Leopard Attack : दबक्या पावलाने आला अन् झडप घातली, अंगणात खेळणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Nashik News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या काही तासांत दोन बिबट्याचे हल्ले झाले. पंचाळे गावात ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर खडांगळी शिवारात ६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनांनी परिसरात भीतीचं सावट निर्माण झालं आहे.
Leopard Attack : दबक्या पावलाने आला अन् झडप घातली, अंगणात खेळणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Nashik news Saam Tv
Published On
Summary
  • सिन्नर तालुक्यात साडेसात तासांत दोन बिबट्याचे हल्ले

  • पंचाळे गावात ११ वर्षीय सारंग थोरातचा मृत्यू

  • खडांगळी शिवारात सहा वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

  • वनविभागाकडे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तातडीच्या कारवाईची मागणी

नाशिकमध्ये एक महिन्यापूर्वी ३ वर्षाच्या चिमुकल्याचा राखी पौर्णिमेच्या दिवशी अंगणात बहिणी सोबत खेळत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नाशिकच्या सिन्नर तालुक्यात धक्कादायक घटना घडली. सायंकाळी अंगणात लपाछपी खेळत असताना सारंग थोरात या ११ वर्षीय मुलाला बिबट्याने आपले भक्ष बनवले. या घटनेत सारंगचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावात रविवारी संध्याकाळी सारंग थोरात हा ११ वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत अंगणात लपाछपी खेळत होता. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की सारंगचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने पंचाळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leopard Attack : दबक्या पावलाने आला अन् झडप घातली, अंगणात खेळणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Nashik News: अख्खं कुटुंब रडत होतं, अंत्यविधीची तयारी सुरू असतांना तो जिवंत झाला; नेमकं घडलं काय ?VIDEO

धक्कदायक म्हणजे अवघ्या काही तासांत नाशिकच्या खडांगळी शिवारात आणखी एक हल्ला घडला. यावेळी बिबट्याने सहा वर्षांच्या मुलावर झडप घातली. या हल्ल्यात तो चिमुरडा गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एकाच तालुक्यात इतक्या कमी वेळेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे हल्ले झाल्याने स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत.

Leopard Attack : दबक्या पावलाने आला अन् झडप घातली, अंगणात खेळणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Nashik Tourism: हिरवागार निसर्ग आणि थंडगार वारा! नाशिकवरुन फक्त २५ किलोमीटरवर असलेल्या 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांची वर्दळ वाढली असून, रात्रीच्या वेळी भीतीमुळे कोणीही घराबाहेर पडायला धजावत नाही. शेतात काम करणाऱ्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com