Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू; किती आणि कोणत्या मतदारसंघात?

lok Sabha Election 2024 news : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांचे उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यातील ९४ जागांसाठी मतदापर होणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam tv

lok Sabha Election News :

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांचे उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यातील ९४ जागांसाठी मतदापर होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ मतदारसंघाचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजे २६ जागांसाठी याच तिसऱ्या टप्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षाची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तिसऱ्या टप्प्यात अर्ज भरताना राजकीय पक्षाचे उमेदवार मोठं शक्तीप्रदर्शन दाखवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

Lok Sabha Election
Chhatrapati Shahu Maharaj News: आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत; खासदार संजय मंडलिक यांचे वादग्रस्त विधान

देशातील कोणत्या राज्यात आणि किती जागांसाठी मतदान -

महाराष्ट्र - ११

गुजरात - २६

कर्नाटक - १४

उत्तर प्रदेश - १०

मध्य प्रदेश - ८

छत्तीसगड - ७

बिहार - ५

आसाम - ४

पश्चिम बंगाल - ४

गोवा - २

दादरा नगर हवेली - १

दमन आणि दीव - १

जम्मू काश्मीर - १

Lok Sabha Election
Madha Loksabha: अखेर डाव टाकलाच! धैर्यशील मोहित पाटील शरद पवारांच्या भेटीला; आजचं तुतारी हाती घेणार?

महाराष्ट्रातील या ११ मतदार संघासाठी होणार तिसऱ्या टप्प्यात निवडणूक -

बारामती

रायगड

धाराशिव

लातूर

सोलापूर

माढा

सांगली

सातारा

रत्नागिरी—सिंधुदूर्ग

कोल्हापूर

हातकणंगले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com