
बदलापूर - जवळच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिबट्याची (Leopard) दहशत पाहायला मिळते आहे. या बिबट्यानं कोंबड्या फस्त करायला सुरुवात केल्यानं शेतकरी आणि पोल्ट्री फार्मचालक धास्तावले आहेत.
बदलापूर आणि वांगणी दरम्यान असलेल्या कासगावमध्ये मंगळवारी पहाटे बिबट्याने कैलास टेम्बे यांच्या घरासमोर असलेला पिंजरा तोडून त्यातल्या ३ कोंबड्या फस्त केल्या. या पिंजऱ्याच्या बाजूलाच टेम्बे यांच्या ४० बकऱ्याही बांधलेल्या होत्या. सुदैवाने या बकऱ्या बचावल्या आहेत. यावेळी बिबट्याच्या पाऊलखुणाही उमटल्या आहेत. त्याआधी आठवड्याभरापूर्वी गोरेगावमध्येही बिबट्याने चार कोंबड्या फस्त केल्या होत्या. (Leopard In Badlapur)
तर १५ दिवसांपूर्वी कासगाव वाडी इथं जंगलात चरण्यासाठी गेलेल्या रघुनाथ शिद यांच्या दोन बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. अशाप्रकारे बिबट्या मानवी वस्तीत येऊन कोंबड्या, बकऱ्या फस्त करू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. या परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहितीही समोर आली आहे.
सोमवारी संध्याकाळी कासगावच्या धर्मेंद्र फार्म हाऊसवर कामासाठी जाणाऱ्या एका तरुणाला बिबट्या दिसला होता. तर मे महिन्यात कासगावातील महेश टेम्बे हे रात्री उशिरा रिक्षा घेऊन येत असताना बछड्यासह एक बिबट्या त्यांच्या समोरून गेला होता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.