Maratha Aarakshan LIVE Updates: अन्यथा आमच्या नाराजीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा; मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा

Maharashtra Vishesh Adhiveshan on Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. पुढच्या काही तासांत होणारं हे विशेष अधिवेशन महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असणार आहे. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे..
Today Maratha Reservation LIVE  News in Marathi | Latest Updates on Manoj Jarange Patil Press Conference, Maharashtra Assembly Special Session (Maharashtra Vishesh Adhiveshan) in Marathi
Today Maratha Reservation LIVE News in Marathi | Latest Updates on Manoj Jarange Patil Press Conference, Maharashtra Assembly Special Session (Maharashtra Vishesh Adhiveshan) in MarathiSaam TV

अन्यथा आमच्या नाराजीला सामोरं जाण्याची तयारी ठेवा; मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा

आंदोलनाशीवाय गोर गरीब मराठ्यांना पर्याय नाही....

तुम्हाला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की

आम्ही आमच्या न्यायासाठी लढत आहोत

ऑन भारत गोगावले कायदा मान्य करावा लागेल... जारांगेंनी थांबावं:

हा कायदा सुद्धा याच गोरगरिबांनी दिला आहे

आम्ही स्वीकारलं आहेच... पण मूळ मागणी ही ओबीसीमधून आरक्षणाची आहे

मूळ मागणीचे काय झालं? हे सांगा बाकीचं नका सांगू

पुणे पोलिसांची दिल्लीत मोठी छापेमारी, ८०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती महाराज निवडणूक लढवणार, शरद पवारांनी दिले संकेत

मागील काही दिवसापासून शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती

आज शरद पवार यांनी new पॅलेस येथे भेट देऊन केली चर्चा

शाहू महाराज राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रमतात पण लोकांची मागणी असेल तर मला आनंद वाटेल अशी प्रतिक्रिया

महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले

सुप्रिम कोर्टात काय होईल सांगता येत नाही, मराठा आरक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर नवनीत राणा यांचे राजकीय भवितव्य अवलंबून

खासदार राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज राणा यांच्या वकिलांनी मांडली बाजू,

राणा यांच्या वतीने ध्रु मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली .

उद्या अडसूळ यांच्या वतीने मांडली जाणार बाजू. आजच्या या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान खा नवनीत राना या अनुपस्थित होत्या तर माजी खा आनंद अडसूळ हे उपस्थित होते.

खासदार आनंदराव अडसूळ यांच्या वतीने कपिल सिब्बल,सचिन थोरात, सादन पराशर.हे उद्या सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार.

उद्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर सर्वोच्च न्यायालय नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा अंतिम निकाल देणार.

मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर विधानभवनाबाहेर शक्तिप्रदर्शन

खात्री पटल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणे कठीण, मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण विधानसभेत एक मताने मंजूर होताच नागपुरात सकल मराठा समजकडून जल्लोष

महालातील शिवाजी महाराज पुतळा चौक येथे मराठा समाजाकडून जल्लोष

मराठा समाजाच्यावतीने हा जल्लोष केला जाणार

कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली

कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली

२६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान अर्थ संकल्पीय अधिवेशन

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

खात्री पडल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणे कठीण- उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणावर दोन मतं नाहीत

मात्र खात्री पडल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणे कठीण

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला म्हटलं, मात्र जनतेचा विश्वास नाही

छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक

मनोज जरांगे दादागिरी सुरु आहे

मनोज जरांगेंना आवरायला हवं

छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार

कुणावर अन्याय नाही, कुणाला धक्का नाही

असा निर्णय आम्ही घेतोय

मनोज जरांगे यांच्या लढाईचा विजय आहे

मराठा समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हाच पर्याय आहे

मराठा समाजाला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचं समाधान आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा समाजाला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचं समाधान आहे

शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरु


राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज सुरु

मराठा आरक्षण विधेयक मांडण्यास मंजुरी

मराठा आरक्षण विधेयकावर सर्वच पक्षातील नेत्यांची सावध भूमिका

मराठा आरक्षण विधेयकावर सर्वच पक्षातील नेत्यांची सावध भूमिका

मराठा आरक्षण विधेयक बिनविरोध पारित केले जाणार

कुठल्याही समाजाला न दुखवण्याचा प्रयत्न

काँग्रेसकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधीमंडळात उत्तर दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती

कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आझाद मैदान परिसरात आंदोलन

कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आझाद मैदान परिसरात आंदोलन

आंदोलनात ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे देखील सामील

सरकार मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात बॅक डोअर एन्ट्री देत असल्याचा प्रकाश शेंडगेंचा आरोप

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात घराला लागली आग

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात घराला लागली आग....

आगीतून दोन जणांना काढले बाहेर; सराफ गल्लीतील घराला आग.....

हरेशकुमार खेमचंद गोपालनी कपडा व्यापारी घरात आग ...

धगधगत्या आगीतून दोन जणांनी वाचवले प्राण...

आग कशामुळे लागली अजून कळू शकले नाही; घटनास्थळी स्थानिकांची मोठी मदत

मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न;काही वेळानंतर अग्निशामक बंब दाखल

घरातून दोन गॅस सिलेंडर रहिवाशीनी उतरवले मोठा अनर्थ टळला

रेडीमेड कपडे जळून खाक मोठे नुकसान; स्थानिकांनी उर्वरित कपड्याचे गट्टे बाहेर काढले...

सीएसएमटी परिसरात कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन

सीएसएमटी परिसरात कुणबी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेण्याची कुणबी एकीकरण समितीची मागणी

कुणबी एकीकरण समितीमध्ये कुणबी समाजाच्या एकूण 65 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी

ओबीसीमधून कुठल्याही प्रकारे आरक्षण दिलं जाऊ नये ही प्रमुख मागणी

सीएसएमटी ते मेट्रो सिनेमादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त

महविकास आघाडीचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद उपसभापती यांना पत्र

महविकास आघाडीचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद उपसभापती यांना पत्र

विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे खालील मुद्द्यांबाबत स्पष्टता यावी

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार

सगेसोयरे अधिसूचनेबाबत स्पष्टता द्यावी

सोलापूरच्या बार्शीतील मराठा आंदोलकाची तब्येत ढसाळली

सोलापूरच्या बार्शीतील मराठा आंदोलकाची तब्येत ढसाळली

मराठा आंदोलक आनंद काशिद यांचे मागील दहा दिवसापासून आमरण उपोषण

मात्र काशीद यांची प्रकृती काल ढसाळल्यामुळे त्यांना सलाईन लावण्यात आले

जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे तोवर माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका उपोषणकर्ते आंनद काशिद यांनी घेतलीय.

फसवणूक नको आरक्षण हवं, काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं लक्षवेधी जॅकेट

धीरज देशमुख

आमची सरकारकडे मागणी आहे की मनोज जरांगे जे मुद्दे मांडत आहेत ते विचारात घ्यावेत

जरागे पाटील यांच्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे

ज्यांचे कुणबी दाखले सापडले आहेत त्याचे काय होणार?

फक्त निवडणुकीच्या काळात सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे

परत समाजाची फसवणूक होऊ नये म्हणून हा पोशाख घातला आहे

Maratha Samaj: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं- मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं

ओबीसीमधून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या

स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणीच नव्हती

Maratha Aarakshan Update: मराठा आरक्षण जाहीर होताच राज्यभरात जल्लोष करणाच्या शिवसेना पदाधिकारी व आमदारांना सूचना

मराठा आरक्षण जाहीर होताच राज्यभरात जल्लोष करणाच्या शिवसेना पदाधिकारी व आमदारांना सूचना

आमदारांना मतदारसंघात रॅली व जल्लोष करत, सरकारने दिलेल्या आरक्षणाचे बॅनर लावण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या सूचना असल्याची सूत्रांची माहिती

आरक्षण जाहीर होताच विधीमंडळाचे कामकाज संपवून शिवसेना आमदार आपल्या मतदारसंघात रवाना होणार

मागासवर्ग आयोगाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

मागासवर्ग आयोगाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल, थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात

मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यावर कायदा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आहे. अगदी थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आहे.

राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडकोट बंदोबस्त

राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनासाठी विधानमंडळ परिसरात कडकोट बंदोबस्त

कुणबी एकीकरण समिती आक्रमक झाल्याने पोलीस त्यांच्यावरही लक्ष ठेवून

मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांकडून काही गडबड होऊ नये या उद्देशाने विशेष खबरदारी

सहा उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शेकडोहून अधिक पोलीस तैनात

मागासवर्ग आयोगाच्या अहवालात काय? समोर आली महत्वाची माहिती

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने राज्यभरामध्ये मराठा समाजाच सर्वेक्षण केलं. त्यानंतर सर्वेक्षणाचा अहवाल दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांना सुपूर्त केला.

राज्य मागास आयोगाच्या अहवालात महाराष्ट्रातील मराठा समाज हा आर्थिक तसेच शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असल्याची माहिती आहे. त्यामुळे घटनेच्या १५ (४) आणि १६ (४) या अनुच्छेदानुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरतो, असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे.

विशेष अधिवेशनापूर्वी मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. पुढच्या काही तासांत हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाआधी मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही शब्द देताय पण अंमलबजावणी करत नाहीत, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

तुम्ही अंमलबजावणी केली तर लोक खुश होतील. मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, असं आम्ही कधीच म्हणलो नाहीत. फक्त त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

विधिमंडळाचे आज विशेष अधिवेशन; मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. पुढच्या काही तासांत होणारं हे विशेष अधिवेशन महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असेल. कारण, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत. तर जरांगे पाटील सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेवरुन कायदा करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आज नेमकं काय होतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com