Lightning Strike: टेंभी शिवारात हृदयद्रावक घटना; विजेच्या कडकडाटात शेतमजुरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना, महागाव तालुक्यातील टेंभी शेतशिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
 unseasonal rain
unseasonal rainsaam tv
Published On

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ: राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा वाढला असून यामध्ये जळजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी देखील संकटात सापडला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकरी हा हवालदिल झाला असून दुसरीकडे वीज कोसळून अनेक शेतकरी महिलांचा मृत्यू झाला आहे.

 unseasonal rain
Maharashtra unseasonal rain : राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; कुठे-कुठे पाऊस कोसळला? वाचा एका क्लिकवर

वीजांच्या कडकडासह मोठ्या प्रमाणात मेघगर्जना ही राज्यात सुरू आहे. अशातच रोजच वीज कोसळून अनेकजणांचा मृत्यू होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक घरा बाहेर देखील पडण्यास घाबरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असताना, महागाव तालुक्यातील टेंभी शेतशिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. शेतात मजुरीचे काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

 unseasonal rain
Cooperative Housing Society: गृहनिर्माण सोसायटींसाठी खुशखबर; बँक देणार कर्ज, काय आहे स्वयं पुनर्विकास कर्ज योजना?

विमलबाई किसन भिसे (वय अंदाजे ४५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या रोजंदारीवर मजुरी करण्यासाठी शेतात गेल्या होत्या. मात्र, आकाशात अचानक गडगडाटासह वीज चमकू लागली आणि काही क्षणातच वीज त्यांच्या अंगावर कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 unseasonal rain
India - Pakistan: सर्वसामान्यांना मोठा झटका; सुकामेव्याचे दर वाढणार, कारण काय?

मे महिन्याच्या अखेरीस पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतात पीक लावले जाते. यासाठीच ही महिला ही शेतात गेली होती, आणि अचानक वीज चमकायला लागल्या आणि या महिलेवर वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेला तिच्या पतीसह दोन मुलांचा परिवार होता. घटना समजताच परिवारातील सदस्य हे धायमोकलुन रडायला लागले

 unseasonal rain
Maharashtra Politics: महायुतीत वार-पलटवार सुरु; सुनील तटकरेंच्या टीकेला भरत गोगावलेंकडून जोरदार प्रत्युत्तर

ही घटना घडली तेव्हा इतर काही महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्यांना ही दुर्घटना पाहून जबर धक्का बसला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. गत चार-पाच दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागांत विजांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com