मावळ: गेल्या काही दिवसांपासून लोणावळा शहरात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. थंड हवेचे ठिकाण असलेले लोणावळा उन्हाने तापू लागले आहे. त्यामुळे लोणावळा शहरात आज एप्रिल फूल नव्हे तर एप्रिल कुल करुया ही संकल्पना राबविण्यात आली.
शेकडो झाडे नागरिकांना वाटून ती लोणावळामध्ये ठीकठिकाणी लावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. लोणावळा नगरपारिषद त्याचप्रमाने भाजपाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. लोनावळा बाजारपेठ येथे येणाऱ्या नागरिकांना झाडे भेट देण्यात आली. त्याचप्रमाणे झाडे लावून ती वाढविण्यासाठी देखील नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले.
लोणावळा तापलं
लोणावळा शहराचा पारा (temperature) दररोज दुपारी 35 अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याने थंड हवेचे ठिकाण देखील आता तापू लागले आहे. शहरात सकाळी अकरापासूनच प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे लोणावळा (lonavala) पालिकेने (muncipal council) नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून येथील वातावरणात मोठा बदल झाला आहे. सकाळ संध्याकाळ वातावरण थंड तर दुपारी प्रचंड उष्णता जाणवू लागली आहे. पंख्याशिवाय घरात बसणे नागरिकांना कठीण झाले आहे. केवळ लोणावळा शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यात गरमी वाढली आहे. मावळ (maval) तालुक्यातील दुसरे शहर असलेल्या तळेगाव शहराचे तापमान 40 अंशापर्यंत गेले आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.