Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना पुन्हा एकनाथ शिंदेंचा दे धक्का! बड्या नेत्यांचा शिवसेना प्रवेश

Thackeray Group Office Bearers Join Shinde Group : लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षांतर्गत असलेल्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षात आज प्रवेश केला आहे.
Uddhav Thackeray group office bearers join Eknath Shinde group
Uddhav Thackeray group office bearers join Eknath Shinde groupSaam Tv News
Published On

दिलीप कांबळे, साम टिव्ही

पुणे : लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षांतर्गत असलेल्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून अनेकांनी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षात आज प्रवेश केला आहे. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित हा शिवसैनिकांचा प्रवेश करून घेण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणावळा शहरप्रमुख प्रकाश पाठारे, दुसरे उपशहर प्रमुख विजय आखाडे, माजी नगरसेवक आणि महिला आघाडी अध्यक्ष कल्पना आखाडे, माजी नगरसेविका सिंधुताई परदेशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुण्यात मोठा झटका मिळाला होता. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. पक्षातील वरिष्ठ लक्ष देत नसल्याच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गटामध्ये हे मोठं खिंडार पडलं. पुणे शहरातील ३२ महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून या महिला पदाधिकारी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं सांगितले जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि अदिज पवार गटात प्रवेश केला होता.

Uddhav Thackeray group office bearers join Eknath Shinde group
Yavatmal News : माझी लेक कलेक्टर झाली! आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हार्ट ॲटॅक; आनंदी घरावर दु:खाचा डोंगर

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पाच माजी नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडली. त्यानंतरच्या काळात अनेक पदाधिकारी ठाकरे सेनेचा राजीनामा देत इतर पक्षांमध्ये गेले. त्यापाठोपाठ आज ठाकरे गटातील ३२ महिला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता माजी नगरसेवक शहरप्रमुखांसह अने पदाधिकारी तथा शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

Uddhav Thackeray group office bearers join Eknath Shinde group
Mhada Lottery: दिवाळीपूर्वी हक्काचं घर होणार! म्हाडा वर्षभरात राज्यात १९,४९७ घरे बांधणार; मुंबईकरांना विशेष फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com