.

एका भाविकाने केला एक कोटीचा हिरा बापाच्या चरणी अर्पण

दोन दिवसांपूर्वी मंदिरात दिला आणून

बाप्पाच्या आभूषणाने नटलेल्या बापाच्या मस्तकावर लावण्यात आला आहे.

Pune News :  पुण्यातील कोढव्यात 40 लाखांचे मेफेड्रॅान ड्रग जप्त

- पुण्यातील कोढंव्यात एमडी अर्थात मेफेड्रॅान ड्रग जप्त

- ⁠कोढव्यातील मिठानगर भागातून २०० ग्रॅम एमडी जप्त

- ⁠पकडलेल्या एमडीची बाजारातील किंमत ४० लाख

- ⁠पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाची कारवाई

- ⁠एक जण ताब्यात

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 19 सप्टेंबरला बुलढाण्यात

बुलढाणा शहरात महापुरुषांचे 26 स्मारक तयार झाले आहेत. त्या सर्व स्मारकांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजितदादा पवार व सांस्कृतिक मंत्री सुधीर मूनगुंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर हा कार्यक्रम राहणार आहे, अशी माहिती आ संजय गायकवाड यांनी दिली.

CM Eknath Shinde : तर शिवसेना नावाला शिल्लक राहिली असती: CM एकनाथ शिंदेंची साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह मुलाखत

चुका दुरुस्त व्हाव्या अशी इच्छा उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडली होती, मात्र खुर्चीपुढे वैचारिक धारा बाजूला पडली. अस्थित्व पक्षाचं आणि धनुष्य बाणाचं अस्तित्व आम्ही वाचवलं. आम्ही ते केलं नसतं तर शिवसैनिक आणि शिवसेना नावाला शिल्लक राहिली असती, खच्चीकरण झालं असतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केला.

Sarkanama Weekly : सरकारनामा साप्ताहिकाचं CM एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रकाशन

सरकारामा साप्ताहिकाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकाशन करण्यात आलं. डिजिटलस्वरूपात असणारी आवृत्ती आता नव्या रुपात प्रेक्षक आणि वाचकांना उपलब्ध होणार आहे.

Ameravati News : अमरावती शहरात गेल्या एका तासापासून मुसळधार पाऊस सुरू

अमरावती शहरात गेल्या एका तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अमरावती नागपूर मार्गारिल शिवाजी कृषी महाविद्यालय जवळ झाड कोसळल्याने काही वेळासाठी  एका बाजूची वाहतूक वळवली होती. कालपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.

Pune News : मुळशी तालुक्यातील एका शाळेत १९ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार

बदलापूर आणि दौंड येथील शाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुळशी तालुक्यातील आनंदगाव येथील शाळेत तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकानेच या मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकाच्या विरोधात शाळेच्या संस्थाचालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर, पुणे) असे नराधम शिक्षकाचे नाव आहे.

Marathwada Water : मराठवाड्यात मुसळधार पाऊस;  धरणं आणि प्रकल्प काठोकाठ भरली

मराठवाड्यामध्ये या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे धरणं आणि प्रकल्प पाण्याने फुल्ल झाली आहेत. दोन आठवड्यापूर्वी धरण आणि प्रकल्पाची स्थिती चिंताजनक होती. आज मात्र मराठवाड्यातील ११ मोठ्या धरणातील पाणीसाठा ८३.४६ टक्क्यांवर पोहचला आहे. यातील दोन प्रकल्प १०० टक्के भरली आहेत तर तीन प्रकल्प ९० टक्क्याच्या वर आहेत. मध्यम प्रकल्पातील साठा ७६.४८ टक्के तर लघु प्रकल्पात ६८.१३ टक्के पाणी जमा झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातवरील पाणीसंकट टळले आहे. हा साठा पाण्यासोबत शेती सिंचनासाठी उपयोगी पडणार आहे.

Ahamadnagar News : अहमदनगरमध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

अहमदनगरमध्ये दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झालाय, तर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील भडके वस्तीवर सात ते आठ दरोडे खोरांनी धुमाकूळ घातला. वस्तीवरील शेतकऱ्यांचे पशुधन चोरण्यासाठी आलेल्या या दरोडेखोरांनी मच्छिंद्र ससाने या 80 वर्षीय वृद्धाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Washim News : वाशिम जिल्ह्यात पुन्हा आज जोरदार पाऊस सुरू 

वाशिम जिल्ह्यात आज जोरदार पावसाला सुरुवात झालीय. जिल्ह्यातील वाशिम ,मालेगाव, शिरपूर, मंगरुळपिर ,कारंजायासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे बाप्पांच्या भक्तांची मोठी धावपळ झाल्याचं बघायला मिळालं, तर सतत अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी आणि फळबागाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

Pune  News : पुण्यात गणेशोत्सवाची तयारी पूर्ण ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार 

गणेशोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सात हजार पोलीस गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी तैनात असतील. 10 क्युआरटी टीम्स तैनात असणार आहेत. 22 पोलीस मदत केंद्र शहरात उभारण्यात आली आहेत. ⁠गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1742 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, ७५६ सराईत गुन्हेगारांना रोज स्थानिक पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. लेझर लाईटला बंदी असणार आहे. लेझर लाईटबाबत झीरो टॅालरन्स असेल. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय,

Bhandara News : भंडारा पोलिसांनी पकडला 167 किलो गांजा.

भंडारा पोलिसांनी 167 कीलो गांजा पकडला. ही कारवाई रात्रीच्या सुमारास करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांना माहिती मिळाली की, उडीसा वरुन गाडीमध्ये गांजा भरून येत आहे. त्या आधारे रात्री पोलिसांनी गस्त लावली. वाहनांची तपासणी सुरू केली असता अखेर एका वाहनात मागच्या डीक्कित प्लॅस्टिक बोरी मध्ये काहीतरी असल्याचं आढळून आलं. त्याला उघडल्यावर त्यात गांजा दिसून आला.

Beed News : बीडमध्ये 11 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार 

एका 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून, आरोपी विरोधात बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar News : नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने गणेश मंडळांचा सन्मान

नंदुरबार जिल्ह्यात गेल्यावर्षी गणेश मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक आणि सामाजिक यासोबतच विविध प्रकारच्या जनजागृतीपर घेतलेल्या कार्यक्रमाची दखल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने घेतली. गणेश मंडळांच्या वतीने .गेल्या वर्षी रक्तदान शिबिर पारंपारिक वाद्यांच्या मिरवणुका गुलाल विरहित मिरवणुका या सोबतच समाजात जनजागृती पर कार्यक्रम जिल्हाभरातील गणेश मंडळांनी घेतले होते. त्या कार्यक्रमाची दखल घेत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांच्या विशेष सन्मान करण्यात आला.

Pune News : खडकवासला धरणातून विसर्ग कमी होणार

खडकवासला धरणातून विसर्ग कमी होणार आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 11022 क्युसेक्स विसर्ग कमी करून दुपारी 03:00 वा. 8734 क्यूसेक्स करण्यात येत आहे.

Navi Delhi : कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. दुपारी ३ वाजता दोघांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीसाठी बजरंग पुनिया पोहोचले आहेत. दोघेही हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Pune News : गणेशोत्सवानिमित्त देण्यात येणाऱ्या पथकर सवलतीसाठी वैध पास आवश्यक

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भक्तांना १९ सप्टेंबर पर्यंत पथकर वसुलीतून सवलत देण्यात येणार असून त्यासाठी वाहनधारकांना पास देण्यात आले आहेत. वाहनधारकांकडे वैध पास नसल्यास वाहनांना पथकर भरुन प्रवास करणे अनिवार्य असेल, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.एस. कदम यांनी कळविले आहे.

Maharashtra Politics:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात प्रवेश

माळशिरस तालुक्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष साहिल अत्तार यांच्यासह शेकडो पदाधिकार्यांनी आज शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. आज माळशिरस तालुक्यातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या सुमारे दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यानी माजी खासदार राजू शेट्टी यांची साथ सोडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी नेते उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत शरद पवार पक्षात प्रवेश केला. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधकांची ताकद कमी झाली आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये सुरू होणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,  आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली पाहणी

कल्याणमध्ये केडीएमसीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच नागरिकांच्या सेवेत असणार आहे .कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा परिसरात आरक्षित भूखंडावर रुग्णलयाची तीन मजली इमारत बांधून पूर्ण झाली आहे . या इमारतीचे आज आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी रुग्णालय सुरू करण्याची तांत्रिक कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच या ठिकाणी नागरिकांसाठी 100 बेडचे सुसज्ज असं सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू होणार असल्याचे सांगितले.

Pune News: धावत्या शिवशाही बसच्या चाकाचे नटबोल्ट निघाले, सर्व प्रवासी सुखरुप

नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात असताना आळेफाटा येथे पिच्चर झालेल्या शिवशाही बसचे चाक व्यवस्थित न बसल्याने चाकाचे सहा नटबोल्ट पडुन गेले यावेळी रस्त्यावरुन जाणा-या कार चालकाच्या लक्षात येताच मंचर जवळील कळंब येथे शिवशाही बस थांबवुन प्रवाशांनी सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळली मात्र भरभक्कम तिकिट घेऊनही शिवशाही बस नादुरुस्त,पाऊसात बसमध्ये गळती सुरु असल्याने शिवशाहीची दुरवस्था झालीय त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशीच खेळ सुरुय

Pune Mumbai Highway Traffic: पुणे मुंबई एक्सप्रेसवे जाम, वाहनांच्या रांगाच रांगा

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहुन पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेन वर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना ह्या वाहतुक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी चालल्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मोठा ताण आला आहे. बोरघाट पोलीस ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई हून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेन वरून वाहतूक सुरू करून ही कोंडी फोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न करत आहेत. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Akola News: 52 एकरातील शेत तलाव ओव्हरफ्लो, पिकांचे मोठे नुकसान

अकोल्यात 52 एकरात बांधण्यात आलेला शेत तलाव आज ओव्हरफ्लो झालाय.. शेत तलावाच्या आवार भिंतीवरून तलावातील पाणी ओसंडून वाहत आहे.. अकोट तालुक्यातल्या धामणा शिवारात असलेलं हे 52 एकरातील शेत तलाव भरल्यामुळे ओव्हरफ्लो होतोय, हे पाणी परिसरातील शेतशिवारात शिरत आहे. धामणा शिवारात अनेक शेतात तलावाचं पाणी शिरल्याने सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान होतं आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

Parbhani News:  नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करायला पालकमंत्र्यांना वेळ नाही, शेतकऱ्यांची नाराजी

परभणी जिल्ह्यात अतिमूसळधार पावसाने दाणादाण उडाली होती, पुरामुळे आलेल्या आपत्कालीन परिस्थितीत जनावर आणि माणसं ही वाहून गेलीत, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने3 अनेकांनी रात्रा जागून काढल्या,52 पैकी 50 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली, एका मंडळात तर 350 मिलिमीटर पाऊस झालाय, पावणे तीन लाख हेक्टर वरील पिक मातीमोल झालीत. पण जिल्ह्याच पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री संजय बनसोडे यांना मात्र जिल्ह्यात प्रत्यक्ष येऊन पिकांची पाहणी करायला,शेतकऱ्यांना धीर द्यायला वेळ मिळत नाहीये.

त्यामुळे पालकमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतलाय, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर मिळावा यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यात विविध भागात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतलाय. परंतु जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री बनसोडे यांना मात्र जिल्ह्यात फिरकायला ही वेळ नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे.

Baramati News: देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरवरुन अजित पवार गायब, बारामतीमधील फ्लेक्सची चर्चा

बारामतीत लाडक्या बहिण योजनेच्या संदर्भात" देवेंद्र भाजप समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे/ अजित पवारांचे लाडक्या बहिण योजनेच श्रेय हाणून पाडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांची फडवणीस यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. "देवा भाऊ" लाडक्या बहिणीला मिळणार १५०० रुपये महिन्याला' बॅनर वरती टॅगलाइन यावेळी देवेंद्र फडवणीस समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे

Akola News: अकोल्यात पावसाची हजेरी, नदीपात्रात विसर्ग होण्याची शक्यता

अकोला जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा हवामान विभागान पावसाचा अंदाज वर्तवलाये. अकोल्यात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दिलीए. आज दुपारी बारा वाजता पासूनच अकोल्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.. पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.. दरम्यान अकोला जिल्ह्यातील मोठ्या आणि महत्वाच्या धरणांमध्ये पूर्ण जलसाठा झाला आहे. त्यामुळं नदीपात्रात विसर्ग होण्याची शक्यता आहे.

Kolhapur News: राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापुरात राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचं उदघाटन खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी भालचंद्र कांगो होते. 1931 साली झालेल्या जातनिहाय जनगणनेच्या आधारावर मागास जातींसाठी कल्याणकारी योजनांची आखणी केल्याने अपेक्षित विकासाचा टप्पा गाठता आला नाही. असे अभ्यासकांचे मत आहे. अपल्या देशात 2021 ची जनगणना झालेली नाही. ती त्वरित करावी. जनगणने नुसार आरक्षणाच्या मर्यादा वाढवाव्या तसेच जातीनिहाय जनगणनेचा मुद्यावर चर्चा घडावी या उद्देशाने कोल्हापुरात राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषद आयोजित करण्यात आली होती.

Amravati News: रवि राणा यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलं 'पाना' चिन्ह

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने दिले 'पाना' हे निवडणूक चिन्ह. यापुढे आमदार रवी राणा हे पाना चिन्हावर निवडणूक लढवणार. 2019 मध्ये नवनीत राणा यांनी पाना या चिन्हावर लढवली होती लोकसभा निवडणूक. तेंव्हा त्या विजयी झाल्या होत्या. 'सभी नटो का एकही पाना चुनके लाओ' हे नवनीत राणा यांचे स्लोगन गाजलं होतं.

Vidhan sabha maharashtra : परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच..

जालन्यातील परतूर विधानसभेच्या जागेवर महायुतीत शिवसेनेन दावा केलाय..ही जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीय..दरम्यान परतूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच आल्याचे पाहायला मिळतेय, त्यामुळे आता भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या जागेवर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी दावा केल्याने आमदार लोणीकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ramdas Kadam : आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर ठाकरेंनी फोन केल्याचा रामदास कदम यांचा दावा

गद्दाराची व्याख्या काय हे अनेकांना कळलेलं नाही. उध्दव ठाकरेंनी वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली. आमदार गुवाहाटी मध्ये गेल्यावर उध्दव ठाकरेंनी मला फोन केला होता. काँग्रेस सोडा सर्व आमदारांना दोन तासात परत आणतो असे म्हटले होते, पण उध्दव ठाकरेंनी शरद पवार यांचे ऐकले. मी खोटं बोलत नाही, गणपतीची शपथ घेऊन सांगतोय.
रामदास कदम, शिवसेना नेते

Ramdas Kadam : रामदास कदम यांची अचानक नरमाईची भूमिका

विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे.आम्हाला महायुती टिकवायची आहे, जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे.
रामदास कदम, शिवसेनेचे नेते

Nagpur : देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आढावा घेणार

नागपूर महानगर पालिकेत जनसमस्येचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आढावा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेन्द्र फडणवीस गडकरी ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत.

काही दिवस अगोदर नितीन गडकरी यांनी मनपा मुख्यालयात घेतला जनता दरबार होता.

मनपा मुख्यालयात होणाऱ्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त, भाजप आमदार सहित सर्व अधिकारी असणार उपस्थित

शहरात डेंग्यू, चिकणगुणिया, अस्वच्छता, नागरिकांच्या समस्या वाढत असून प्रशासन ठम्म असल्याच्या वाढत होत्या तक्रारी या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्वाची

Rain Update : पावसाच्या तडाख्यामुळे भाज्यांचे दर कडाडले 

गेल्या 2 ते 3दिवसात झालेल्या जोरदार पावसाचा फटका आता भाजीपाल्यांना देखील बसलाय. अतिवृष्टीमुळे भाजीपाला आणि फळ पिकांचं अतोनात नुकसान झाल त्यामुळं मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडल्याचं दिसून येतंय. 10 रुपयाला मिळणारी कोथिंबीर ची जुडी आता 40 रुपयाला मिळत आहे तर मेथी 20 रुपयाला मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकही खरेदी करताना हात आखडता घेत आहे. गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यांवर बुरशी आणि किडजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे आणि अश्यातच चिखलांमुळे देखील भाज्या खराब झाल्या आहे त्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक घटली आणि त्याचा परिणाम खरेदीवर दिसून येतोय.

Solapur : चुरमुरे,शेंगदाणा,डाळीचे दर वाढले;प्रसादासाठी मोजा यंदा १० ते २० टक्के जादा

Summary

सोलापुरात गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला चुरमुऱ्यांच्या प्रसादावरच आजही भर दिला जातो. त्यासोबत लाडवासह अन्य गोड पदार्थ दिले जात आहेत. घरगुतीपासून ते छोट्यामोठ्या सार्वजनिक गणेश मंडळासाठी २५० ग्रॅमपासून ते १ किलोपर्यंत मिक्स प्रसाद सध्या बाजारात तयार मिळू लागला आहे.यंदा हरभरा डाळीचे उत्पादन कमी झाल्याने डाळीचे दर वाढले आहेत. शेंगादाण्याचे दर मागील वर्षांच्या तुलनेत ३० रुपयांनी वाढलेले आहेत तर चुरमुऱ्यांच्या विविध प्रकारातही २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

सोमवारी समृद्धी महामार्गावर बैलगाड्यासह चक्कजाम

Maharashtra Bandh : रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन चिघळण्याची शक्यता
रविकांत तुपकर यांच्या अन्न त्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली. तीन दिवस अन्नाचा कण न घेतलेल्या तुपकरांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी झालेलं आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या रविवारी राज्यभर रस्ता रोको करण्यात येईल. तर सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी समृद्धी महामार्गावर बैलगाड्यांसहित महामार्ग रोखून धरतील, अशी घोषणा आज तुपकर यांनी केली.

Pune News : महिलांच्या सुरक्षितेसाठी पुण्यात सुरू झाली गुलाबो गँग

गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे.मागील काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे झालेल्या घटनेने राज्यात खडबळ उडाली होती.आत्ता महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला असताना पुण्यात बेटिया फाऊंडेशन तर्फे पुण्यातील महिला सुरक्षिततेसाठी गुलाबो गँगची सुरवात करण्यात आली आहे.आणि याचं उद्घाटन काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आलं आहे..

jitendra awhad :  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Jitendra awhad :  खोटी माहिती प्रसारित करुन शेतकर्‍यांची दिशाभूल केल्याबद्दल माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संभाजीनगर वाळुंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा

भारतीय न्याय संहिता ३५३(२) अंतर्गत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Crime News : बदलापूर रेल्वे स्थानक गोळीबार प्रकरण : पैशांच्या वादातून मित्रांवर गोळीबार, आरोपीला अटक

बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबार प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्यात. घटनेबाबत रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी माहिती दिली की, चौघे जण होते पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात वाद झाला व त्यातून फायरिंगची घटना घडली, चौघेही आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहेत.गोळीबार करणाऱ्या विकास पगारे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं त्याच्यावर दोन गुन्हे टिटवाळा पोलीस ठाणे , दोन गुन्हे उल्हासनगर मध्ये दाखल आहेत. पैशांच्या देवाण-घेवाण आणि पैशांचा वाटपावरून अचानक त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादाचे पर्यावसन गोळीबारात झालं दोन राऊंड फायर करण्यात आले असून त्याने बंदूक कुठून आणली याचा तपास सुरू आहे

अकोल्यात गणेश आगमनाची धामधूम, बाजारात बाप्पांच्या अनोख्या मूर्तींची सजावट.

Akola : अकोल्यात गणेश चतुर्थीच्या तयारीला जोरदार सुरुवात झालीय. आता बाजारपेठा सुंदर आणि अनोख्या बाप्पांच्या मूर्तींनी सजल्या आहेत. यावर्षी बाप्पाच्या विविध रूपातील मूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत. काही ठिकाणी बालरूपात पंख लावलेल्या बाप्पाच्या मूर्ती दिसून येत आहे.. तर काही ठिकाणी स्वेटर आणि टोपी घातलेल्या मूर्ती पाहायला मिळत आहेत.

MVA News : समरजितसिंह घाटगे यांनी घेतली उबाठा पक्षाचे उपनेते संजय पवार यांची भेट

समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात दोन दिवसांपूर्वी प्रवेश केलेला आहे. या प्रवेशानंतर समरजितसिंह घाटगे यांनी काल उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी कागल, गडहिंग्लज, उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यां सोबत बैठकही झाली. विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली आहे.

Yavatmal News :  अतिक्रमण हटाव विरोधात दोन युवकांनी आत्महत्येचा प्रयत्न

यवतमाळच्या पुसद पंचायत समितीकडे करण्यात आलेल्या तक्रारीवरून अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकासमोर दोन युवकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. त्या दोघांना पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अतिक्रमण मोहिमेतील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जमशेदपूर येथे रस्त्यावर अतिक्रमणामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता.त्यामुळे त्रासाला कंटाळून चंदन रामजी चव्हाण या जमशेदपूर येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्याने ग्रामपंचायत मध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी तक्रार दिली. उपोषणाची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने सदर अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र अद्याप सरकारकडून तुपकर यांचे आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाहीय. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होतोय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी, सोयाबीन , कापसाला दरवाढ द्यावी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी. यासह विविध मागण्या घेऊन रविकांत तुपकर हे 4 सप्टेंबरपासून सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. आंदोलनाला तिसरा दिवस उलटला मात्र सरकारकडून दखल घेतल्या गेली नाही .

Mumbai News :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा हे रविवारी रात्री मुंबईत येणार असून सह्याद्रीवर वास्तव्यास असतील. सोमवारी अमित शहा लालबागचा राजा, वर्षा निवासस्थान आणि वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवास भेट देणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबत कालच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. शहांच्या या मुंबई दौऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप नेत्याकडून आढावा घेण्याची शक्यता आहे.

BJP : रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वालबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांची नाराज

- रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वालबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांची नाराज असल्याची चर्चा..

- भाजपचे नागपूर जिल्हा प्रभारी कैलास विजय वर्गीय यांच्यासमोरच रामटेक मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांचा बैठक..

- आशिष जयस्वाल शिंदे समर्थक आमदार असून ते रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत.

- 2019 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात जयस्वाल अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. आणि जिंकले. त्यामुळे त्यांनी युतीच धर्म पाळला नसल्यानं यंदा भाजप पदाधिकारी नाराजी असल्याची चर्चा ऐकायला येत आहे.

Marathi News : दीपक देशमुख यांना ‘ईडी’कडून अटक

दीपक देशमुख यांना ‘ईडी’कडून अटक...‘मायणी वैद्यकीय’ गैरव्यवहार प्रकरण मायणी वैद्यकीय महाविद्यालय फसवणुकीच्या गुन्ह्यात दीपक देशमुख यांना (ईडी) पथकाने गुरुवारी अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com