Maharashtra Elections : एकनाथ शिंदे महायुतीचा वाघ, म्हणूनच लांडगे,कोल्हे,मांजरी..; शिवसेना आमदाराचा विरोधकांवर हल्लाबोल

Shiv Sena MLA attacks opposition over voter list issue : धुळ्यात बोलताना शिवसेना आमदार दादा भुसे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे हे महायुतीचे वाघ असल्यानेच विरोधक खोटा नॅरेटिव्ह पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मतदार यादी वादावरून त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
eknath shinde
eknath shindex
Published On

भूषण अहिरे, धुळे प्रतिनिधी, साम टीव्ही

Dada Bhuse calls Eknath Shinde Mahayuti tiger : मतदार यादीवरून राज्यात आक्रमक झालेल्या विरोधकांवर शिवसेना आमदार दादा भुसे यांनी हल्लाबोल केला आहे. आपला पराभव दिसत असल्यामुळे विरोधकांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जात असल्याचा आरोप भुसेंनी केला. ते धुळ्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले एकनाथ शिंदे महायुतीचा वाघ आहे. त्यामुळे विरोधक त्यांच्याविरोधात कटकारस्थान करत आहेत. दादा भुसे यांनी मतचोरीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर यावर टीकेचा बाण सोडला.

मतदार यादीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांचा मंत्री दादाभुसे यांनी धुळ्याच्या पिंपळनेर येथे समाचार घेतला. ते विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्या होत्या, त्यावेळी त्यांना यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसला तर त्या मतदार याद्यामध्ये यांना दोष दिसत आहे.

eknath shinde
Kartiki Ekadashi : एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रखुमाईची महापूजा संपन्न, नांदेडच्या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान

विधानसभेप्रमाणे आता देखील विरोधकांना आपला पराभव दिसत आहे. त्यामुळेच निगेटिव्ह संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. असी टीका दादा भुसे यांनी विरोधी पक्षावर केला. दरम्यान, राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे. त्याआधी विरोधकांकडून मतचोरीचा आरोप करण्यात येत आहे. शनिवारी मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा काढत आयोगावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांनी आयोगावर टीका केली. आयोगाविरोधात काढलेल्या या मोर्चावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधाकांवर हल्लाबोल केला.

eknath shinde
Local Body Election : बुधवारपासून राज्यात आचारसंहिता, महायुतीच्या मंत्र्याने निवडणुकीचं वेळापत्रकच सांगितलं

आगामी निवडणुकांमध्ये महायुती विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांचा देखील मंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. ते म्हणाले, जेव्हा नदीच्या एका बाजूला लांडगे, कोल्हे, मांजरी असे षडयंत्र रचणारे एकत्र येऊन उभे राहतात तेव्हा समजदार माणसाला माहीत असते की नदीच्या दुसऱ्या बाजूला नक्कीच वाघ किंवा सिंह उभा असतो. एकनाथ शिंदे हे महायुतीचा वाघ आहेत. वाघ हा वाघ असतो आणि म्हणूनच विरोधक खोटे नाटे अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात, असे म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांचा मंत्री दादाभुसे यांनी समाचार घेतला आहे.

eknath shinde
एकनाथ शिंदेंचा ZP मध्ये पवारांना धक्का, २ दिग्गजांसह सरपंचाने साथ सोडली, शिवसेनेत केला प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com