Maharashtra-Karnataka Border Dispute : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे. या सीमावादावर आता शिंदे-फडणवीस सरकारने विधानसभेत ठराव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत ठरावाचं वाचन करण्यात आलं. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा ठराव तत्काळ मंजूर केला. सीमावादाचा हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला असून महाराष्ट्रातील एक इंचही जमीन कर्नाटकात जाणार नाही, असं या ठरावात मांडण्यात आलं आहे. (Maharashtra Political News)
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्राच्या विधानसभेने कर्नाटक प्रशासनाच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
सोमवारी सीमाप्रश्नी ठराव सादर न झाल्याने विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी शिंदे-भाजप (Eknath Shinde) सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. उद्धव ठाकरे सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नी ठरावा सोमवारी अथवा मंगळवारी सादर होईल असे म्हटले होते. (Latest Marathi News)
त्यानंतर आज विधानसभेत ठराव सादर करण्यात आला. राज्य सरकारने सादर केलेल्या ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दुरुस्ती सूचना केल्या ठरावात बेळगाव, निपाणी, भीदर या शहरांचा उल्लेख ठरावात आवर्जून करण्याची मागणी त्यांनी केली.
ठराव हा आगामी काळात कायदेशीर लढाईतही महत्त्वाचा ठरू शकतो, याकडे लक्ष वेधत अजित पवार यांनी ही सूचना केली. त्याशिवाय, या ठरावातील वाक्यरचना, व्याकरण दुरूस्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या सूचनांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे सांगितले.
Edited By- Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.