Mahadev Jankar News: बहिणीला जास्त त्रास झाला तर माहेरी घेऊन जाईल; पंकजा मुंडेंवरून जानकरांचा भाजपला इशारा

Mahadev Jankar On Pankaja Munde: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Mahadev Jankar News
Mahadev Jankar NewsSaam TV
Published On

सचिन बनसोडे

Maharashtra Political:

पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा नेहमीच ऐकू येतात. आतापर्यंत कार्यकर्त्यांसह काही नेत्यांनी पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याचं म्हटलं आहे. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये. (Latest Marathi News)

Mahadev Jankar News
Pankaja Munde - Udayanraje भेट : असं काय घडलं साता-यात पंकजा मुंडेंनी उदयनराजेंची कान पकडून मागितली माफी

भावा-बहिणीच्या नात्याची आठवण करून देत पंकजा मुंडेंना आपल्यासोबत घेऊन जाणार अशा आशयाचं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. "पंकज मुंडे माझी बहिण आहे. आज ती एका जबाबदार पक्षाचं काम करतेय. ज्यावेळी बहिणीला खुप त्रास होईल तेव्हा तीला माहेरच्या झोपडीत मी घेऊन येईल.", असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलंय.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची जन स्वराज यात्रा आजपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती मातेच्या मंदिरात दर्शनाने या यात्रेला सुरूवात झाली आहे.

महादेव जानकर जन स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध गावात जाऊन नागरीकांशी संवाद साधणार आहेत. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो. शेतकरी आणि सामान्यांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासाठी राज्यासह देशभर ही यात्रा सुरू असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय.

पुढे आरक्षणाच्या मुद्द्यावर महादेव जानकर म्हणाले की, "मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहीजे आणि धनगर समाजालाही आरक्षण हवं असेल तर समाजाचा डेटा तयार व्हायला हवा. समाजाचे तेव्हढे आमदार खासदार असतील तरच सरकार घाबरते असे जानकर म्हणालेत.

Mahadev Jankar News
Pankaja Munde In Kolhapur : देवी आई..., दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ नये : पंकजा मुंडे (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com