Marathi News Live Update: भंंडारामधील मोहाडी तालुक्यात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस

Maharashtra Breaking News Live Updates : आज रविवार दिनांक २३ जून २०२४ जाणून घेऊयात देश विदेश तसेच महाराष्ट्रातील सर्व वेगवान घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

Bhandara Rain: भंडारा मोहाडी तालुक्यात तब्बल दोन तास मुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या वतीने आज भंडारा जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाला होता. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात तब्बाल दोन तास मुसळधार पाऊस बरसला आहे. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

Pune Fire: पुण्यातील धानोरी रोडवरील स्त्री फिटनेस जिमला भीषण आग

लोहगाव चौकातील धानोरी रोडवर स्त्री फिटनेस जिमला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आग अटोक्यात आलीय. कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.

CM Meeting: वर्षा बंगल्यावर मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक सुरू

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षां बंगल्यावर मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महत्वाची बैठक होत आहे. बैठकीला आशिष शेलार, दीपक सावंत आणि उमेदवार किरण शेलार उपस्थित असणार आहेत. दीपक सावंत यांनी याच जागेसाठी मोर्चाबांधणी केली होती.

Congress MP: महाराष्ट्रातील काँग्रेसचे १३ खासदार मराठीतून घेणार शपथ

काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांना मराठी भाषेतून शपथ घेण्याच्या सूचना काँग्रेस पक्षाकडून करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरात पळवले म्हणून मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठीतून शपथ घ्या, असे सांगत सत्ताधाऱ्यांना डिवचण्यात येणार आहे.

Pune Narcotics News: पुणे ड्रग्ज प्रकरण; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आत्तापर्यंत ५ जणांना घेतलं ताब्यात

पुण्यातील एफ सी रोडवर असलेल्या लिक्वीड लीजर लाउंजवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केलीय. आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेण्यात आलंय.

Pune News: पुणे ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोन ताब्यात घेतलं

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी प्रकरणात पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलंय.

Raigad News: अलिबागमध्ये तलावात बुडून २ मुलांचा मृत्यू 

अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावात 2 मुलं बुडाली. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडाली. बेपत्ता मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे. अथर्व हाके आणि शुभम बाला अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश तर शुभमचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

BJP Pune:  पुण्यातील भाजप शहर कार्यालयात आज दुपारी ४ वाजता बैठक

लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी क्लस्टर प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारीबाबत चर्चा होणार आहे. कुठल्या प्रभागातून मतं कशी होती आणि मतांचा ट्रेण्ड कसा होता याबद्दल चर्चा केली जाणार आहे.

Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्या घेणार बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत बैठक घेणार आहेत. बैठकीला मनसेचे नेते आणि सरचिटणीस उपस्थितीत राहणार आहेत. मनसे २२५ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.

Ratnagiri Rain: रत्नागिरी - दापोलीतील जामगे गावातील रस्ता खचला

रत्नागिरी - दापोली या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणार्‍या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास 150 मीटर खोल खचलाय. दरम्यान रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद कण्यात आलाय. मृद जलसंधारण आणि PWD मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहीती प्रशासनाने दिलीय.

Pune Accident News : पुण्यात एसटी बसने पादचाऱ्याला उडवलं, एकाचा जागीच मृत्यू

पुणे-अहमदनगर महामार्गावर एसटी बसने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत ४१ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृताच ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तो पादचारी पुणे नगर महामार्ग ओलांडत होता. राजगुरुनगर ते पैठण ही बस नगरच्या दिशेने जात असताना त्याला बस ची धडक बसली. बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती कळताच लोणीकंद पोलीस व लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृत व्यक्तीला ससून रुग्णालयात हलवून बस रस्त्यातून हटविली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर बस चालक पळून गेला होता. नंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला.

Dharashiv News : धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाची नियोजन बैठक सुरू

धाराशिवच्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठक सुरू

मनोज जरांगे पाटील यांची १० जुलै रोजी धाराशिव मध्ये शांतता रॅलीची केली घोषणा

सरसगट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज निर्णायक भुमीकेत

मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातुन काढण्यात येणार भव्य शांतता रॅली

Sangli News : पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचाच असेल, विश्वजीत कदम यांचं भाकीत

येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सांगलीचा असेल हा काळ ठरवेल. मात्र काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री येणाऱ्या काळात होईल, असे भाकीत माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केले आहे. ते सांगलीच्या मिरजेमध्ये सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

सांगलीच्या मिरजेमध्ये नूतन खासदार विशाल पाटील यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री विश्वजीत कदम, विशाल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी भाजपवर टीका करत लोक भाजपवर कंटाळले आहेत.

त्यामुळे लोकांनी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य दिले आहे आणि उमेदवार निवडून दिले आहेत. तसेच येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असेल आणि सांगली जिल्ह्याचा असेल तो काळ ठरवेल असं भाकीत विश्वजीत कदम यांनी केले आहे..

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडगाव येथे ढगफुटीसदृश्य पाऊस, पाहा VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर तालुक्यातल्या माळीवाडगाव येथे शनिवारी संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून सगळीकडे पाणीच पाणी झालं. आहे. शेतात पावसाचं पाणी शिरल्याने बंधारे फुटून पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Beed News : बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी पळवलेले एटीएम

बीडच्या धारूर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन 4 चोरांनी अवघ्या 2 मिनिटात काढत, पिकअपला बांधून पळवल्याची घटना काल शनिवारी घडली होती. तर ही एटीएम मशीन पळवून घेऊन जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले होते.

ही माहिती बँक कर्मचारी व पोलिसांना समजताच, 4 तासांमध्ये 61 किलोमीटरच्या पाठलागानंतर, बीडच्या गेवराई परिसरातील जायकवाडी शिवारात असलेल्या पत्र्याच्या शेडमधून, अखेर एटीएम मशीन जप्त केली आहे.

विशेष म्हणजे या मशीनमधील 21 लाख 13 हजार 700 ची रोकड परत आणली गेली आहे.धारूरचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांसह ही कारवाई केली असून फरार असणाऱ्या चार आरोपींचा शोध पोलीस करत आहेत.

Pandharpur News : विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण; आषाढीला मंदिराचे मुळ रूप पहाता येणार

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सातशे वर्षापूर्वीचे मुळ रूप देण्याचे काम सुरू असून विठ्ठल आणि रूक्मिणीच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. याच नव्या रुपातील विठ्ठल मंदिरात येत्या 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. यासाठी राज्य शासनाने 74 कोटी रूपयांचा निधी दिली आहे. मागील अडीच महिन्यांपासून हे काम सुरू आहे. आता पर्यंत मंदिरातील जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

Baramati News : राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो गायब

इंदापूर

इंदापूर तालुका राष्ट्रवादीच्या बॅनरवरून आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो गायब...

खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याने त्यांना शुभेच्छा देणारे लागले होते इंदापूर मध्ये बॅनर

इंदापूर तालुका राष्ट्रवादी कडून लागले होते प्रत्येक चौका चौकात बॅनर.

मात्र या बॅनर वर चक्क इंदापूर चे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो नसल्याने तालुक्यात चर्चेला उधाण..

मुद्दाम कोणी खोडी काढली..? की राष्ट्रवादी पक्षात इंदापूर तालुक्यात दुफळी झाली ? चर्चेला उधाण..

मात्र ही चूक लक्षात येताच हटवले बॅनर...

Vijay Shivtare News : मी चौथीत असताना बिड्या प्यायचो : विजय शिवतारे

लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा विजय शिवातरे यांनी केला आहे. चौथीत असताना जनावरे वळायला जायचो त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायची.

बिडी ओढली की चक्कर येऊन पडायचो, असा खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवातरे यांनी सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली त्यावेळी ते बोलत होते.. पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.

Dehu News : देहूगावात चोरट्यांचा सुळसुळाट, आठवडाभरात ८ ते १० दुकाने फोडली

देहूमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठ दिवसात देहूगाव मध्ये आठ ते दहा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मुख्य चौकातील अनेक दुकाने आतापर्यंत चोरट्यांनी फोडली असून यात लाखो रुपयांचा ऐवज चोरी करण्यात आला आहे. मात्र एका मोबाईल शॉपी मध्ये चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

त्यामुळे या सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी चोरट्याना शोधावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तर पाच दिवसांवर पालखी सोहळा आल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातील देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी येथे गस्त वाढवावी अन्यथा राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या मौल्यवान वस्तूंवर हे चोरटे हात मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dharashiv News : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात लांबच लांब रांगा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने राज्यातील कान्याकोपऱ्यातून भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत. यावेळी देवीच्या घोषणांनी परिसरत दुमदुमून गेला आहे.

Mumbai Rain News : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांची तारांबळ

मुंबईसह उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सीएसएमटी, मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव भागात सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पावसाची बॅटिंग सुरू आहे. येत्या ३-४ तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांनी काम असल्यास तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Nashik News : सप्तश्रृंगी गडासह ३१ गावांना दरड कोसळण्याचा धोका, सुरक्षेसाठी ९१ कोटींचा प्रस्ताव

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या गडासह नाशिक जिल्ह्यातील ३१ धोकादायक गावांची यादी तयार करण्यात आली आहे. पावसाळ्यात गडासह डोंगररांगाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापना ने जिऑलॉजिकल विभागाला सर्वेक्षणासाठी प्रस्ताव पाठवला आहे. गडावर जातांना अनेक ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळून, रस्ता बंद होणे ,रस्त्यावर मातीचे ढीग जमा होऊन रस्ता वाहतूकीसाठी बंद होत असल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी गडाच्या सुरक्षेतेसाठी विशेष बाब म्हणून हा प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आला आहे.

Karnataka News : प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज रेवन्नाला अटक, कर्नाटक पोलिसांची कारवाई

कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणात काही दिवसांपूर्वी JDS नेते प्रज्वल रेवन्नाला अटक केली होती त्यानंतर आता त्याच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज रेवन्ना यांनाही कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. सूरज यांच्यावरही लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

JDS पक्षाच्या एका पुरुष कार्यकर्त्याने सूरजवर समलैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. पक्षाच्या एका तरुणाने पोलिसात तक्रार देताना दावा केला आहे, की 16 जून रोजी आमदार सूरज रेवन्ना यांनी त्याला त्याच्या फार्महाऊसवर बोलावून त्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर पोलिसांनी काल गुन्हा दखल करून आज त्यांना अटक केली आहे.

Buldhana News : मोताळा येथील ज्वेलर्स मालकावर चाकूहल्ला; सोने-चांदीचे दागिने हिसकवण्याचा प्रयत्न

मोताळा येथील विजय ज्वेलर्सचे मालक राजेंद्र वाघ यांच्यावर शनिवारी सायंकाळी अज्ञात दरोडेखोरांनी चाकूहल्ला केला. त्यांच्या हातातील सोने-चांदीचे दागिने हिसवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर हल्लेखोरांनी राजेंद्र वाघ यांच्या डोळ्यात मिरची पावरडर देखील फेकले. आरडाओरड झाली असता, परिसरातील नागरिक जमा झाले.

त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेत राजेंद्र वाघ यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करत दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.