Maharashtra Politics: मविआच्या नेत्यांचे फोन टॅप? रश्मी शुक्लांना हटवा, काँग्रेसची मागणी; ठाकरे गट भाजपमध्येही जुंपली

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्यासाठी काँग्रेसने पुन्हा जोर लावलाय.. तर शुक्ला महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप केलाय..या आरोप प्रत्यारोपांच्या खडाजंगीवरचा हा स्पेशल रिपोर्ट....
मविआच्या नेत्यांचे फोन टॅप? रश्मी शुक्लांना हटवा, काँग्रेसची मागणी; ठाकरे गट भाजपमध्येही जुंपली
Rashmi Shukla, Sanjay Raut, Nana PatoleSaam Tv
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुन्हा एकदा कथित फोन टॅपिंग प्रकरणाने तोंड वर काढलंय. तर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केलीय. तर रश्मी शुक्ला या भाजपच्या विरोधकांना त्रास देण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय.

भाजपने रश्मी शुक्लांची पाठराखण करत राऊतांवर पलटवार केलाय. यावरच आपली प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, लोकशाही पद्धतीने वागत असाल तर घाबरता का?

मविआच्या नेत्यांचे फोन टॅप? रश्मी शुक्लांना हटवा, काँग्रेसची मागणी; ठाकरे गट भाजपमध्येही जुंपली
Maharashtra Politics: सरवणकर ठाम, महायुतीला घाम; भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा, माहीमचा तिढा वाढणार?

राज्याची निवडणूक जाहीर होण्यापुर्वीही काँग्रेसने रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्लांची नियुक्ती नियमाने झाल्याचं म्हटलं होतं. मात्र रश्मी शुक्लांवर सातत्याने करण्यात येणारं फोन टॅप प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊ...

फोन टॅपिंग प्रकरण काय?

  • 2019 मध्ये मविआच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप.

  • पटोले, कडू, खडसेंचा फोन टॅप केल्याचा आरोप.

  • नेत्यांचे फोन बनावट नावाने टॅप केल्याचा दावा.

  • फोन टॅपिंग प्रकरणी उच्च न्यायालयाकडून रश्मी शुक्लांना दिलासा.

मविआच्या नेत्यांचे फोन टॅप? रश्मी शुक्लांना हटवा, काँग्रेसची मागणी; ठाकरे गट भाजपमध्येही जुंपली
Maharashtra Politics : बाळासाहेब असते तर...; शायना एनसींबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे आक्रमक

रश्मी शुक्लांच्या नियुक्तीमागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे. त्यामुळे शुक्लांच्या नेतृत्वाखाली राज्यात निष्पक्ष निवडणूक होण्याची शक्यता धुसर असल्याने महाविकास आघाडीने पुन्हा आयोगाला पत्र लिहीलंय. मात्र निवडणूक आयोग झारखंड प्रमाणे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवण्याचा निर्णय घेणार का? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com