Marathi News Live Update : यवतमाळच्या उमरखेडमध्ये मान्सूनपूर्ण पावसाची हजेरी

Maharashtra Breaking News Live Updates : देश विदेश तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक महत्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा फक्त एका क्लिकवर
Live Marathi News By Saam TV
Saam Tv Breaking News Live Updates In Marathi MaharashtraSAAM TV

यवतमाळच्या उमरखेडमध्ये मान्सूनपूर्ण पावसाची हजेरी

उमरखेडमध्ये जोरदार पाऊस, यवतमाळच्या उमरखेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

उकाड्यापासून उमरखेड वाशीयांना दिलासा,वादळ वाऱ्यांसह जोरदार अवकाळी पाऊस,दहा मिनिट बरसला अवकाळी पाऊस

वाढत्या तापमाणामुळे हैराण झालेल्या उमरखेड वाशीयाना अवकाळी पावसाचा दिलासा.

सोलापुरातील सरस्वती चौकात पाण्याची पाईप लाईन फुटली,हजारो लिटर पाणी गेले वाया

सोलापुरातील सरस्वती चौकात पाण्याची पाईप लाईन फुटली,हजारो लिटर पाणी गेले वाया

पाईप लाईन फुटल्याने 10 ते 15 फूट उडाला पाण्याचा फवारा

ऐन चौकात पाईप लाईन फुटल्यामुळे सर्व रस्ता जलमय झाल्याचं दिसून आलं चित्र

सोलापुरात आधीच 6 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणीबानीचा करावा लागतोय सामना

उजनी धारणातील पाणी -60% गेल्यामुळे सोलापूरला दुष्काळाचा करावा लागतोय सामना, अशा स्थितीत पाणी वाया चालल्यामुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप

पावसामुळे बारामतीत पाणीच पाणी,  पाणी काढण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची कसरत

बारामतीत अवघी काही मिनिटं पाऊस पडला. परंतु बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरती अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. या रस्त्याच्या सुशोभिकरण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते आहे. बारामती नगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरचे पाणी घालवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यपालांकडे सुपूर्त केला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यपालांकडे सुपूर्त केला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल केटी पारनाईक यांची राजभवन येथे भेट घेत दिला राजीनामा

राज्यपालांनी पेमा खांडू यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकारचा शपथ होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची केली विनंती

लवकरच भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे

विधानसभेत भाजपने 60 जागांपैकी 46 जागा जिंकल्या आहेत

बारामती शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

बारामती शहरात आज संध्याकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली गेली दोन दिवसात बारामती परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता त्यातच आज सहा वाजता अचानक पावसाने दमदार हजेरी लावली आहे

शिवाजी आढळरावपाटील चेअरमन असलेल्या पुणे म्हाडा कार्यालयात ACB ची धाड

शिवाजी आढळरावपाटील चेअरमन असलेल्या पुणे म्हाडा कार्यालयात ACB ची धाड..

आढळरावपाटील चेअरमन झाल्यानंतर दोन महिन्यात Acb ,ची कारवाई

पुणे म्हाडा मधील प्रोजेक्ट मँनेजर याने तक्रारदार यांच्याकडे २ लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

लाचेच्या मागणीची पाच दिवस पडताळणी केल्यानंतर पुणे म्हाडाचे प्रोजेक्ट मँनेजरवर गुन्हा दाखल

अभिजीत जिचकार असं लाचेची मागणी करुन स्विकारणा-या म्हाडा प्रोजेक्ट मँनेजर चे नाव

अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार गटाच्या ३ उमेदवारांचा अगदी थोड्या मतांनी पराभव

अजित पवार यांच्या पक्षाचे थोड्या मतांनी पराभूत झालेले उमेदवार

नामसांग विधानसभा मतदार संघ -

नगोंगलीन बोई - ५६ मतांनी पराभूत

खोणसा पश्चिम विधानसभा मतदार संघ -

यांग सेन माटे - ८०४ मतांनी पराभूत

पक्के केसांग विधानसभा मतदार संघ -

टेकी हेमू - ८१३ मतांनी पराभूत

वरळी सिलिंकहून कोळीवाडा , प्रभादेवीकडे जाणारा मार्ग आज २ जून पासून ३१ नोव्हेंबरपर्यंत बंद

मुंबईच्या बांद्रा वरळी सिलिंकहून वरळी कोळीवाडा , प्रभादेवीकडे जाणारा मार्ग आज २ जून पासून ३१ नोव्हेंबरपर्यंत बंद असेल.

सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद असेल ...

भारतरत्न खान अब्दुल गफार खान मार्गावरून जाण्याऐवजी वाहन चालकांनी एनी बेझंट रोडचा पर्याय निवडावा अशा सुचनांचे फलक ठिकठिकाणी ट्रॅफिक विभागाकडून लावण्यात आले आहेत...

कोस्टल रोडचं काम जलद गतीने होत असताना या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे ही टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

 ड्रेनेज लाईनमध्ये पडून तरुणाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजी नगर शहरातील मुकुंदवाडी भागातल्या राज नगर परिसरात असणाऱ्या ड्रेनेज लाईनमध्ये पडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे जवान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सिक्कीम विधानसभेत SKM चा दणदणीत विजय; ३१ जागा जिंकल्या

सिक्कीम विधानसभेत सत्ताधारी SKM न सत्ता राखली. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचा (SKM) विधानसभेत एकतर्फी विजय झाला आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजपचा डंका; ४६ आमदारांचा विजय

अरुणाचलप्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ४६ आमदार जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली आहे.

यंदा महाराष्ट्रात सरासरी ९९% पाऊस होण्याची शक्यता, हवामान तज्ञांचा अंदाज  

राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उन्हाचा चटका पाहायला मिळत आहे. केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झालं असून महाराष्ट्रात पावसाचे आगमन देखील लवकर होणार आहे.यंदाच्या या मान्सून मध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अरुणाचल प्रदेश विधानसभेत एंट्री, ३ आमदारांचा विजय

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अरुणाचल प्रदेश विधानसभेत एंट्री झाली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार यांच्या पक्षाच्या ३ आमदारांचा विजय झाला आहे, तर २ उमेदवारांचा थोड्या मतांनी पराभव झाला आहे.

निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते जयराम रमेश यांना विचारणा 

काल जयराम रमेश यांनी दावा केला होता की, निवडणूक हरण्याच्या भीतीने गृहमंत्री अमित शाह यांनी १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले आहेत. यावरून निवडणूक आयोगाची काँग्रेस नेते जयराम रमेश यांना विचारणा केली आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपशील देण्याच्या सूचना केल्या आहेत.

सत्ताधाऱ्यांना लोकांची काळजी नाही, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची टीका 

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर मेळघाटमध्ये सध्या पाणीटंचाई दौऱ्यावर आहेत. सरकार मेळघाटमध्ये वेड्या सारखं काम करत आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करणार; एक्झिट पोलनंतर सुभाष भामरेंचा विश्वास

एक्झिट पोलच्या निकालांनंतर नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा सुभाष भामरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून या निकालाचा अंदाज बांधण्यात आला आहे.

Pune Accident News : मोठी बातमी! शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीने आरोपीची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी ही कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने अग्रवाल दाम्पत्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले? : ओमराजे निंबाळकर

धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावरील आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल प्रकरण

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी 43 दिवस का लागले?

सत्ताधारी पक्षातील उमेदवार आहेत म्हणून कारवाई करायला दिरंगाई केली जात असेल तर आचारसंहिता ठेवली कशाला?

एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून याचा प्रशासनाला व जिथे मला हायर एॅथोरेटी कडे विचारणे शक्य आहे तिथे मी विचारणार : खा. ओमराजे निंबाळकर

प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली काम करत हे दुर्दैवी आहे, प्रशासनाने पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे

अर्चना पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विनापरवाना घेतली होती सभा

गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाने 43 दिवस लावल्याने खा.ओमराजे निंबाळकर यांचा प्रशासनाला इशारा

Pune Crime News : हडपसर येथे कोयत्याने तोडफोड करणाऱ्यांना अटक

हडपसर परिसरात दुकानाची आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक करून तीन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. विजय ऊर्फ धनप्पा बसवराज कुरले (वय २२, रा. संजुदा कॉम्प्लेक्स, पापडेवस्ती, फुरसुंगी) आणि माणिक नागेश सगर ऊर्फ वाढिव बबल्या (वय १९, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश दिगंबर बुधवंत (वय २६, रा. शिवसेना भवनजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली होती.

वसुलीसाठी येणाऱ्या जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढा, पडळकरांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

दुष्काळी परिस्थितीत वसुलीसाठी येणाऱ्या सांगली जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना झोडपून काढा, असा अजब सल्ला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिला. ते जत येथे दुष्काळी पाहणी दौऱ्यावेळी बोलत होते.

तसेच सक्तीची वसुली आणि जिल्हा बँकेतील घोटाळ्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमण्याच्या मागणीसाठी जिल्हा बँकेवर शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात येणार अशी, घोषणा देखील आमदार पडळकर यांनी केली आहे.

Jalna News : जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज.

जालना येथील एमआयडीसीतील सरस्वती ऑटो कम्पोनन्टस प्रा.लि. येथे होणार मतमोजणी.

प्रत्यक्ष मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.

सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी होणार.

सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 अशा एकूण 84 टेबलवर मतमोजणी होणार.

तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण 10 टेबल होणार आहे.

84 टेबलवर 24 आणि 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील हर्सुल तलावात बुडून १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलावात बुडून एका १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मारुती पंडित कराळे, असं मृत तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जटवाडा रोडवरील होनाजी नगर येथील मारुती आणि त्याचे मित्र पोहण्यासाठी हर्सुल तलाव येथे गेले होती. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याची खोली लक्षात न आल्यामुळे मारुतीचा तलावात बुडून मृत्यू झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला असून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

Shrirampur News : १२ हजारांची लाच घेतांना पोलीस हेडकॉन्स्टेबल रंगेहात पकडला

२ हजारांची लाच घेतांना पोलीस हेडकॉन्स्टेबल रंगेहात पकडला...

रघुनाथ खेडकर लाचलुचपतच्या जाळ्यात...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...

श्रीरामपूर तहसील कार्यालयातून चोरीस गेलेल्या टिप्पर प्रकरणी मागीतली होती लाच...

अवैध मुरूम वाहतूक कारवाईत तहसीलने पकडला होता टिप्पर...

श्रीरामपूर तहसीलच्या आवारातून चोरी झाला होता टिप्पर...

दाखल गुन्ह्यात नाव येऊ न देण्याकरिता रघुनाथ खेडकर याने मागितली होती २० हजारांची लाच...

खेडकर यांच्या सांगण्यावरून चहावाल्याने स्वीकारली होती लाचेची रक्कम...

खेडकर आणि खाजगी इसम श्रीवास्तव यांचे विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....

Baramati News : बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

बारामती : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादांनी बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सहयोग निवासस्थानी आयोजित जनता दरबाराला हजेरी लावली. अजितदादांच्या भेटीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तत्काळ तोडगा काढला.

निकालाची धामधुम! मतमोजणीसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज

Buldhana News: बुलढाणा लोकसभा मतदार संघातील मत मोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी एकावेळी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकावेळी 84 टेबलवर मतमोजणी होईल.

PM मोदींच्या दिवसभरात ७ बैठका; चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटेचा आढावा घेणार

New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज विविध सात बैठका पार पडणार आहेत. ईशान्येकडील राज्यातील चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा पहिल्या बैठकीत घेणार आहेत. तसेच देशभरात उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत. पुढच्या आठवड्यातील जागतिक पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या तयारीचा देखील पंतप्रधान आढावा घेणार आहेत.

Marathi News Live Update : राज्यात मतमोजणीच्या दिवशी तुफान पाऊस कोसळणार, IMD अंदाज

राज्यात मतमोजणीच्या दिवशी वरुणराजा बरसण्याची शक्यता आहे. पूर्व मोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात सोमवार नंतर ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेष म्हणजे तीन दिवस आधीच ४ जून ला नैऋत्य मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत

अरुणाचल प्रदेश विधानसभेची मतमोजणी सुरू, राष्ट्रवादी काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर

अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३ जागांवर आघाडीवर आहे. सध्या भारतीय जनता पक्ष मतमोजणीत आघाडीवर असून त्यांनी आधीच १० जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरुणाचल प्रदेश विधानसभेत १५ जागा लढवत आहे

Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरणात केवळ ५ टक्केच उपयुक्त जलसाठा, मराठवाड्याची चिंता वाढली

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ 5 टक्के उपयुक्त जलसाठा हा शिल्लक राहिला आहे. गेल्या पाच वर्षात मे महिन्याच्या अखेरीस असलेला हा सर्वात कमी जलसाठा आहे. छत्रपती संभाजी नगर शहरासह जवळपास 400 गावांना नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो.

यातून सुमारे 40 लाख नागरिकांची तहान भागविली जाते. मात्र, गेल्या वर्षी कमी पाऊस पडला. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याचे रोटेशन आणि पाणीपुरवठा योजना साठी करण्यात येणारा उपसा यामुळे धरणातील पाणीच पातळी कमी कमी होत गेली.

Nashik Breaking News : नाशिक-गुजरात महामार्गावरील वाहतूक ठप्प, पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

नाशिक -

- नाशिक गुजरात वाहतूक ठप्प, पहाटेपासून वाहतूक ठप्प

- नाशिकहून पेठ मार्गे गुजरातकडे जाणारी आणि येणारी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

- महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटरपर्यंत रांगा

- पेठ रोडच्या काँक्रीटीकरणाचं काम सुरू असल्याने पहाटेपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

- मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं महामार्गावरील प्रवाशांचे हाल

Pune Lok Sabha News : पुण्यात झळकले मुरलीधर मोहोळ यांचे विजयाचे बॅनर्स 

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे विजयाचे प्लेक्स लागले आहेत. कोथरूड भागात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. लोकसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

Vasant More News : एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. "सध्याच्या सर्वच चॅनल वरील निवडणुकांच्या एक्झिट पोल मुळे पुण्याची पोर्शे एक्झिट होवू नये म्हणजे कमावले" असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Baramati Lok Sabha News : निकालापूर्वीच इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स

लोकसभा निवडणुकीच्या निकाला अगोदरचं पुण्याच्या इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागलेत. बारामती लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा या बॅनरवर उल्लेख आहे. इंदापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा विजयाचा बॅनर लावलाय.

शनिवारी इंदापुरात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून ही बॅनर बाजी करण्यातआली आहे. एकूणच इंदापूरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वाॅर रंगल्याचं पहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com