Gautami Patil News: भावांनो! गौतमीच्या 'कातील अदा' आता परवडणार नाहीत; वाढत्या गर्दीमुळे मोठा निर्णय, आयोजकांना फटका?

Gautami Patils Expensive Dance Show: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणाऱ्या तौबा गर्दीने आता आयोजकांना अडचणीत आणले असून; यापुढे खिशाला चांगलाच फटका बसणार आहे....
Gautami Patil News
Gautami Patil NewsSaam TV
Published On

Lavani Dancer Gautami Patil Show Fees: गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज नाही. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात सध्या गौतमीचीचं हवा पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी आणि तडफदार लावणीने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांना तौबा गर्दी पाहायला मिळते. (Lavani Dancer Gautami Patil)

मात्र गौतमीची हीच क्रेझ आता आयोजकांना महागात पडणार असून गौतमीला गावात आणायची असेल तर यापुढे आयोजकांना चौप्पट तोटा सहन करावा लागणार आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...

Gautami Patil News
Gautami Patil News: शेठ, नादचं केलाय थेट! 'गावात गौतमी येतेयं, २ दिवस सुट्टी द्या...' ST कर्मचाऱ्याचं डायरेक्ट साहेबांना पत्र

हुल्लडबाजीचा आयोजकांना फटका...

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तौबा गर्दी हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. मात्र या गर्दीमुळे तरुणांची हुल्लडबाजी, मारहाण, वादविवाद असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. अलिकडेच नाशिकमध्ये (Nashik) झालेल्या कार्यक्रमात गौतमीच्या कार्यक्रमात थेट पत्रकारांना मारहाणीचाही प्रकार समोर आला होता.

बंदोबस्तासाठी द्यावे लागणार पैसे...

त्यामुळेच गौतमी पाटीलचे कार्यक्रम आता चिंतेचे विषय ठरत असून या प्रकरणी पोलिस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमांना सर्व परवानग्या सोबत पेड पोलीस बंदोबस्त देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याच पेड बंदोबस्तामुळे आयोजकांच्या खिशाला जवळपास चौपट कात्री लागणार आहे. (Latest Marathi News)

Gautami Patil News
Pune Crime News: माझा पती हरवला, पुण्यातील विवाहितेची पोलिसांत धाव; तपासात पत्नीचं 'लफडं' उघड

म्हणजेच आता गौतमीच्या मानधनाच्या दुपटीपेक्षाही जास्त रक्कम केवळ पोलीस (Police) बंदोबस्तासाठी भरावी लागणार आहे. त्यामुळे सर्वच आयोजकांना एवढा खर्च करणे कितपत शक्य आहे याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच त्यामुळेच शांतपणे कार्यक्रम पाहा आणि आनंद घ्या, असं आवाहन गौतमीला आपल्या चाहत्यांना केले आहे.

सांगोल्यापासून झाली सुरूवात..

पोलिस प्रशासनाच्या कडक बंदोबस्तात गौतमीचा पहिला कार्यक्रम सांगोला (Sangola) तालुक्यातील घेरडी गावात झाला आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांना 100 पोलीस कर्मचारी आणि सहा अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी तब्बल सव्वा पाच लाख रुपये भरून गौतमीचा कार्यक्रम ठेवावा लागला आहे. त्यामुळे आता गौतमीचे कार्यक्रम सर्वांनाच परडवणार नाही, असेच चित्र दिसत आहे.

गौतमी पडणार महागात...

दरम्यान, गौतमी पाटीलची सध्या राज्यात तुफान क्रेझ आहे. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाचे आयोजन करताना आयोजकांना संभाव्य गर्दीचा अंदाज घेवून नियोजन करावे लागते. त्यामुळे गौतमीचे मानधन, तिच्या व्हॅनिटीचा खर्च, वरुन यापुढे पोलिसांनाही पैसे द्यावे लागणार असल्याने, आता छोट्या आयोजकांना गौतमी पाटील परवडणार नसल्याचे चित्र दिसत आहे. (Gautami Patil Craze)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com