Marathi News Live: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर

Maharashtra Breaking News Live today : आज बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मनोरंजन, क्रीडा, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स, बिझनेस क्षेत्रातील आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV
Published On

PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर

- पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबर रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार

- ⁠शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचा लोकार्पन सोहळा नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार

- ⁠पुण्याबरोबरच यवतमाळ आणि वर्ध्याला मोदी जाणार

- ⁠यवतमाळ येथे पोहरा देवीच्या दर्शनाला पंतप्रधान जाणार

- ⁠प्रशासनाकडून पंतप्रधानांच्या दौऱ्याची तयारी सुरु

Mumbai News : झाडे तोडण्यासाठी सहज परवानगी देणाऱ्या महापालिकांना उच्च न्यायालयाची तंबी

झाडे तोडण्यासाठी सहज परवानगी देणाऱ्या महापालिकांना उच्च न्यायालयाने तंबी दिली.

१९७५ च्या वृक्ष कायद्याच्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या पालिकांंवर कारवाई

राज्यातील महापालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिला इशारा

वृक्षतोडी संदर्भात दाखल जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

Mla Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होणार 

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. उद्या सुनावणी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. काल आणि आज सलग दोन दिवस ही सुनावणी होऊ शकली नव्हती

lok Sabha : लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप

लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयाचे वाटप करण्यात आहे. यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'शिवसेना (शिंदे)' असा उल्लेख करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख फक्त 'शिवसेना' म्हणून केला जावा यासाठी शिंदे गटाचे नेते आग्रही असतात. त्यात आता लोकसभा सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख शिवसेना (शिंदे) असा करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनात १२८ क्रमांकाचे दालन तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १२८ A हे दालन देण्यात आलं आहे.

 Maharashtra Politics : भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार आणि संजय काकांची भेट झाली. सांगलीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी भेट घेण्यासाठी आल्याचे संजयकाकांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. अर्धा तास शरद पवार आणि संजय पाटील यांच्यात चर्चा झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.

Maharashtra Politics : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी शिंदे गटाकडून समिती स्थापन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम राबवण्यासाठी शिंदे गटाकडून समिती स्थापन करण्यात आली. या योजनेचा कार्यक्रम राबवण्यासाठी शिंदे गटाकडून 'विभाग निहाय समन्वयक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत शिवसेनेच्या सचिव पदी असलेल्या नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र - सचिव भाऊ चौधरी व राजेंद्र चौधरी

पश्चिम विदर्भ - जबाबदारी संजय मोरे व अनिल भोर य

मुंबई व ठाणे - सिद्धेश कदम आणि सुशिबेन शहा

पश्चिम महाराष्ट्र - राहुल शेवाळे व कृष्णा हेगडे

पूर्व विदर्भ - मनिषा कायंदे आणि किरण सोनावणे

मराठवाडा - अमेय घोले आणि अमोल नवले

कोकण - वैभव थोरात आणि रुपेश पाटील

Maharashtra Politics :  शिंदे गटाची निवडणुकीसाठी रणनिती काय असणार? मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर महत्वाची बैठक

शिंदे गटाची निवडणूक नियोजन रणनिती ठरवण्यासाठी मंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यावर बैठक होत आहे.शिंदे गटाची रणनिती बैठकीला जेष्ठ मंत्री उदय सामंत उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांना तात्काळ रत्निगीरीवरून मुंबईला बैठक घेण्यासाठी बोलवले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघांच्या जागावाटपा संदर्भात महत्वाची चर्चा होत आहे. जेष्ठ मंत्री उदय सामंत आणि दादा भूसे यांच्यात शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा संपल्यावर या चर्चेतील रिपोर्ट मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या जागावाटपाचा अंतीम निर्णय घेणार आहेत.

Yavatmal News : यवतमाळमध्ये भटक्या विमुक्तांची संवाद यात्रा दाखल

भटकेविमुक्त, आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा यवतमाळ शहरात दाखल

भटक्या विमुक्तांना देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ही संवाद यात्रा

पुणे येथील फुले वाडा येथून यात्रेला सुरुवात

राज्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून २३ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडकणार

स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना बजेट, जातिनिहाय जनगणना, स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था अशा मागण्या

Pune News : पुणेकरांची मिंटली, पाणी पुरवठा करणारी ४ धरण १०० टक्के भरले

पुणेकरांची चिंता मिटली

पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार ही धरणं १०० टक्के भरले

धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणं फुल्ल

खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव शंभर टक्के भरले

Bjp Meeting: अमित शहा यांच्या मुंबई दौ-यानंतर भाजपा कोअर कमिटीची १८ तारखेला बैठक

विधानसभा निवडणुकिसाठी महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. भाजपा कोअर कमिटी बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे. भाजपाचा मेगा प्लान आणि महायुती मधील जागा वाटप नेमक कसं असावं या संदर्भात कोअर कमिटी मध्ये विचारमंथन होईल.

Dharashiv News :  धाराशिव जिल्ह्यात शिक्षकाने विद्यार्थीनीला पाठवले आक्षेपार्ह मॅसेज

धाराशिवच्या भुम तालूक्यातील आंतरगाव येथील माध्यमीक विद्यालयाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनीचा ईस्टाग्राम , स्नॅपचॅटवर मेसेज पाठवुन लैंगिक छळ केल्या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी शिक्षक धनंजय शिंदे याने अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर तुझ्या आणि माझ्या वयात मोठा अंतर आहे, तरी तू मला आवडतेस. तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे मेसेज वेळोवेळी पाठवून छळ केला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरूद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Nevasa News : नेवाश्यात पिकविमा कंपनी आणि प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण

कागदोपत्री पीक विमा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोात नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय.. 2022 साली नुकसान झालेल्या पिकविम्याची रक्कम मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी केलीये.. पिकविम्याची रक्कम फक्त कागदोपत्री दाखवण्यात आली मात्र प्रत्यक्षात शेतक-यांना रक्कम मिळाली नाही.. प्रशासन आणि विमा कंपन्यानी संगनमताने शेतक-यांची फसवणुक केली असुन वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केलीये... दोन दिवसात पिकविम्याबाबत निर्णय न घेतल्यास नेवासा तहसिल कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिलाय..

Buldhana News : बुलढाण्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर

बुलढाण्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. सरपंच ते आमदार असा प्रवास असणारे धृपतराव सावळे यांनी काँग्रेस मधून २१ ऑगस्ट २०१५ रोजी भाजप् प्रवेश केला होता. भाजपात ज्येष्ठ नेते धृपतराव सावळे यांना अनेक कार्यक्रमात बेदखल करत असल्याने ते अस्वस्थ होते.

Sangamner News : बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; संगमनेर तालुक्यातील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झालीय. संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथील घटना आहे. संगिता वर्पे या 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. घराबाहेर धुणे धुवत असताना केला बिबट्याने हल्ला केला होता. महिलेस 20 ते 25 फुट अंतरावर घराजवळील शेतात ओढत नेले होते. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी केली जातेय.

बीड - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी बीडमध्ये किसान सभा आक्रमण झाली आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे विशेष म्हणजे आज लक्ष्मीपूजन चा सण आहे मात्र या दिवशी शेतकरी महिला आपल्या मागण्या घेऊन या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बीड - मांजरा धरणातील पाणीसाठा वाढला; धरणातील जिवंत पाणीसाठा 76.50 टक्के

बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात जिवंत पाणीसाठा 76.50 टक्के एवढा झाला आहे. त्यामुळे हे धरण कधीही भरण्याची शक्यता निर्माण झालीय. दरम्यान मांजरा नदीकाठच्या गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरण

Summary

मुख्य आरोपी मिहीर शाहने दाखल केलेला डीफाल्ट जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

60-दिवसांच्या अनिवार्य कालावधीत पोलीस आरोपपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याचा दावा करत केला होता डिफॉल्ट जमीन अर्ज

वरळी पोलिसांनी या दाव्याचा प्रतिवाद करून शाह यांच्यावरील आरोपांमध्ये सदोष मनुष्यवधाच कलम वाढवण्यात आल असून कलमंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यास 90 दिवसांपर्यंत वेळ असल्याचा होता पोलिसांचा युक्तीवाद

मिहिर शाह यांच्यावर आरोप आहे त्याने त्याची बीएमडब्ल्यू कारने स्कूटरला धडक दिली , ज्यामुळे कावेरी नखवाचा मृत्यू झाला

अपघातानंतर शाह घटनास्थळावरून पळून गेला होता पण वरळी पोलिसांनी त्याला ९ जुलै रोजी विरार फाट्याजवळ पकडले होते

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, पिके गुडघाभर पाण्यात

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे आज पास असणाऱ्या 20 ते 22 गावातील शेतकऱ्यांच्या पिकांना या पावसाचा जोरदार तडका बसला असून ही पिके आता गुडघाभर पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालय. दरम्यान मागील अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असताना पुन्हा एकदा पावसाने हाहाकार करून शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली. सोयगावसह माळेगाव,पिंपरी,जरांडी, घोसला यासह 20 ते 22 गावात हा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकाचं मोठं नुकसान झालंय.

हिंगोलीत ऐन पावसाळ्यात पाणीबाणी

हिंगोली शहरात ऐन पावसाळ्यात पाणी बाणी निर्माण झाली आहे, पुराच्या पाण्यात हिंगोली पालिकेची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने मागील आठ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने हिंगोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते जुबेर मामू यांनी दहापेक्षा जास्त टँकरद्वारे शहरातील सिद्धार्थ नगर भागात पाण्याचा पुरवठा केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान पुढील दोन दिवस नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

नागपूर हिट अॅण्ड रन प्रकऱणात नवा ट्विस्ट

नागपुरातील ऑडी कारचा अपघात होऊन दोन इतर कार आणि दुचाकी ला धडक बसली... त्या ऑडी कारला अपघाताच्या वेळेला चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

जितेंद्र हावरे हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांनी एकदा महानगरपालिका निवडणूक नागपूरच्या खामला परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती.

गेले काही वर्ष मात्र ते काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन राजकारणात तेवढे सक्रिय नाहीत. मात्र विकास ठाकरे यांनी भूमीका घेतल्यानंतर हा विषय आता समोर आला आहे.

पुणे : ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या निवृत्त जेष्ठ नागरिकाला एक वर्षाची शिक्षा

सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या निवृत्त जेष्ठ नागरिकाला एक वर्षाची शिक्षा

निवृत्त झाल्यानंतर केला अत्याचार

बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड

प्रभाकर पाटील असा आरोपीचे नाव

जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

हडपसर पोलीस स्टेशन मध्ये होता गुन्हा दाखल

बेपत्ता तरुणाचा शिरच्छेद करून निर्घृण हत्या;दोन दिवसापासून होता बेपत्ता 

Summary

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा शिर नसलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. कामानिमित्त झालता पाहता येथे जात असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. धुळे सोलापूर महामार्गावर पांढरी पिंपळगाव शिवारात एका हॉटेलच्या पाठीमागील झुडपात हा मृतदेह आढळला.राजेश विजय कापसे असे या तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर होता. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलीस या संपूर्ण प्रकारचा तपास करत आहेत.

अभियांत्रिकीच्या ५० हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त

राज्यात यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी १ लाख ६४ हजार ३३६ जागा उपलब्ध होत्या.

त्यापैकी तिसऱ्या फेरीअखेर १ लाख १२ हजार ९८१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे.

त्यामुळे अद्याप ५१ हजार ३५५ जागा रिक्त राहिल्या

कोल्हापुरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नी शिवसेना युबीटी आक्रमक

Summary

कोल्हापुरातील रस्त्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागतोय. कोल्हापुरातील खराब रस्त्यांच्या प्रश्र्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. गणपती बाप्पांचं आगमन हे खड्ड्यातून झालं आणि विसर्जन ही खड्ड्यातूनच करणार काय असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेवरती मोर्चा काढलाय. महापालिकेच्या विरोधात यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधलय. यावेळी महापालिका प्रशासकांचा निषेधही व्यक्त करण्यात आला शिवसैनिकांच्या हातातील फलक यावेळेस लक्षवेधी होता गणेश विसर्जन दिवसापर्यंत कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर आता शिवसेना स्टाईलने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिला आहे.

नालासोपाऱ्यात ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

Summary

नालासोपारा पोलिस ठाणे हद्दीत एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.... या प्रकरणात महिलेच्या तक्रारी नंतर आचोळे पोलिस ठाण्यात तीन आरोपिंविरोधातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

नरेंद्र मोर्या, प्रकाश सिंग आणि पंचराज सिंग अशी या आरोपींची नावे असून त्यांना आचोळे पोलिसांनी अटक केली आहे.. या आरोपींना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे...

वैनगंगा नदीच्या प्रवाहात क्रेन गेली वाहून

भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर नवीन पुल बांधकाम सुरू आहेत. तर पुल बांधकाम करतांना मोठ मोठ्या मशीन या ठिकाणि ठेवण्यात आले आहेत. पण दोन दिवसापासून जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर बांधकामात वापरण्यात येणारी क्रेन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तर या क्रेनला आठ किलोमिटर अंतरावर रिस्क्यू करून पाण्याबाहेर काढण्यात आले आहे.

कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला कल्याण जीआरपीने ठोकल्या बेड्या

कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला कल्याण जीआरपीने ठोकल्या बेड्या

बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याची घटना ताजी असताना कसारा रेल्वे स्थानकावर गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक

रेल्वे स्थानकावर गस्ती दरम्यान कल्याण रेल्वे पोलिस आणि आरपीएफने ठोकल्या बेड्या

आकाश श्रीवंत असं तरुणाचं नाव ,आकाश जवळून गावठी कट्टा हस्तगत

आकाश सराईत गुन्हेगार

आकाश विरोधात याआधी देखील नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोकसो आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल

सरकारला धनगर समाजाचा तीन दिवसांचा अल्टिमेटम

Summary

राज्य सरकारकडून पंढरपूर मधील धनगर समाजाचे उपोषण बेदखल, सरकारचा माज मतपेटीतून उतरवू धनगर समाजाचे नेते पांडुरंग मेरगळ यांचा इशारा देण्यात आलाय.

अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मेरगळ यांनी शिंदे फडणवीस आणि पवार यांना इशारा दिला आहे. एका बटणावर या तिघांना आमच्या मेंढरं राखायला ठेवावं लागेल. 2014, 2019 मध्ये धनगरांच्या जीवावर भाजप सरकार आले आहे.

धनगर समाजाचे आंदोलन आता सुशिक्षित तरूणांनी हातात घेतले आहे. त्यामुळे तीन दिवसांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. जर याची दाखल घेतली नाहीतर राज्यभरात याचे पडसाद उमटतील याची जबाबदारी सरकारवर असेल असा इशारा मेरगळ यांनी दिला आहे.

Nashik News : शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीराम शेटे छगन भुजबळांच्या भेटीला

शरद पवारांचे निकटवर्तीय श्रीराम शेटे छगन भुजबळांच्या भेटीला गेले आहेत. श्रीराम शेटे शरद पवार गटाचे नेते आणि पवारांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे. श्रीराम शेटे आणि छगन भुजबळांमध्ये नेमकी काय चर्चा होतेय, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये बेपत्ता झालेल्या तरुणाचा शिर नसलेला मृतदेह सापडला

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा शिर नसलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालीय. कामानिमित्त झाल्टा फाटा येथे जात असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. राजेश विजय कापसे (वय ३५, रा. विजयनगर) असे या तरुणाचे नाव असून, तो व्यवसायाने पेंटर होता.

Pune News : रिक्षामध्ये आढळला महिलेचा मृतदेह, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ 

काळेवाडी येथे ऑटो रिक्षामध्ये महिलेचा मृतदेह आढळला आहे. जगताप नगर लेन नंबर चारमध्ये ही घटना उघडकीस आलीय. महिलेचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

Pune News : कसबा गणपतीला बॉम्ब शोध पथकाच्या श्वानाकडून सलामी

कसबा गणपतीला विराट सलामी देण्यात आलीय. कसबा गणपतीला बॉम्बशोध पथकाच्या श्वानाकडून सलामी दिली गेलीय. आज पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात पुणे पोलिसांच्या बॉम्बशोध पथकाने तपासणी केली. यावेळी पुणे पोलिसांसोबत असलेल्या विराट नावाच्या श्वानाने कसबा गणपतीला सलामी दिली.

Mumbai News : 'विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर 'सन्मान मोर्चा'

कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या विविध मागण्यांसाठी कोरेगाव भीमा ते मंत्रालय, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानावर सन्मान मार्चा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भीमा-कोरेगाव विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सचिव विशाल सोनवणे आणि नीलेश गायकवाड यांनी दिली. हा सन्मान मोर्चा दि. १२ सप्टेंबर रोजी निघणार आहे. जय स्तंभाची दुरुस्ती तातडीने करावी, कोरेगाव-भीमा दंगलीतील ३० हजार कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, जय स्तंभ विकास कामागासाठी १०० कोटींची तरतूद करून शेजारील खासगी जमीन अधिग्रहण करावी, शौर्य दिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी, जय स्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळे पुणे दर्शनमध्ये समाविष्ट करावीत, १९७१ च्या युद्धातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली असून, ती त्वरित काढून दुसऱ्या ठिकाणी मानसन्मानाने लावण्यात यावी, जय स्तंभाच्या ठिकाणी येण्यासाठी पुणे स्टेशन येथून स्वतंत्र बस सोडण्यात यावी, त्याचबरोबर पार्किंगसाठी जय स्तंभाजवळ शासकीय जागेवर आरक्षण टाकण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

Washim News : वाशिम जिल्ह्यातील 74 शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करतांना विषबाधा 

खरीप हंगामातील पिकांवर होणारा किडीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते, मात्र फवारणी करताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने मागील सहा महिन्यात वाशिम जिल्ह्यातील 74 शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे विषबाधा टाळण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती करण्याची गरज निर्माण झालीये.

Pandharpur News : पंढरपुरात डाळिंबाला प्रतिकिलो 200 रूपयांचा उच्चांकी भाव

पंढरपुरात डाळिंबाला प्रतिकिलो सुमारे 200 रूपयांचा भाव मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून डाळिंबाच्या दरात वाढ होत आहे. तेल्या, मर यासह विविध किड रोगामुळे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच सध्या आवक कमी झाल्याने डाळिंबाचे भाव वाढले आहेत. टेंभुर्णी येथील शेतकरी शंकर कदम यांच्या उच्च प्रतिच्या डाळिंबाला प्रति किलो दोनशे रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्थांची गरजेपोटी बांधलेली घरे होणार नियमित

राज्य सरकार नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्थांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा सुधारित अध्यादेश लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा आणि सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या बैठकीतुन सदर माहिती समोर आलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित अध्यादेश सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार लवकरच गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा सुधारित अध्यादेश काढण्यात येणार आहे. हा निर्णय झाल्यास हजारो प्रकल्पग्रस्थांची गरजेपोटी बांधलेली घरे आहे त्या ठिकाणीच नियमित होणार आहेत.

Pune News : 'सारथी' समोर आंदोलन सुरू; आत्मदहनाचा विद्यार्थ्यांचा इशारा

दोन दिवसपासून सारथी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. परंतु सरकारने अजूनही कोणती दखल न घेतल्यामुळे विद्यार्थी आत्मदहन करण्याच्या इशारा दिला आहे. तीव्र स्वरूपाचा आंदोलन उभं करण्याची सुरुवात विद्यार्थी करत आहे.CSMNRF-2023 च्या सारथी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के दराने फेलोशिप मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थ्यांनी 9 सप्टेंबर पासून पुणे येथील सारथीच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, संभाजीनगर, मुंबई, अहिल्यानगर इ. ठिकाणाहून संशोधक विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय न झाल्यास साखळी उपोषण स्थगित करून आमरण उपोषण चालू करून तसेच आत्मदहन करून आंदोलनाची तीव्रत वाढवणार असल्याची माहिती सारथी कृती समितीने दिली .यावेळी सौरभ शिंदे, निखिल मगर,भूषण बिरादार, अभय गायकवाड,वैभव तुरकुंडे,अक्षय घोरपडे, चेतन मांडवडे, अपेक्षा यादव, प्रणाली हांडे,अपेक्षा शिंदे,सुवर्णा धुळे,अपेक्षा निगडे आदी उपस्थित होते उद्या मुलं आत्मदहन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.

सुरतऐवजी उधना येथून सुटतील रेल्वेगाड्या, पुनर्विकास कामामुळे ३० सप्टेंबरपर्यंत बदल

Summary

भुसावळ सुरत रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामामुळे तेथील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील ट्रॅफिक ब्लॉक ३० सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. यामुळे सुरत रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या काही प्रवासी रेल्वेगाड्यांचे टर्मिनस सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानक करण्यात आले आहे. यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत या गाड्या सुरतऐवजी उधना येथून धावतील व त्यांना उधना येथेच अखेरचा थांबा राहील.

शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने डॉक्टरची सव्वा कोटींची फसवणूक

Pune Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी संबंधित डॉक्टरने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी डॉक्टरच्या मोबाईलवर संदेश पाठविला. त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर व्हॉटसॲप ग्रुपमध्ये सहभागी करून मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. आमिषाला बळी पडून डॉक्टरने सायबर चोरट्यांनी दिलेल्या बॅंक खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीवर दहा कोटी २६ लाख रुपये नफा मिळाल्याचे भासविले. डॉक्टरने ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नफ्यावर पाच टक्के रक्कम भरावी लागेल. तोपर्यंत ही रक्कम काढता येणार नसल्याचे चोरट्यांनी त्यांना सांगितले. चोरट्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर डॉक्टरने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत.

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार?

- नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार?

- नाशिक मध्य मतदारसंघावरून एकीकडे भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी

- तर दुसरीकडे नाशिक पश्चिम मतदारसंघात तिकिटावरून भाजप नेत्यांमध्ये जुंपण्याची चिन्हं

- नाशिक पश्चिम मतदार संघात भाजपाचेच सर्वाधिक इच्छुक उमेदवार

- नाशिक पश्चिम मतदार संघात उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच

एसटीच्या पुणे विभागाल मिळणार आता नव्या लालपाऱ्या

२१५ नवीन गाड्यांची खरेदी केली जाणार आहे.

दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशी संख्या आणि अपुऱ्या बसेस संख्येमुळे नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय

ऑक्टोबरमध्ये नवीन बस ताफ्यात दाखल होणार

विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या शिक्षकाला अटक

विद्यार्थ्यांसोबत अभद्र व्यवहार करणाऱ्या शिक्षकाला अटक, शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांची कारवाई

पाणीपुरवठा विभागाचे अभियंताच्या रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन ..

मेहकर आणि लोणार तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक कामांना मंजुरी मिळाली .. मात्र त्यातील अनेक कामे अद्याप अर्धवट पडलेले आहेत, तर अनेक काम पूर्ण होऊनही गावात पाणी मिळत नाही, परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे शिवसेनेचे शिष्ठमंडळ निवेदन देण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात गेले असता पाणीपुरवठा अभियंता आपल्या कार्यालयात हजर राहत नाही.. फोन वर संपर्क केला तर थोड्यावेळात येतो म्हणातात आणि येताच नाही.. शिवाय कोणत्याही प्रकारची माहिती सुद्धा देत नाही , त्यामुळे शिवसेना उबाठा गटाचे नेत्यांनी पाणी पुरवठा अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देत, निषेध व्यक्त केलाय.

पोलिसांकडून व्यावसायिकाला दमदाटी

शहरात पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व आस्थापनांना रात्री दीड वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी आहे. निर्धारित नियमानुसार त्यांनी व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र असे असताना देखील चतुर्श्रुंगी पोलिसांनीज्ञानेश्वर पादुका चौकातील द खालसा जंक्शन या हॉटेलमध्ये घुसून तेथील व्यावसायिकाला रात्री साडे अकरा वाजता दमदाटी केली. तसेच त्याला गाडीमध्ये डांबून एखादा गुन्हेगाराप्रमाणे फिरवत पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

पंढरपुरात बैलगाडा शर्यतीचा थरार

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे बैलगाडा शर्यतीचा धरारा पाहायला मिळाला.

राज्यभरातून सुमारे 350 बैलगाडा स्पर्धक सहभागी झाले होते.

अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक स्पर्धेत श्री विठ्ठल बुलेट बैलगाड्याला एक लाख रूपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

गणेश गल्लीतील अपघात

गणेश गल्लीतील गणेशभक्त आनंद उत्सव साजरा करत असताना अपघात झाला. बसने दिली एका महिलेला धडक, दुर्दैवी घटनेत महिला गंभीर जखमी झाली. सकाळी 5:30 च्या सुमारास घडली घटना, घटनेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. बस महिलेच्या पायावरून गेल्यावर उपस्थित गणेश भक्त बस चालकावर संतापले.

अन्नत्याग आंदोलनाचा दणका..! रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळाची राज्य सरकारसोबत आज होणार बैठक!

सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत रविकांत तुपकर व त्यांच्या शिष्टमंडळाची मुंबई, मंत्रालयात आज बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.

Manoj Jarange : शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी दुसऱ्यांदा घेतली मनोज जरांगे यांची भेट

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी काल रात्री मराठा आंदोलक मनोज जारंगे यांची भेट घेतलीय. यावेळी दराडे यांनी मनोज जरांगे यांचं स्वागत देखील केले. आमदार किशोर दराडे यांनी दोन आठवड्यापूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती, रात्री दुसऱ्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.