Maharashtra Election : ऐन विधानसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का; लढण्याआधीच एक जागा गेल्यात जमा?

Maharashtra Election News : ऐन विधानसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणूक लढण्याआधीच एका जागा गेल्यात जमा झाली आहे.
 ऐन विधानसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का; लढण्याआधीच एक जागा गेल्यात जमा?
Uddhav ThackeraySaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : २०१४ ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी पक्षाला तिकीट परत केले आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या काळातच ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळाले आहे. तर ठाकरे गटाचे या ठिकाणी किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता तनवाणी यांनी माघार जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या अंतर्गत गटबाजीमुळे तनवाणी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 ऐन विधानसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का; लढण्याआधीच एक जागा गेल्यात जमा?
Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

२०१४ च्या निवडणुकीमध्ये किशनचंन तनवाणी आणि प्रदीप जयस्वाल ही दोघेही निवडणुकीमध्ये उतरले होते. त्याचवेळी एमआयएमने पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतं एकवटून इम्तियाज जलील यांना मतदान केले होते. त्याचबरोबर हिंदू मतांचे विभाजन होऊन एमआयएमची इम्तियाज निवडून आले होते.

तर मागच्या निवडणुकीत २०१९ मध्ये एकटे प्रदीप जयस्वाल हे निवडणुकीच्या मैदानात होते. तर किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली होती. त्यामुळे प्रदीप जयस्वाल ही निवडून आले होते. पण दोघांमध्ये 2024 मध्ये किशन तनवाणी निवडणूक लढवतील असे ठरलं होतं. मात्र ते आता ऐकत नसल्यामुळे निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. पण त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला गती येण्यापूर्वीच ठाकरे सेनेची एक जागा लढण्या अगोदरच हातून गेल्यात जमा आहे.

 ऐन विधानसभेत ठाकरे गटाला मोठा धक्का; लढण्याआधीच एक जागा गेल्यात जमा?
Amit Thackeray : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंनी केलं मोठं वक्तव्य, VIDEO

जळगावच्या चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचा उमेदवार बदलला आहे. राजू तडवी यांच्या ऐवजी प्रभाकर सोनवणे यांना संधी मिळाली आहे. प्रभाकर सोनवणे यांचा आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. त्यानंतर त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. याअगोदर चोपड्यासाठी राजू तडवी यांच्या नावाची घोषणा झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com