बिबट्यांची नसबंदी की फसवणूक? वनमंत्र्यांचे पोकळ आश्वासन?

Leopard Crisis Deepens: बिबट्यांच्या वावरामुळे धास्तावलेल्या नागरिकांची आता प्रशासनानेच नाही तर खुद्द वनमंत्र्यांनी खोट्या आश्वासनावर बोळवण केलीय... मात्र बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांची अशी बोळवण करण्याची वेळ का आलीय?
“Shirur residents panic as leopard sightings surge, while authorities clear sterilization for only five leopards amid a population of over two thousand.”
“Shirur residents panic as leopard sightings surge, while authorities clear sterilization for only five leopards amid a population of over two thousand.”Saam Tv
Published On

शिरुरमध्ये बिबट्यानं जगणं मुश्किल केलेलं असतांना आशेचा किरण दाखवणारं वनमंत्र्यांनी अगदी परवाच दिलेलं हे आश्वासन आज मात्र फोल ठरलं. वनमंत्र्यांनी शिरुर परिसरातील बिबट्यांची नसबंदी होणार अशी घोषणा केल्यानंतर शिरुरमधील बिबट्याबाधित नागरिकांनी समाधान व्यक्त केलं होतं. मात्र आज आलेल्या बातमीनं शिरुर वासियांचे टेन्शन पुन्हा वाढवलंय. कारण शिरुर मध्ये 2 हजारांहून अधिक बिबट्यांनी धूडगुस घातलेला असतांना केवळ पाचच बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश केंद्रिय वन मंत्रालयानं दिलेत.

शिरुरमध्ये बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 वर्षांचा पायलट प्रोजेक्ट

जुन्नर वनविभागातील केवळ पाच मादी बिबट्यांची नसबंदी होणार

तीन वर्षांत रोगप्रतिकारक-गर्भनिरोधक पद्धतींचा अभ्यास करणार

नरभक्षक बिबट्यांना ठार करणं किंवा जेरबंद करण्यावर उपाययोजना करणार

उत्तर पुणे जिल्ह्यात दोन रेस्क्यू सेंटर्सची उभारणी होणार

माणिकडोह बिबट निवारा केंद्रात बिबट मादीची नसबंदी होणार

केंद्रीय वनमंत्रालयाच्या या निर्णयानं शिरुरवासियांना तुर्तास दिलासा मिळेल असं वाटत नाही. कारण त्यासाठी लागणारी सर्व तयारी आता वनविभागाला करावी लागणारेय. एकीकडे राज्यभरात बिबट्याच्या हैदोस वाढलेला असतांना धास्तावलेल्या नागरिकांना सरकार भूलथापा देत असल्याचं दिसलंय. कारण राणा भीमदेवी थाटात नरभक्षक बिबट्याला शूट एट साईट ठार करण्याचे आदेश देणाऱ्या वनमंत्र्यांचं आश्वासन फोल असल्याचं ठरलंय.

बिबट्याला ठार करण्यासाठी केंद्राची परवानगी लागते तरी देखिल केवळ नागरिकांचा रोष शांत करण्यासाठी वनमंत्र्यांनी बिबटयांना गोळ्या घालणार...नसबंदी करणार अशी धूळफेक का केली? आंतराष्ट्रीय पातळीवर प्राण्यासंबंधी एखादा महत्वाचा नसबंदीसारखा किंवा ठार मारण्यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी एसओपी असतांना ही आश्वासनबाजी तरी कशासाठी... ? त्यामुळे सध्या तरी नागरिकांना बिबट्यापासून स्वत:चा बचाव स्वत:च करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com