
हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्या आणि त्याठिकाणावरून जेवण मागवणाऱ्यांसाठी खूपच महत्वाची बातमी आहे. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने सोमवारी म्हणजे येत्या १४ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांविरुद्ध असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणजे आहार संघटनेने १४ जुलै २०२५ रोजी एल्कार पुकारला आहे. या संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सोमवारी राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. यामुळे राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आहार संघटनेने महाराष्ट्र बंदच्या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक का दिली यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, '१४ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी बंद! अन्यायकारक कराच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम्स आणि बार बंद करणार आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग आवाज उठवत आहे. सोमवार १४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम्स आणि बार आपल्या उद्योगावर लादलेल्या अन्याय आणि प्रचंड कर वाढीच्या निषेधार्थ संपूर्ण बंद पाळतील.'
'दारूवरील व्हॅट दुप्पट, परवाना शुल्क १५ टक्केने वाढवले, उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ केली. या राज्य सरकारच्या कठोर बदलांमुळे असंख्य लहान आणि मध्यम आस्थापनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे ज्यामुळे हजारो नोकऱ्या आणि उपजीविका धोक्यात आली आहे. निष्पक्ष धोरणांची मागणी करण्यासाठी आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) द्वारे या बंदची हाक देण्यात आली आहे. आम्ही सर्व उद्योग भागधारकांना एकत्र येऊन मजबूत उभे राहण्याचे आवाहन करतो. चला एक स्पष्ट संदेश देऊया - आता पुरे झाले!', असे देखील आहार संघटनेने सांगितले.
सरकारच्या करविषयी धोरणाविरोधात आहार संघटनेने बंद पुकारला आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे आहार संघटनेने सांगितले. आहार संघटनेच्या नेतृत्वाखआली २० हजाराहून अधिक हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी सरकारच्या अन्यायकारक कर धोरणाचा विरोध करण्याचे ठरवले आहे. या बंदचा सर्वाधिक परिणाम मुंबी, पुणे, नाशिक, नागूपर, कोल्हापूरसह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. सोमवारी राज्यभरातील सर्व परमिट रूम, बार आणि हॉटेल-रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. आहार संघटनेचा हा बंद शांततेत असणार आहे. पण जर सरकारने दखल घेतली नाही तर येत्या काळात हिंसक आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, नागपूरमधील परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी सांगितले की, शासनाने मागील ३ वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीने व्हॅट दहा टक्क्यांनी वाढवला. तसेच परमिट रूम नूतनीकरण फी १५ टक्केने वाढवली आणि एक्साईज ड्यूटी तब्बल १५० टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे परमिट रूम वाढवलेले व्हॅट कमी करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सरकारला महसूल वाढवायचा असेल तर आमच्याशी चर्चा करावी. चर्चा केल्यास यावर तोडगा काढला असता तर आम्हीही महसूल वाढवण्याचे अनेक पर्याय सुचवले असते. पण सरकारने घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप राजीव जयस्वाल यांनी केला. वाढीव दहा टक्के व्हॅट लावल्यामुळे परमिट रूम असोसिएशनच्या वतीने नाराजी व्यक्त करत १४ तारखेला एक दिवस परमिट रूम बंद ठेवत निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.