samruddhi mahamarg accident
samruddhi mahamarg accidentsaam tv

Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावरील अपघातस्थळी महामृत्युंजय यंत्राची स्थापना, सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा केला जप

Samruddhi Mahamarg Accident : सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महारार्गावर अपघाताच्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे.

Mahamrityunjaya yantra installed at accident place on Samriddhi highway : समृद्धी महामार्गावर सातत्त्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. हा माहामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 950 हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत. परंतु सर्वाधिक अपघात हे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावर झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या महारार्गावर अपघाताच्या ठिकाणी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता.

samruddhi mahamarg accident
Sanjay Raut On Ajit Pawar: हातात तिजोरी आहे म्हणून निधीवाटप करायचा म्हणजे लुटमार; निधीवर्षावावरुन संजय राऊतांचं अजित पवारांवर टीकास्त्र

यानंतर या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जास्त अपघात टायर फुटल्याने होत असल्याने परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी आणि नागपूर अशा दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. (Latest Maharashtra News)

परंतु बुलढाणा परिसरातच अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे याठिकाणी शासनाचे उपाय तर आहेतच शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करून सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचाही जप करण्यात आलाय. (Tajya Marathi Batmya)

samruddhi mahamarg accident
Mexico Bar Set On Fire: दारुड्याची सटकली! बारमधून बाहेर काढल्यामुळे लावली आग, ११ जणांचा मृत्यू

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणित मार्गाच्या वतीने बस अपघातात मृत्यू झालेल्या २५ जणांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी आणि भविष्यात या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास दीडशे महिला आणि पुरुषांनी मिळून या महामृत्युंजय यंत्राची स्थापना केली. तसेच याठिकाणी सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जपही करण्यात आला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com