Chitra Wagh : 'बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार...'; चित्रा वाघ यांचा दावा

Chitra Wagh On Sunetra Pawar : बारामतीमध्ये महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
chitra wagh
chitra waghsaam tv
Published On

दिलीप कांबळे

Baramati Constituency:

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आलाय. बारामतीमध्ये महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर झालेलं नाही. मात्र येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.

chitra wagh
Baramati News: 'बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल', अजित पवार यांचं नावं घेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

अशात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत स्पष्ट सूतोवाच केलं आहे. बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार असा महायुतीला विश्वास आहे, असं म्हणत बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार लढणार असल्याचं त्यांनी चित्रा वाघ यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी संभाव्य लढत होईल, अशी चर्चा सुरू असताना चित्रा वाघ यांनी हे विधान केलं. त्यामुळं ननंद-भावजय लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब झालाय, असंच म्हणावं लागेल. चित्रा वाघ लोणावळ्यात "रन फॉर नेशन, रन फॉर मोदी" मॅरेथॉनला चित्रा वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला.

लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपने महाराष्ट्रातील एका ही नावाचा समावेश नसल्यानं चहुबाजूंनी टीका होत आहे. याला ही वाघ यांनी उत्तर दिलं. मावळ लोकसभा निवडणुकीत इथल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना वरिष्ठान पर्यंत पोहोचवले आहे. शेवटी वरिष्ठच निर्णय घेणार आहेत. अजूनही राज्याची यादी जाहीर झालेली नाही. लवकरच ती जाहीर होणार आहे, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंना उमेदवारी?

महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे लढणार असल्याचं त्यांनी स्वत: काही दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. आपल्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर सुप्रिया सुळे यांनी याबाबतचं स्टेटस ठेवत माहिती दिली होती.

chitra wagh
Lok Sabha Election: भाजपच्या आणखी एका नेत्याचा निवडणूक लढवण्यास नकार, गुजरातच्या माजी उपमुख्यमंत्र्यांनी का घेतली माघार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com