Video : विधानसभा निवडणुकीआधीच रण तापलं! मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत ठिणगी

Maharashtra Politics: लोकसभेतल्या यशामुळे नवीन उर्जा मिळालेल्या मविआला आत्तापासून सत्तेची स्वप्न पडू लागली आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदावरून मविआत ठिणगी पडली आहे.
लोकसभेची चूक विधानसभेत सुधारणार; महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे महत्वाचे ६ निकष
Maha Vikas AghadiSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीत महायुतीवर मात केल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय. विधानसभेसाठी मविआतील तीनही पक्ष सज्ज झालेत. मात्र मविआमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यावरून रस्सीखेच सुरू झालीय.

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं ठरेल, असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी ठाकरेंकडे बघून मतदान केल्याचा सांगत ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे संकेत त्यांनी दिलेत. तर या मुद्यावर बैठकीत चर्चा होईल, मात्र माध्यमांमध्ये चर्चा नको असा टोला जयंत पाटलांनी लगावलाय.

लोकसभेची चूक विधानसभेत सुधारणार; महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे महत्वाचे ६ निकष
VIDEO: मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात दगडफेक, खळबळजनक व्हिडिओ आला समोर

एकीकडे मुख्यमंत्रीपदावरुन राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं असताना खुद्द ठाकरेंनी मात्र या मुद्द्यावर थेट बोलणं टाळलंय. आधी महायुतीनं आपल्या अपयशाचा चेहरा जाहीर करावा त्यानंतर योग्यवेळी चेहरा आणू, असं सांगत ठाकरेंनी बगल दिलीय.

मविआचा मुख्यमंत्री कोण?

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री होते. 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 हा ठाकरेंचा कार्यकाळ होता. याच काळात कोरोनाचं संकट आल्यामुळे प्रशासनाचा कस लागला होता. कोरोना काळात देशभरातून उत्तम काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरेंचा समावेश होता.

लोकसभेची चूक विधानसभेत सुधारणार; महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे महत्वाचे ६ निकष
VIDEO : मोठी बातमी! अजित पवार गटाच्या 6 आमदारांनी घेतली जयंत पाटील यांची भेट; पुन्हा करणार घरवापसी?

ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असं सूत्र मविआत ठरल्याचीही चर्चा होती. मात्र लोकसभेतलं मविआचं यश उद्धव ठाकरेंमुळेच मिळाल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यामुळे ठाकरे गट मुख्मंत्रिपदाबाबत उद्धव ठाकरेंसाठी आतापासून आग्रही भूमिका घेऊ लागलाय. त्यामुळे विधानसभा निवडणूक ठाकरेंच्या चेह-यावर लढवणार की नाही याबाबत उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com