सातारा : कराड (karad) तालुक्यातील विंग कणसे मळा येथे बिबट्याने (leopard) मेंढपाळाच्या कल्पनांवर तसेच घोड्यावर (horse) अचानक हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये घोड्याचा मृत्यू झाला तर शिंगरू गंभीर जखमी झाले होते. त्या शिंगरुचा उपचारादरम्यान आज (साेमवार) मृत्यू झाला. (karad latest marathi news)
सातारा (satara) जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विंग येथील कणसे मळा या ठिकाणी जगन्नाथ महादेव होगले यांच्या गट नंबर ७५९ या शेत शिवारामध्ये मेंढपाळ चरत होते. या ठिकाणी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घोड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक घोडा ठार झाला असून शिंगरू जखमी झाले. या शिवारात कोळे येथील अक्षय भिमराव शिनगारे यांच्या मेंढ्या बसवल्या होत्या. या ठिकाणी बिबट्याने घोड्यांवर हल्ला करून घोड्याला ठार केले. कणसे मळ्यात बिबट्याची वस्ती असून या अगोदरही बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनेची माहिती मिळताच मलकापूर वनरक्षक रमेश जाधवर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांकडून (farmers) वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.