Navneet Rana : फडणवीसांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य अन् उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील - नवनीत राणा

देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेल मध्ये जातील असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.
Navneet Rana
Navneet RanaSaam Tv

नागपूर - सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे राज्यातीलराजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. नागपूर (Nagpur) येथील अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Navneet Rana
Eknath Shinde : समृद्धी महामार्गालगतची जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मुखमंत्र्यांकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण

तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेल मध्ये जातील असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलं आहे.

...तर माझा 5 वर्षांचा पगार राऊतांना देईल : नवनीत राणा

उध्दव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल असं आव्हान खासदार राणा यांनी ठाकरेंना दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व काम तोंडपाठ आहेत. पण उध्दव ठाकरे यांना एकही प्रपोजल तोंडपाठ नाही. अडीच वर्षात एकाही प्रकल्पाचं उद्घाट्न केल्याचं उद्धव ठाकरेंना आठवत नसेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनतेला विकास काम हवी आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी विधानसभा नाही. विधानसभेच्या प्रत्येक मिनीटासाठी महाराष्ट्रातील नागरिक पैसै भरतात. त्यामुळे विधानसभेत जनतेच्या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजं,” असे आवाहन नवनीत राणांनी केलं आहे.

Navneet Rana
Sanjay Raut: 'त्या' प्रत्येकाचे राजकीय बॉम्ब फोडू; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

कोण कोणता बॉम्ब फोडेल, यात लोकांना रस नाही. अडीच वर्षात काय काम केली, याची दहा नावं सांगावी. काम करताना प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात. जर, ते बाहेर काढण्यास सुरुवात केली तर, यांना जड जाईल. देवेंद्र फडणवीसांनी लवंगी फोडली तर भारी पडेल. मात्र,देवेंद्र फडणवीसांना फटाके फोडण्यात रस नाही,” असे नवनीत राणांनी म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com