महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार राज्यात महायुतीला चांगेल यश मिळताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात भाजपला जबरदस्त विजय मिळताना दिसत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप १२७ जागांवर आघाडीवर आहे.
भाजपने राज्यात १४८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. अशाप्रकारे ८४ टक्के स्ट्राइक रेटसह महाराष्ट्रात भाजप सत्तेच्या जवळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील बहुमताचा आकडा १४५ आहे आणि १२७ जागा जिंकल्यास महायुतीला फक्त १८ आमदारांची गरज आहे. या मोठ्या विजयाने भाजपने महाराष्ट्रात आपली ताकद वाढवली आहेच शिवाय महायुतीमध्ये आपली पकडही आणखी मजबूत केली आहे.
महाराष्ट्रात भाजपला सर्वात जास्त यश मिळाल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा बनेल असे म्हटले जात आहे. त्यासाठी ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली येणार नाहीत. दरम्यान, भाजपमध्ये दोन नावांची चर्चा सुरू असून ते या मोठ्या विजयाचे शिल्पकारही असल्याचे मानले जात आहेत. हे दोन नेते म्हणजे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव हे आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दोन्ही केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्रामध्ये प्रभारी बनवले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील ४८ पैकी केवळ ९ जागा मिळाल्या होत्या. अशा स्थितीत पुन्हा संघटना मजबूत करून निवडणुकीच्या राजकारणात विजय संपादन करणे हे भाजपपुढे आव्हान होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचे ताजे अपडेट इथं वाचा...
Maharashtra All Constituency Assembly Election results Updates
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.