मावळ : लोणावळा शहराचा पारा (temperature) दररोज दुपारी पस्तीस डिग्री पर्यत जात असल्याने थंड हवेचे ठिकाण देखील आता तापू लागले आहे. शहरात सकाळी अकरापासूनच प्रचंड गरमी जाणवू लागली आहे. त्यामुळे लाेणावळा (lonavala) पालिकेने (muncipal council) नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (lonavala latest marathi news)
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून येथील वातावरणात मोठा बदल झाला आहे. सकाळ संध्याकाळ वातावरण थंड तर दुपारी प्रचंड गरम होऊ लागले आहे. पंख्याशिवाय घरात बसणे नागरिकांना कठीण झाले आहे. केवळ लोणावळा शहरच नव्हे तर संपुर्ण राज्यात गरमी वाढली आहे. मावळ (maval) तालुक्यातील दुसरे शहर असलेल्या तळेगाव शहराचे तापमान चाळीस अंशापर्यत गेले आहे.
कामशेत, वडगाव परिसरात देखील तीच स्थिती असल्याने नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. मागील दहा दिवसांपुर्वी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या झाडांचा मोहर गळून पडला आहे. आता मात्र रखरखत्या ऊन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
अशी घ्या काळजी
उन्हात फिरणे टाळा.
दुपारच्या वेळेत झाडांचा आसरा घ्या.
डोक्यावर टोपी घाला.
डोळ्यांची आग रोखण्यासाठी गाॅगल वापरा.
Edited By : Siddhath Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.