Leopard Attack : नायब तहसिलदारांनी बिबट्याचा हल्ला परतावून लावला..., महिलेच्या धाडसाचे हाेतेय काैतुक

वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Ratnagiri, Rajapur, Leopard
Ratnagiri, Rajapur, Leopardsaam tv

- जितेश काेळी

Ratnagiri : राजापूरच्या नायब तहसिलदार दिपाली पंडीत (deepali pandit) यांच्यावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने (leopard) हल्ला केला. या हल्ल्यात पंडीत जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात (rajapur general hospital) उपचार सुरु आहेत.

Ratnagiri, Rajapur, Leopard
Sangli News: आंबा आला रे ! हापूस आंबा सांगलीत दाखल, जाणून घ्या पेटीचा दर

पंडीत या रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समीतीकडे जात हाेत्या. त्यावेळी शहरातील भटाळी येथील पोलिस लाइन्सच्या बाजूला बिबट्याने केलेल्या हल्यात त्या जखमी झाल्या. ज्या ठिकाणी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तिथपासून राजापूर वनविभागाचे कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान या परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती. मात्र वनविभागाने याकडे कानाडोळा केल्याची चर्चा पंडीत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर परिसरात सुरु हाेती.

Ratnagiri, Rajapur, Leopard
Thane : ठाण्यात शिवसेना उपविभाग प्रमुखाचा खून

बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच पंडीत यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे त्या बचावल्या. त्यांच्या हातावर बिबट्याने पंजा मारला असुन दुचाकीवरुन पडल्याने पंडीत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com