
नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजेंट गाव ठरले.
या गावात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा शुभारंभ केला.
महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील १० गावे अशा पद्धतीने ३५०० गावे स्मार्ट होणार आहेत.
राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करण्यात येणार आहेत. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास ३ हजार ५०० गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देशातील पहिले स्मार्ट गाव नागपूरमधील सातनवरी झाले आहे. सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करण्यात आलीय.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत 24 कंपन्यांच्या संघटनांसोबत राज्य शासन आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सातनवरी गाव देशातील पहिले ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ गाव बनले आहे. प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या सर्व आधुनिक सुविधा असलेल्या गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमाला महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सातनवरी गावाच्या सरपंच वैशाली चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.
सातनवरी गावात तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावांमध्ये आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा एकूण 18 सेवा कमी वेळात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींचा उपयोग करून माती परिक्षण, फवारणी, खते आदींचे योग्य नियोजन करीत आहेत.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यातून सातनवरी गाव समृद्ध गावाचे ‘रोल मॉडेल’ उभे राहिले आहे. सातनवरी या ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ गावाचा शुभारंभ हे क्रांतीकारक पाऊल आहे.
गावांना सक्षम करण्याच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून देशातील गावागावांमध्ये भारतनेट प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी राज्यात होऊन दुसऱ्या टप्प्याची सुरूवातही झालीय. आता याच प्रवासात भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत गावांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यातील पहिलं गाव सातनवरी ठरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.