Marathi News Live Updates : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नव्या प्रभारींची नियुक्ती

Maharashtra Breaking News Live Updates : आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नव्या प्रभारींची नियुक्ती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नव्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे तिन्ही प्रभारी पक्षानं बदलले आहेत. संपत कुमार, आशिष दुवा, सोनम पटेल यांच्या जागी बी एम संदीप, क्वाझी निजामुद्दीन, कुणाल चौधरी, यु बी व्यंकटेश यांची प्रभारीपदी ‌नियुक्ती करण्यात आली आहे.

paris paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक देशाला चौथे पदक, मनिष नरवालने जिंकलं रौप्यपदक

पॅरिस पॅरालिम्पिक देशाला चौथे पदक मिळाले आहेत. , मनिष नरवालने १० मीटर एअर पिस्तुलमध्ये रौप्यपदक जिंकलं आहे.

राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत

किल्ले राजकोट येथील दुर्घटने संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे तज्ञ कमोडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव तसेच आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांचा देखील समावेश आहे.

'कोण तानाजी सावंत मी त्यांना ओळखत नाही' : सुनील तटकरे

कोण तानाजी सावंत मी त्यांना ओळखत नाही. त्यांना विचारून आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालो का? अमित शाह नरेन्द्र मोदी यांच्यासोबत चर्चा करून आम्ही सत्तेत सहभागी झालो होतो. त्यामुळें युती मध्ये खडा टाकणाऱ्यांवर बोलणार नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

Vadhavan Port : मच्छिमार बांधवांनी पंतप्रधानांना दाखवले काळे झेंडे 

या एका मागणीसाठी पालघरचे मच्छिमार, आदिवासी, शेतकरी, महिला आणि स्थानिक हजारोंच्या संख्येने शंखोदर, वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर जमले होते. मोदी गो बॅकच्या घोषणेने परिसर दणाणून निघाला. प्रधानमंत्री वाढवण बंदराची पायाभरणी करण्यासाठी आले, पण किनारपट्टीच्या जनतेने त्यांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला.

Prithviraj Chavan : वाढवण बंदराचं खासगीकरण केलं जाणार नाही याची घोषणा करावी : पृथ्वीराज चव्हाण

वाढवण बंदराबाबत 10 वर्षापूर्वी काही सूचलं नाही का? अदानींनी हा कार्यक्रम घडवून आणला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी हे वाढवण बंदराचं काम सुरू आहे. वाढवण बंदराचं खासगीकरण केला जाणार नाही अशी घोषणा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Prithviraj Chavan : निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली : पृथ्वीराज चव्हाण

निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली. खरेतर किंतुुपरंतु करत माफी मागितली, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सावरकर आणि शिवाजी महाराज यांची तुलना करण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

CM Eknath Shinde: वाढवण बंदर गेमचेंजर ठरेल;  CM एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा पायाभरणी कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचं शिखर ठरेल, असे म्हणत हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे.

Kolhapur Accident News: कोल्हापूरमध्ये भीषण अपघात! भरधाव कारने दुचाकीला उडवले

कोल्हापुरात एका भयानक अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एका तरुणाला चारचाकीने जोराची धडक दिली आहे. शहराजवळील उंचगाव या गावात हा भयंकर अपघात झाला असून त्याचा CCTV फुटेजही समोर आले आहे. गांधीनगर पोलीस याबाबत तपास करत आहेत.

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस जनतेची माफी का मागत नाही? प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय मोठं आणि धक्कादायक विधान केलं.‌ पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाहीय. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय?, असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय. प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीे. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस जनतेची माफी का मागत नाही?, याचाही खुलासा करण्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

Madha : माढ्यातून आमदार बबन शिंदे यांची माघार 

Latest News : सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे.

Pune News : अग्निशमन दलाकडून नदी प्रवाहात अडकलेल्या दोघांना जीवदान

Pune News : पहिल्या घटनेत काल मध्यराञी पहिल्या घटनेमध्ये अंदाजे ०१•३० च्या सुमारास एक इसम भिडे पुल येथील नदी पत्रातून वाहत जात असल्याचे समजताच कसबा अग्निशमन केंद्र येथील वाहत घटनास्थळी पोहोचत जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर इसमास सुखरुप बाहेर घेतले. अजयकुमार गौतम असे या व्यक्तीचे नाव आहे.

Ajit Pawar News : अजित पवार यांना असे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणी दिला : हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर सवाल

Marathi News : अजित पवार बोलले तो महायुतीतील धर्म नाही.जागावाटप झालं नसताना हा अधिकार महायुतीतील एका पक्षाला दिला कसा काय ? असा प्रश्न ही उपस्थित करत त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रतिक्रियेवर टोकाचं वक्तव्य केलयं.…मी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नसताना या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर इंदापूर तालुक्यातील सामान्य माणसांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? या गोष्टी चांगल्या नाहीत, हर्षवर्धन पाटील आयुष्यात सर्व काही सहन करेल पण अपमान सहन करणार नाही असं हर्षवर्धन पाटलांनी बावनकुळे यांना खनकावून सांगितलं आहे.

Latest Marathi News : उसाच्या दरवाढीचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात

उसाच्या दरवाढीचा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात

ऊसाला 5 हजार रुपये दर मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात झाली सुनावणी

न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि प्रशांत मिश्रा यांच्या खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे दिले निर्देश

भारत सरकार, सहकार मंत्रालय हे प्रतिवादी दिल्ली स्थित असल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याचे कोर्टाचे निर्देश

Pune News: "त्या" मृतदेहाचं गुढ अजूनही उकलेले नाही

चार दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीत वाहून आलेल्या "त्या" मृतदेहाचं गुढ अजूनही उकलेले नाही. सोमवारी दुपारी पुण्यातील खराडी परिसरातून वाहत असलेल्या मुठा नदीच्या तिरावर एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला. एका महिलेचा निर्घृण खून करून हात, पाय चाठून हा मृतदेह नेमका कोणी आणि कधी नदीत टाकला हे अजूनही समजू शकलेले नाही. पुणे पोलिसांकडून देखील या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात ड्रोनच्या साहाय्याने मदत घेतली जाते आहे. याशिवाय गेल्या ४ दिवसांपासून पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात सुद्धा बेपत्ता झालेल्या महिलांचा सुद्धा तपास या अनुषंगाने केला जातोय.

Ahmednagar News: अजित पवार गटाचे आमदार आशुतोष यांच्याकडून गौतमी पाटीलचा " लाडकी बहिण " म्हणून उल्लेख

कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने नृत्य सादर करत कार्यक्रमात रंग भरला. गौतमी नृत्य सादर करत असताना स्टेसमोर तरुणांसोबत वृध्दांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. तर अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त करताना गौतमी पाटीलचा उल्लेख " लाडकी बहिण" म्हणून करतातच उपस्थितांनी मोठी दाद दिली.

PM Narendra Modi Speech: १० वर्षात ५३ कोटी नागरिकांची बँक खाती उघडली: PM नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024' ला संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी १० वर्षात ५३ कोटी नागरिकांची बँक खाती उघडल्याचे सांगितले आहे.

Pune News: 'डीजे, लेझर लाईट वापरणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करा', पोलीस आयुक्तांना निवेदन

दहीहंडी उत्सवात पोलिसांकडून बंदी घालूनही लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्या, तसेच डीजेचा कर्ण कर्कश्य आवाज करणाऱ्या तरुण मंडळांवर कडक कारवाई करावी. त्याचप्रमाणे मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या या घटकांवर पुणे शहरात कायम स्वरूपी बंदी आणावी असे निवेदन आज पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी साजरा करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर डीजेचा दणदणाट आणि लेझर लाईटचा अमर्याद वापर करण्यात आला. वास्तविक पुढील ६० दिवस शहरात लेझर दिवे वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचे परिपत्रक पोलिसांकडून काढण्यात आले होते.

Pune News: पुण्यातील वाहतूक कोंडीबाबत चंद्रकांत पाटील यांची बैठक

पुण्यातील वाहतूक कोंडी संदर्भात मंत्री चंद्रकात पाटील यांनी बैठक बोलावली आहे. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले, तिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. रस्त्याच्या संदर्भात एक अहवाल पोलिसांनी तयार केला आहे. अहवाल पालिकेला देण्यात येणार असून पालिकेने परवानगी दिल्यास पोलिस, पालिका मिळून एकत्र करणार काम.. रस्त्यावरील खड्डे, मिसींग रस्ते अश्या विविध रस्त्यावर काम केले जाणार....

Chhatrapati Sambhajinagar News: जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७६ टक्क्यांवर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७६ टक्क्यांवर पोहचला असून माजलगाव धरणासाठी थोड्याच वेळात उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करणार आहे. उजवा कालव्यातून आज दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या दरम्यान विसर्ग सुरू करणार आहेत. माजलगाव धरणाकरीता 100 क्युसेकने विसर्ग सुरू करून टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येईल. कालवा परिसरातील सतर्क राहण्याचे आदेश; कालवा परिसरातील साधन-सामुग्री, मालमत्ता-जनावरे ई. चे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन.

Shahapur Accident: भरधाव आयशरच्या धडकेत दूध विक्रेत्याचा मृत्यू, 

मुंबई नाशिक महामार्गावरून दुध विक्रेता पोपट बिन्नर (वय 52) मोटरसायकलने दुध घेऊन शहापूरच्या दिशेने विक्री करण्यासाठी जात असताना महामार्गावरील भातसा फाट्याजवळ भरधाव वेगाने म्हशीच्या पारडे घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोने दुध विक्रेत्याला जोरदार धडक दिली. यामुळे दुध विक्रेता आयशर टेम्पोच्या चाका खाली आल्याने चिरडला गेला . यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर आयशर टेम्पो हा सिन्नरहून म्हशीचे पारडे भरून तो मुंबईच्या दिशेने जात होता. आयशर टेम्पो खर्डी पोलिस ठाण्यात जमा केली असून पुढील तपास करीत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News: अल्पवयीन विद्यार्थिनींसमोर अश्लील कृत्य करणारा रिक्षा चालक जेरबंद

'तुला पैसे लागतात का? असे म्हणत एका अल्पवयीन 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी समोर पॅन्ट काढून अश्लील कृत्य करणाऱ्या रिक्षा चालकाला अखेर 6व्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर बाबा पठाण असं या विकृत रिक्षा चालकाच नाव असून वेदांत नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा चौक ते कोकणवाडी दरम्यान पॉलिटेक्निक महाविद्यालयात 3 ऱ्या वर्षात शिकणारी एक तरुणी रिक्षात जात असताना हा सगळा प्रकार घडला होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. दरम्यान 25 जून रोजी दिल्ली गेट परिसरात घडलेल्या घटनेमध्ये हा समीर बाबा हा अग्रस्थानी होता. कारागृहातून परत आल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनी समोर त्यानं हे कृत्य केलं होतं.

Maharashtra Congress Protest: मुंबईत मोठ्या घडामोडी, काँग्रेस नेत्यांचे ठिय्या आंदोलन

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसकडून निषेध आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. पोलिसांच्या विरोधानंतरही खासदार वर्षा गायकवाड, सचिन सावंत यांनी ठिय्या आंदोलन सुरू केली आहे.

Sharad Pawar News: शरद पवार यांची दिल्लीमधील घराबाहेर सुरक्षा वाढवणार, अधिकाऱ्यांशी बैठक सुरू

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आधिकरी आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकारी शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून शरद पवार यांच्या सुरक्षेबाबत बैठक सुरू आहे. मागील 10 मिनिटांपासून पवार यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. या बैठकीमध्ये शरद पवार यांची सुरक्षा वाढवण्याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Congress Protest: मुंबईत मोठ्या घडामोडी, काँग्रेस नेत्यांची धरपकड

मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसकडून निषेध आंदोलन केले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना ताब्यात घेतले आहे.

Sanjay Raut Visit Malvan: संजय राऊत मालवमध्ये दाखल 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यात संतापाची लाट उसळली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालवणमध्ये दाखल झाले आहेत.

काँग्रेस नेते नसीम खान यांच्या घरी पोलीस दाखल

काँग्रेस नेते नसीम खान यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. साकीनाका जरीमरी येथील त्यांच्या निवासस्थानी मोठा फौजफाटा घेऊन पोलीस पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बीकेसीतील सभास्थळी काँग्रेस नेते मूक आंदोलन करणार होते. आंदोलनापासून रोखण्यासाठी मुंबईतील काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत.

Beed News: मालवण घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये शिवप्रेमींनी केला रास्तारोको

मालवण येथील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ बीडच्या लिंबागणेश येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची शिवप्रेमींनी मागणी केली.

Mumbai News: पीएम मोदींच्या मुंबई दौऱ्याला विरोधत, काँग्रेस करणार निषेध आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. यांच पार्श्वभूमीवर खासदार वर्षा गायकवाड यांच्या चेंबूर येथील घराबाहेर पोलिसांची मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Nashik News : एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदगावमध्ये शिवस्मारकाचं लोकार्पण

तर श्रीकांत शिंदे यांचा शिव-संवाद दौरा आज नाशिकमध्ये

श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये घेणार आढावा बैठक आणि पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांची आढावा बैठक आणि पदाधिकारी मेळावा

Pune Crime : अल्पवयीन मुलाने सात वाहने चोरली, पराक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!

अल्पवयीन मुलगा पण त्याच्या करामती ऐकून पोलीस चकीत झाले. त्याने एक नाही तर तब्बल ७ वाहने चोरली त्यात एक चारचाकी, ३ रिक्षा, ३ मोटारसायकलीचा समावेश आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचा समांतर तपास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक करत होते. पोलीस शिपाई साईकुमार कारके व पोलीस हवालदार धनंजय ताजणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अल्पवयीन मुलगा शनिवार पेठेत चोरलेल्या रिक्षासह थांबला आहे. त्याअनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे व त्यांच्या सहकार्‍यांनी रिक्षासह थांबलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्यासमक्ष त्याने केलेल्या इतर वाहनचोरीच्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली. त्यात त्याने ७ वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

वारजे पोलीस ठाणे ३ गुन्हे, विश्रामबाग पोलीस ठाणे, अलंकार पोलीस ठाणे, राजगड पोलीस ठाणे , पौड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे ७ गुन्हे उघडकीस आले आहे. त्यात एक चारचाकी, ३ रिक्षा व ३ मोटारसायकलीचा समावेश असून अडीच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात देऊन गुन्हे दाखल असलेल्या पोलीस ठाण्यात पालकांसोबत हजर राहण्याबाबत समजपत्र देण्यात आले आहे.

Crime News : एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला काढायला लावला टॉप

chhatrapati sambhaji nagar : घाटी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीला टेक्निशियनने अंगातला टॉप काढायला लावत निर्वस्त्र करून तिच्या अंगाला स्पर्श केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे हा एक्स-रे घेणारा व्यक्ती रुग्णालयाचा अधिकृत कर्मचारी नसल्याचही समोर आलय. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीवर घाटीत टेक्निशियन म्हणून काम करत होता मात्र कंत्राट संपल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आले होते परंतु तरीही विभागात त्याचे येणे जाणे सुरू होते. याप्रकरणी आरोपी शेख मोहम्मद फरहान शेख नईमुद्दीन यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Latur : जखमी झालेल्या 19 वर्षीय गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

Latur News : लातूरच्या अहमदपूर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान या दहीहंडी स्पर्धेत साठे नगर भागातील गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. त्यात सहभागी झालेला उदय महेश कसबे हा 19 वर्षीय गोविंदा चौथ्या स्तरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. त्यामुळं जखमी झालेल्या 19 वर्षीय गोविंदावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.., मात्र उपचारादरम्यान या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण अहमदपूर शहरावर शोककाळा पसरली आहे.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Vadhavan Port : पालघर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी साधारणतः एक वाजताच्या सुमारास हा भूमिपूजन सोहळा पालघरच्या सिडको मैदान येथे पार पडणार आहे.

जिल्हा प्रशासन आणि जेएनपीए कडून सभा मंडप उभारण्याचं काम पूर्ण झाल आहे. साधारणतः 40 ते 45 हजार लोक बसतील इतक्या भव्य स्वरूपात हा सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी कोकणपरिक्षेत्रातून जवपास 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत . गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून या बंदराला विरोध होत असतानाच विरोध डावळून केंद्र सरकारकडून हे बंदर उभारण्यात आल्याने स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com