Pune Crime News: माझा पती हरवला, पुण्यातील विवाहितेची पोलिसांत धाव; तपासात पत्नीचं 'लफडं' उघड

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अनैतिक संबंध तसेच प्रेमप्रकरणातून घडत आहे.
pune crime news Wife and lover ended husband life journey in daund taluka shocking incident
pune crime news Wife and lover ended husband life journey in daund taluka shocking incidentSaam TV

Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यातील बहुतांश गुन्हे अनैतिक संबंध तसेच प्रेमप्रकरणातून घडत आहे. अशीच एक घटना पुण्यातील दौंड तालुक्यातून समोर आली आहे. पती दारू पिऊन त्रास देत असल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. (Breaking Marathi News)

इतकंच नाही, तर स्वतःच पोलिसांत धाव घेऊन पती हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करताच महिलेचं बिंग फुटलं. महिलेनं प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं तपासात उघड झालं. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या.

pune crime news Wife and lover ended husband life journey in daund taluka shocking incident
Mumbai Crime News: मालक घराबाहेर पडताच मोलकरणीने केलं भयानक कांड; मुंबईतील खळबळजनक घटना

शीतल सुनील जगताप आणि अतुल प्रभाकर चौगुले, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, शीतल ही आपल्या पतीसह पुण्यातील (Pune News) भांडगाव परिसरात राहायला होती. तिचे अतुल प्रभाकर चौगुले या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना उडथळा ठरत असलेल्या पतीची झोपत असताना डोक्यात दगड घातून हत्या केली. (Latest Marathi News)

त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. आरोपी महिलेचा पती दारू पिवून मारहाण करायचा. याच त्रासाला वैतागून या महिलने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर आरोपी महिलेने दोन दिवसांनंतर पती बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

pune crime news Wife and lover ended husband life journey in daund taluka shocking incident
Crime News: लग्नानंतर नवरा नोकरीसाठी शहराबाहेर गेला; बायको पडली दिराच्या प्रेमात, त्यानंतर...

पोलिसांनी (Police) तपास सुरू केला असता. दुसऱ्याच दिवशी सुनीलचा मृतदेह घराशेजारी असलेल्या विहिरीत आढळून आला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत सुनील जगताप याच्या डोक्याला जखम असल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.

पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत तक्रारदार पत्नीची कसून चौकशी केली. चौकशीत शीतलने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली. तर रक्ताने माखलेले कपडे घरासमोर जाळुन पुरावा नष्ट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com