माझं घराणं संपूर्ण महाराष्ट्राच्या आंदोलन उतरलं होतं
मला डोकं वापरायचं आहे खोकं नाही
महाराष्ट्राची आज ओळख काय आहे? गुंडांच्या देशा, लाचार देशा, गद्दारांच्या देशा अशी ओळख झाली आहे
काय ओळख होती आपली, कणखर देशा, महाराष्ट्र देशा
गरजा जयजयकार क्रांतीचा, क्रांती कोणी करायची?
हे वर्ष क्रांतीचं वर्ष आहे, यावर्षी आपण चुकलं तर राज्य सोडा देश संपला म्हणून समजा
ती इंग्रजांची गुलामी होती, आता यांची स्विकारावी लागेल
राज्य करणं म्हणजे सूड उगवणे नव्हे, मात्र हे सांगितलं तर एसआयटी, ईडी मागे लावतात
आंदोलक शिष्टमंडळाची मुंबईतील बैठक संपली
सरकार सोबतची बैठक ठरली निष्फळ
नाशिक येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार
गेल्या दोन दिवसांपासून हजारो शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आहे ठाण मांडून
शासन दरबारी झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारसोबत होती बैठक
बैठकीला पालकमंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह होते प्रशासनाचे अधिकारी
४८ जागांवर कोण लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
उद्याच्या बैठकीनंतर पुन्हा बैठक होणार नाही
आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीही सहभागी
जरागे आणि माझा संबंध , त्याचं उपोषण सुरू झालं तेव्हा भेटलो, त्याच्या मागण्यासाठी पाठिशी आहोत, दोन समजात काही होईल अस वागू नको, एवढंच बोलणं झालं. त्यानंतर जरांगेंशी बोलणं झालं नाही. टोपे वर आरोप केले जात आहेत हे पण चुकीच आहे. जबाबदार लोक असं पोकळ बोलतात. हा पोरकटपणा आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव , नांदुरा , मोताळा तालुक्यात अवकाळी पावसाला सुरुवात.
काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता.
अहमदनगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी.
विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची हजेरी.
दुपारपासून शहरात होते ढगाळ वातावरण...
काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता...
शहरातील अनेक भागात वीज पुरवठा केला खंडित...
लोकसभा निवडणुकीसाठी आप कडून काही उमेदवारांच्या नावांची घोषणा
दिल्ली-हरियाणा उमेदवारांच्या नावाची घोषणा
नवी दिल्ली लोकसभा - सोमनाथ भारती
दक्षिण दिल्ली लोकसभा - सहीराम पहलवान
पश्चिम दिल्ली लोकसभा - महाबल मिश्रा
पूर्व दिल्ली लोकसभा - कुलदीप कुमार
हरियाणा राज्यातील करुक्षेत्र लोकसभा - सुशील गुप्ता
काहीच दिवसांपूर्वी आप आणि काँग्रेस च जागावाटप झाल होत
त्यानंतर आता आपने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे
नाशिकच्या नांदगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून तालुक्यातील बेजगाव,मोहदरी या डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.पावसळयात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा अवकाळी पाऊस बरसल्याने कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आजच्या अधिवेशनात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानंतर एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगें उपोषनस्थळावरील मंडप काढण्याचे आदेश देण्यात आले असून आता त्याठिकाणी पोलीस देखील पोहोचले आहेत.
विधीमंडळ परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर
"देवेंद्र फडणवीस सगळा महाराष्ट्र आपल्या सोबत" आशयाचे बॅनर
विधीमंडळ चौकात भाजपकडून बॅनर लावत फडणवीस यांना पाठिंबा
भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके यांनी लावले बॅनर
विकासाच्या नावाखाली घोषणांचा पाऊस, मात्र आधीच्या घोषणांचं काय झालं? यांच उत्तर कोण देणार
शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही
मतं विळवण्यासाठी सरकारचा फंडा सुरू आहे
कोणतीही ठोस तरतूद नाही
रोजगार हिरावले जात असताना ठोस तरतूद नाही
केवळ स्मारकांसाठी तरतूद करण्यात आली आहे
राज्य कर्जबाजीरी
निवडणूक झाली की जनतेची लूट सुरू होईल
अंमळनेरमध्ये साने गुरुजींचं स्मारक उभारणार
प्रतापगडाच्या पायथ्याशी जीवा महालांचं स्मारक
आशियाई स्पर्थेत खेळाडूंना सुवर्णला १ कोटी, रजतला ७५ लाख तर कांस्यला ५० लाख रुपये बक्षिस देणार
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थ संकल्प सादर केला. राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असून लोकसभा निवडणुकीनंतर अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अंतरिम अर्थसंकल्पात १ लाख रोजगार रोजगाराचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून ३०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचं सरकारचं उद्दीष्ट सरकारचं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यासह रस्ते, बंदरं आणि विमानतळांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थ संकल्प सादर करत आहेत
लोकसभा निवडणुकीनंतर अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाईल
जीएसटीची केंद्राकडून ८००० कोटी रुपये मिळाले
सहा वंदे भारत सेवा सुरु झाल्या
नरीमन पॉईंट ते वरळी कोस्टल रोडमुळं ७० टक्के वेळ वाचणार आहे
नगर विकासाठी १० हजार कोटी तर सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी १९ हजार कोटी रुपये देणार
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे
रेडियो क्लब इथं जेटींसाठी बंदर बांधण्याचं काम हाती घेतली आहेत.
१ ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरू आहे
वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे
सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणखी सुरु करणार
रेडीओ क्लब जेटीसाठी २२७ कोटी रुपयांच्या काम सुरु होणार आहे
मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे
नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार
डाओसमधील करारानुसार ३ लाखाहून अधिक उद्योग राज्यात
राज्यात १८ लघु उद्योग स्थापन केली जाणार
पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प आहे
शिवनेरी या ठिकाणी
११ गडकिल्ल्यांना जागतीक पातळी वर जाण्यासाठी युनेस्को ला प्रस्ताव पाठवला आहे
नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन प्रक्रिया सुरुय
रेडियो क्लब इथं जेटींसाठी बंदर बांधण्याचं काम हाती घेतलंय
फलटण ते पंढरपुर रेल्वेमार्गाला मंजूरी
उर्जा विभागाला खर्चासाठी ११ हजार कोटी रुपयांचा निधी प्रलंबित
शहरातील महिलांना ५००० पिंक रिक्षा दिल्या जातील
महिला आणि बाल विकास खात्यासाठी ३७०० कोटी रुपयांची तरतूद
संजय गांधी निराधार योजनेत १००० वरुन १५०० पेन्शन दिली जाणार
सारथीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करणार
अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत ही संस्था स्थापन करणार
आदिवासी विभागासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद
ओबीसी आणि अल्पसंख्यक विभागासाठी ५००० रुपयांची तरतूद
असंघटित कामगार महामंडळाची स्थापना
टैक्सी, क्लीनर यांच्यासह इतर असंघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी फायदा होणार
लोणावळ्यात ३३० कोटी रुपयांचा स्कायवॉक उभारला जाईल
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
जम्मू काश्मिरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार
दिल्ली, बेळगाव मराठी भाषा भवन उभारणार
परभणी शहर महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे, वाढीव जीएसटी मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्याचे वेतन अदा करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी,1993 ते 2000 पर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रभारी पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरील पदावर कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेचे कामकाज पूर्णपणे बंद पडले आहे. परिणामी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विधीमंडळात थोड्याच वेळात कॅबिनेट बैठक सुरु होणार.
कॅबिनेट बैठकीत अंतरिम बजेटला मंजुरी दिली जाणार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार दाखल.
मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमध्ये अजित पवार यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरु.
कोकण प्रादेशिक पक्षाचे निवडणूक आयोगाला चिन्हं मिळण्यासाठी पत्र.
५ मार्चला केंद्रीय निवडणुक आयोग पक्षाला चिन्हा संदर्भात निर्णय देणार.
कोकण प्रादेक्षिक पक्षाने केंद्रीय निवडणुक आयोगाकडे केलं पक्षाचं सजिस्ट्रेशन.
कोकणात उद्धव ठाकरे सेना, भाजपा आणि कोकण प्रादेक्षिक पक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता.
कोकणातून कोकण प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीत मुंबईसह कोकणातील १२ जागा लढवणार.
राज्यात सर्वांत चर्चा असलेल्या रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारातील सुद्धा जागा लढवणार.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मनोज जरांगेंच्या पाठीमागे कोण आहे? याची चौकसी देखील होईल, असंही फडणवीस म्हणाले.
रिझर्व बँकेकडून स्टेट बँक ऑफ इंडियावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठेवीदार शिक्षण जागरुकता निधी योजनेत नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कोटींचा दंड ठोठवण्यात आला आहे. रिझर्व बँकेकडून स्टेट बँक ऑफ इंडियाला दोन कोटींचा दंड बजावण्यात आला आहे.
- आदिवासी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ मुंबईतील बैठकीसाठी रवाना
- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दीड वाजता आदिवासी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक
- माकप नेते जे.पी.गावित यांच्यासह शेतकऱ्यांचे प्रतिनिधींची सरकारसोबत होणार बैठक
- वनहक्क जमिनीच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी होणार बैठक
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरात जेटिवर उभा असलेला टेम्पो समुद्रात उलटला. टेम्पोत मासळी भरण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून हायड्रा आणि जेसीबीच्या सहाय्याने रात्री उशिरा हा टेम्पो बाहेर काढण्यात बचाव यंत्रणांना यश आले.
अवकाळी पावसाचा विदर्भाला मोठा फटका बसला असून शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा आणि बाळापुर तालुक्यात फळबाग तसेच कांदा, निंबू, गव्हाचे पीके आडवे झाले आहे. तर हरभरा सोंगणी केल्यानंतर शेतात लावलेल्या हरभऱ्याच्या गंजी, कालच्या पावसानं भिजल्या गेल्या. विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्ऱ्यांसमोर आस्मानी संकटात ठाकलं आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (२६ फेब्रुवारी) सुरू झाले असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या अर्थमंत्री अजित पवार अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यामुळे कोणकोणत्या मोठ्या घोषणा होतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
दुसरीकडे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. मराठा आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे हजेरी लावली असून रब्बी पिकांची नासधूस झाली आहे.
त्यामुळे बळीराजा संकटात साडला आहे. यासह देशविदेश तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींचा प्रत्येक आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहेत.त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.