Ramtek Assembly Constituency : रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली, पाहा VIDEO

Maha vikas aghadi News : रामटेकवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. रामटेकमध्ये ठाकरेंकडून उमेदवार जाहीर केला. त्यानंतर काँग्रेसकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली
Ramtek Assembly Constituency : Saaam tv
Published On

मुंबई : रामटेक...भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव यांनी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्या रामटेक मतदारसंघावरुन आता रामायण रंगणार आहे. त्याला कारण काँग्रेसचं धोरण...रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं 2024 च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. लोकसभेप्रमाणेच विधानसभाही सर करण्यासाठी पक्ष कामाला लागला. लोकसभेच्या युद्धात काँग्रेस जिंकली, पण विधानसभेच्या जागावाटपाच्या शिवसेनेसोबतच्या तहात हरली. काँग्रेसला जिंकून येण्याची खात्री होती. तरीही काँग्रेसला ही जागा आपल्या पदरी पाडून घेता आली नाही. त्यामुळे रामटेक विधानसभेच्या जागेवरून मविआत 'हाय व्होल्टेज ड्रामा' सुरु झालायं.

काँग्रेसवर टीकेझी झोड उठल्यानंतर आता पडद्याआड घडामोडींना वेग आलायं. ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून हालचालींना वेग येतोय. मुळातच विदर्भात मोजक्यात क्षेत्रात प्रभाव राखून असलेल्या शिवसेनेत फूट पडल्यावर सेनेची ताकद निम्म्यावर आली. शिवसेनेकडे रामटेक विधानसभेसाठी प्रबळ असा उमेदवार नव्हता. तरीही त्यांनी आग्रही भूमिका घेत ही जागा घेतली.

रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली
Ramtek Loksabha Result : तेलही गेलं आणि तूपही गेलं; खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या शिंदे गटातील उमेदवाराचा पराभव

विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली. ते निवडणुकीच्या राजकारणात नवखे आहेत. त्या तुलनेत काँग्रेस पक्षाकडे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासारखा तगडा उमेदवार होता. असं असलं तरी काँग्रेसने रामटेक संदर्भातली आपली भूमिका मवाळ केलेली नाही, काँग्रेसने रामटेक संदर्भातले प्रयत्न अजूनही सोडलेले नाही.

रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली
First Muslim Pilot Woman : टीव्ही मेकॅनिकच्या मुलीची उत्तुंग भरारी...देशातील पहिली मुस्लीम महिला पायलट ठरणार

राजेंद्र मुळक कोण?

- राजेंद्र मुळक राज्याचे माजी ऊर्जा, वित्त राज्यमंत्री

- पृथ्वीराज चव्हाणांचे अत्यंत विश्वासू

- रामटेक मतदारसंघात अखेरच्या क्षणी चमत्कार होण्याची काँग्रेसला अपेक्षा

- रामटेकवरुन मविआत हायव्होल्टेज ड्रामा रंगण्याची शक्यता

त्यामुळे रामटेकच्या जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात जुंपणार यात शंका नाही. त्यातून कोण बाजी मारणार हेच पाहायचं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com