Sharad Pawar Collar Video : उदयनराजेंवर प्रश्न विचारताच शरद पवारांनी उडवली कॉलर; नेमकं काय घडलं?

Satara Constituency : आव्हान देताना उदयनराजे अनेकवेळा कॉलर उडवतात. त्यांच्या या स्टाइलची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी हुबेहुब उदयनराजेंची नक्कल करत कॉलर उडवली आहे.
Sharad Pawar Collar Video
Sharad Pawar Collar VideoSaam TV

Lok Sabha Election :

प्रत्येक व्यक्तीची आपली एक वेगळी स्टाइल असते. राजकारणात अनेक नेत्यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या वेगळ्या शैली म्हणजेच स्टाइल आहेत. त्यातीलच एक म्हणजे खासदार उदयनराजे भोसले. एखाद्याला आव्हान देताना उदयनराजे अनेकवेळा कॉलर उडवतात. त्यांच्या या स्टाइलची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. कारण शरद पवार यांनी हुबेहुब उदयनराजेंची नक्कल करत कॉलर उडवली आहे.

Sharad Pawar Collar Video
Dharashiv lok sabha : धाराशिव लोकसभेच्या जागेसाठी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये खलबते; बैठकीत नेमकं काय घडलं?

शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांना उदयनराजेंविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या अनोख्या स्टाइलने कॉलर उडवत शरद पवारांनी उत्तर दिलं. कॉलर उडवल्याचा त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शरद पवारांनी अशा अंदाजात जेव्हा उत्तर दिलं तेव्हा उपस्थितांमध्ये देखील एकच हशा पिकला होता. आपन केलेल्या नकलेवर शरद पवार स्वत: देखील खळखळून हसले.

उदयनराजे यांनी तुम्हाला साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का? त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? असा सवालही शरद पवार यांना केला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. आमचे काहीही बोलणे झालेले नाही. भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणून त्यांनी मोठी मिरवणूक काढली होती, असं मी ऐकलं. ते कशाला आमच्याकडे येतील, असं म्हणत शरद पवारांनी स्वॅगमध्ये कॉलर उडवली आहे.

काल सातारा येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला शरद पवार देखील उपस्थित होते. येथे त्यांनी कार्यकर्त्यांकडून उमेदवारीबाबत मते जाणून घेतली.

सातारा मतदार संघात महायुतीकडून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अशात श्रीनिवास पाटलांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतल्याने मविआसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. " यासह अन्य जागांसाठी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी तसेच अन्य प्रादेशिक पक्ष यांच्यासमवेत बसून उमेदवारीबाबत निर्णय घेणार.", असा विश्वास देखील यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला.

उदयनराजेंची प्रतिक्रिया

शरद पवारांनी माझी स्टाइल केली तरी मी काय करणार. ते पवार साहेब आहेत. माझी स्टाइल केली तर करूद्या, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसलेंनी दिली आहे.

Sharad Pawar Collar Video
Viral Video: भररस्त्यात बाईकवर स्टंटबाजी करणं चांगलंच भोवलं! पाठीमागून पोलीस आले अन् घडवली अद्दल, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com